1 कोमल उत्तराने राग शांत होतो,
2 सुज्ञाची जिव्हा ज्ञानाने सुशोभित असते,
3 याहवेहचे नेत्र सर्वठिकाणी बघत आहेत,
4 सांत्वन करणारी जीभ जीवनदायी वृक्ष आहे,
5 मूर्ख पुत्र आपल्या आईवडिलांचा सल्ला तुच्छ मानतो,
6 नीतिमानाच्या घरात विपुल समृद्धी असते,
7 सुज्ञ व्यक्तीचे मुख ज्ञान पसरवितात,
8 याहवेहना दुष्टांच्या अर्पणाचा वीट आहे,
9 दुष्टांच्या मार्गाचा याहवेह तिरस्कार करतात,
10 जे सत्याचा मार्ग सोडतात, कठोर शिक्षा त्यांची वाट पाहते;
11 मृत्यू आणि नाश याहवेह यांच्या दृष्टीपुढे आहेत—
12 उपहास करणार्यांना सुधारणेचा राग येतो,
13 आनंदी मन चेहरा उल्हासित करते,
14 सुज्ञ अंतःकरण ज्ञानाचा माग घेते,
15 पीडित मनुष्याचे सर्व दिवस क्लेशपूर्ण असतात,
16 अपार समृद्धी व त्यासोबत येणारी संकटे असणे,
17 तिरस्काराने वाढलेल्या पुष्ट वासराच्या मेजवानीपेक्षा
18 तापट मनुष्य कलह उत्पन्न करतो,
19 आळशी माणसाच्या वाटेवर काटेरी कुंपणासारखे अडथळे असतात,
20 समंजस पुत्र आपल्या वडिलांना आनंद देतो,
21 मूर्खपणा विवेकहीन मनुष्यास आनंदित करतो,
22 उपयुक्त सल्लागार नसले की योजना विफल होतात;
23 समर्पक उत्तर देण्यात प्रत्येकाला आनंद वाटतो—
24 सुज्ञासाठी जीवनाचा मार्ग वर चढविणारा असतो
25 गर्विष्ठांच्या घराचा याहवेह नाश करतात,
26 दुष्टाच्या विचारांचा याहवेह द्वेष करतात,
27 लोभी माणसे त्यांच्या परिवारांवर विनाश आणतात,
28 नीतिमानाचे अंतःकरण विचारांती उत्तर देते,
29 याहवेह दुष्टांपासून फारच दूर असतात,
30 निरोप्याच्या नजरेतील चमक हृदयाला आनंद देते,
31 जीवनदायी शिक्षणाकडे जो काळजीपूर्वक लक्ष देतो,
32 जे शिस्तीकडे दुर्लक्ष करतात ते स्वतःचा तिरस्कार करतात,
33 याहवेहचे भय धरणे हेच सुज्ञतेचे शिक्षण होय,