Números 33
MAR vs NVI
1 मोशे आणि अहरोन ह्यांच्या नेतृत्वाखाली इस्राएल लोक सैन्याप्रमाणे मिसर देशामधून टोळ्यांनी बाहेर पडले. तेव्हा त्यांचे मुक्काम झाले ते हे आहेत.
1 Estas são as jornadas dos israelitas quando saíram do Egito, organizados segundo as suas divisões, sob a liderança de Moisés e Arão.
2 परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे ते कोठून निघाले ते कोठे गेले. त्यांच्या मजला त्यांच्या मुक्कामाप्रमाणे मोशेने लिहिल्या त्या या.
2 Por ordem do Senhor Moisés registrou as etapas da jornada deles. Esta foi a jornada deles, por etapas:
3 पहिल्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी त्यांनी रामसेस सोडले. वल्हांडणाच्या दुसऱ्या दिवशी इस्राएलचे लोक विजयोत्सवात हात वर करून बाहेर पडले. मिसर देशाच्या सगळ्या लोकांनी त्यांना पाहिले.
3 Os israelitas partiram de Ramessés no décimo quinto dia do primeiro mês, no dia seguinte ao da Páscoa. Saíram, marchando desafiadoramente à vista de todos os egípcios,
4 मिसर देशाचे लोक परमेश्वराने मारलेल्या लोकांचे दफन करीत होते. ते त्यांच्या पहिल्या मुलांचे दफन करीत होते. परमेश्वराने मिसर देशाच्या देवतांना कडक शासन केले.
4 enquanto estes sepultavam o primeiro filho de cada um deles, que o Senhor matou. O Senhor impôs castigo aos seus deuses.
5 इस्राएल लोकांनी रामसेस सोडले आणि ते सुक्कोथाला गेले.
5 Os israelitas partiram de Ramessés e acamparam em Sucote.
6 ते सुक्कोथाहून एथामाला गेले. लोकांनी तेथे रानाच्या काठावर तंबू दिले.
6 Partiram de Sucote e acamparam em Etã, nos limites do deserto.
7 त्यांनी एथाम सोडले आणि ते पीहहीरोथला गेले. ते बआल-सफोन जवळ होते. लोकांनी मिग्दोलासमोर तंबू दिले.
7 Partiram de Etã, voltaram para Pi-Hairote, a leste de Baal-Zefom, e acamparam perto de Migdol.
8 मग लोकांनी पीहहीरोथहून कूच करून आणि ते समुद्र ओलांडून रानात गेले. आणि एथाम रानात तीन दिवसाची मजल करून त्यांनी मारा येथे तळ दिला.
8 Partiram de Pi-Hairote e atravessaram o mar chegando ao deserto, e, depois de viajarem três dias no deserto de Etã, acamparam em Mara.
9 लोकांनी मारा सोडले व ते एलिमाला जाऊन राहिले. तिथे बारा पाण्याचे झरे होते आणि सत्तर खजुराची झाडे होती.
9 Partiram de Mara e foram para Elim, onde havia doze fontes e setenta palmeiras, e acamparam ali.
10 लोकांनी एलिम सोडले व त्यांनी तांबड्या समुद्राजवळ तंबू दिले.
10 Partiram de Elim e acamparam junto ao mar Vermelho.
11 त्यांनी तांबडा समुद्र सोडला आणि सीन रानात तळ दिला.
11 Partiram do mar Vermelho e acamparam no deserto de Sim.
12 सीन रान सोडून ते दफका येथे तळ दिला.
12 Partiram do deserto de Sim e acamparam em Dofca.
13 लोकांनी दफका सोडले व ते आलूश येथे राहिले.
13 Partiram de Dofca e acamparam em Alus.
14 लोकांनी आलूश सोडले व रफीदिमला तळ दिला. त्या जागी पिण्यासाठी पाणी नव्हते.
14 Partiram de Alus e acamparam em Refidim, onde não havia água para o povo beber.
15 लोकांनी रफीदिम सोडले व त्यांनी सीनाय रानात तळ दिला.
15 Partiram de Refidim e acamparam no deserto do Sinai.
16 त्यांनी सीनाय वाळवंट सोडले व किब्रोथ-हत्तव्वा येथे तळ दिला.
16 Partiram do deserto do Sinai e acamparam em Quibrote-Hataavá.
17 किब्रोथ-हत्तव्वा येथून ते हसेरोथला राहिले.
17 Partiram de Quibrote-Hataavá e acamparam em Hazerote.
18 हसेरोथ येथून त्यांनी रिथमाला तंबू दिला.
18 Partiram de Hazerote e acamparam em Ritmá.
19 रिथमा सोडून ते रिम्मोन-पेरेसला आले.
19 Partiram de Ritmá e acamparam em Rimom-Perez.
20 रिम्मोन-पेरेस सोडल्यावर त्यांनी लिब्नाला तळ दिला.
20 Partiram de Rimom-Perez e acamparam em Libna.
21 लोकांनी लिब्ना सोडले व रिस्सा येथे तळ दिला.
21 Partiram de Libna e acamparam em Rissa.
22 रिस्सा सोडून ते कहेलाथा येथे तळ दिला.
22 Partiram de Rissa e acamparam em Queelata.
23 लोकांनी कहेलाथा सोडले व त्यांनी शेफेर पर्वतावर तंबू ठोकले.
23 Partiram de Queelata e acamparam no monte Séfer.
24 शेफेर पर्वत सोडून लोक हरादांत आले.
24 Partiram do monte Séfer e acamparam em Harada.
25 लोकांनी हरादा सोडले व मकहेलोथ येथे तळ दिला.
25 Partiram de Harada e acamparam em Maquelote.
26 मकहेलोथ सोडून ते तहथाला आले.
26 Partiram de Maquelote e acamparam em Taate.
27 लोकांनी तहथा सोडले व ते तारहला आले.
27 Partiram de Taate e acamparam em Terá.
28 तारह सोडून त्यांनी मिथकाला तळ दिला.
28 Partiram de Terá e acamparam em Mitca.
29 लोकांनी मिथका सोडले व हशमोना येथे तंबू दिला.
29 Partiram de Mitca e acamparam em Hasmona.
30 हशमोना सोडून ते मोसेरोथला आले.
30 Partiram de Hasmona e acamparam em Moserote.
31 त्यांनी मोसेरोथ सोडले व बनेयाकानाला तळ दिला.
31 Partiram de Moserote e acamparam em Benê-Jaacã.
32 बनेयाकान सोडून ते होर-हागिदगादला आले.
32 Partiram de Benê-Jaacã e acamparam em Hor-Gidgade.
33 होर-हागिदगाद सोडून त्यांनी याटबाथाला तंबू ठोकले.
33 Partiram de Hor-Gidgade e acamparam em Jotbatá.
34 याटबाथा येथून ते अब्रोनाला आले.
34 Partiram de Jotbatá e acamparam em Abrona.
35 अब्रोनाहून त्यांनी एसयोन-गेबेर येथे तळ दिला.
35 Partiram de Abrona e acamparam em Eziom-Geber.
36 लोकांनी एसयोन-गेबेर सोडले व त्यांनी त्सीन रानात कादेश येथे तंबू दिला.
36 Partiram de Eziom-Geber e acamparam em Cades, no deserto de Zim.
37 लोकांनी कादेश सोडले व त्यांनी होरला तंबू ठोकले. अदोम देशाच्या सीमेवरील हा एक पर्वत होता.
37 Partiram de Cades e acamparam no monte Hor, na fronteira de Edom.
38 याजक अहरोनाने परमेश्वराची आज्ञा पाळली व तो होर पर्वतावर गेला. अहरोन त्याजागी मरण पावला. हा इस्राएल लोकांनी मिसर देश सोडल्याचा चाळीसाव्या वर्षाच्या पाचव्या महिन्याचा पहिला दिवस होता.
38 Por ordem do Senhor, o sacerdote Arão subiu o monte Hor, onde morreu no dia primeiro do quinto mês do quadragésimo ano depois que os israelitas saíram do Egito.
39 अहरोन होर पर्वतावर मेला तेव्हा तो एकशे तेवीस वर्षाचा होता.
39 Arão tinha cento e vinte e três anos de idade quando morreu no monte Hor.
40 कनान देशातील नेगेब जवळ अराद शहर होते. अराद येथे असलेल्या कनानी राजाने इस्राएलचे लोक येत असल्याबद्दल ऐकले.
40 O rei cananeu de Arade, que vivia no Neguebe, na terra de Canaã, soube que os israelitas estavam chegando.
41 लोकांनी होर पर्वत सोडला व सलमोनाला तंबू दिला.
41 Eles partiram do monte Hor e acamparam em Zalmona.
42 त्यांनी सलमोना सोडले व ते पूनोनला आले.
42 Partiram de Zalmona e acamparam em Punom.
43 पूनोन सोडून त्यांनी ओबोथाला तळ दिला.
43 Partiram de Punom e acamparam em Obote.
44 लोकांनी ओबोथ सोडले व ते इये-अबारीमाला आले. हे मवाब देशाच्या सीमेवर होते.
44 Partiram de Obote e acamparam em Ijé-Abarim, na fronteira de Moabe.
45 मग ईयीमाहून (इये-अबारिम) ते दीबोन-गादला आले.
45 Partiram de Ijim e acamparam em Dibom-Gade.
46 लोकांनी दीबोन-गाद सोडले व अलमोन-दिलाथाईमाला आले.
46 Partiram de Dibom-Gade e acamparam em Almom-Diblataim.
47 अलमोन-दिलाथाईमहून त्यांनी नबोजवळच्या अबारीम पर्वतावर तंबू दिला.
47 Partiram de Almom-Diblataim e acamparam nos montes de Abarim, defronte de Nebo.
48 लोकांनी अबारीम पर्वत सोडला व ते यार्देन खोऱ्यातल्या मवाब येथे आले. हे यरीहोच्या समोर यार्देन नदीजवळ होते.
48 Partiram dos montes de Abarim e acamparam nas campinas de Moabe junto ao Jordão, do outro lado de Jericó.
49 त्यांनी मवाबाच्या मैदानात यार्देनतीरी त्यांचे तंबू बेथ-यशिमोथापासून आबेल-शिट्टीमापर्यंत होते.
49 Nas campinas de Moabe eles acamparam junto ao Jordão, desde Bete-Jesimote até Abel-Sitim.
50 आणि मवाबाच्या मैदानामध्ये यार्देनेपाशी यरीहोजवळ परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
50 Nas campinas de Moabe, junto ao Jordão, do outro lado de Jericó, o Senhor disse a Moisés:
51 इस्राएल लोकांशी बोल, त्यांना या गोष्टी सांग, तुम्ही यार्देन नदी पार कराल. तुम्ही कनान देशात जाल.
51 "Diga aos israelitas: Quando vocês atravessarem o Jordão para entrar em Canaã,
52 तिथे जे लोक तुम्हास आढळतील त्यांना देशातून घालवा. तेव्हा तुम्ही त्यांच्या कोरीव पुतळयांचा आणि मूर्तीचा नाश करा. त्यांच्या उंचावरच्या पुजेच्या ठिकाणांचा नाश करा.
52 expulsem da frente de vocês todos os habitantes da terra. Destruam todas as imagens esculpidas e todos os ídolos fundidos, e derrubem todos os altares idólatras deles.
53 तुम्ही तो प्रदेश घ्या आणि तिथेच रहा. कारण मी हा देश तुम्हास वतन करून दिला आहे.
53 Apoderem-se da terra e instalem-se nela, pois eu lhes dei a terra para que dela tomem posse.
54 तुमच्यातील प्रत्येक कुळाने चिठ्ठ्या टाकून देश वतन करून घ्या. मोठ्या कुळाला जमिनीचा मोठा भाग मिळेल. लहान कुळाला लहान भाग मिळेल. एखाद्या ठिकाणासाठी ज्याच्या नावाची चिठ्ठी निघेल ते त्याचे वतन होईल. आपआपल्या वाडवडिलांच्या वंशाप्रमाणे तुम्हास वतन मिळेल.
54 Distribuam a terra por sorteio, de acordo com os seus clãs. Aos clãs vocês darão uma herança maior, e aos menores, uma herança menor. Cada clã receberá a terra que lhe cair por sorte. Distribuam-na entre as tribos dos seus antepassados.
55 परंतु तुम्ही आपणापुढून त्या देशात राहणाऱ्यांना बाहेर घालवले नाही जर तुम्ही त्यांना तिथेच राहू दिले तर ते तुम्हास डोळ्यातील कुसळासारखे तुमच्या कुशीत काट्यासारखे बोचतील. तुम्ही ज्या देशात रहाल त्या देशात ते अनेक संकटे आणतील.
55 "Se, contudo, vocês não expulsarem os habitantes da terra, aqueles que vocês permitirem ficar se tornarão farpas em seus olhos e espinhos em suas costas. Eles lhes causarão problemas na terra em que vocês irão morar.
56 मी तुमच्याबाबत काय करणार आहे ते मी तुम्हास दाखवले आहे. आणि जर तुम्ही त्यांना त्या देशात राहू दिले तर मी ते सर्व तुमच्याबाबतीत करीन.
56 Então farei a vocês o mesmo que planejo fazer a eles".
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?