1 हे परमेश्वरा, तुम्ही आम्हाला कायमचे टाकून दिले आहे का?
2 जे राष्ट्र प्राचीन काळी मोलाने विकत घेतले,
3 या नगरीचा जो भयानक विध्वंस झाला आहे, त्यात तुम्ही चालत जा,
4 तुमच्या सभागृहात त्यांनी आपल्या रणगर्जना केल्या,
5 दाट वृक्षांना कुर्हाडीने
6 त्यांनी कुर्हाडी आणि घण घेऊन
7 त्यांनी तुमच्या मंदिराला आग लावून ते जमीनदोस्त केले;
8 ते त्यांच्या मनात म्हणाले, “आम्ही अस्तित्वाचा मागमूसही आम्ही पुसून टाकू!”
9 परमेश्वराकडून आम्हाला एकही चिन्ह मिळाले नाही;
10 हे परमेश्वरा, किती वेळ शत्रू तुमचा उपहास करणार?
11 तुम्ही आपला हात, आपला उजवा हात का आवरून धरला आहे?
12 परमेश्वर तुम्ही पुरातन काळापासून माझे राजे आहात;
13 तुम्हीच आपल्या शक्तीने समुद्र दुभागले;
14 लिव्याथानाची मस्तके तुम्हीच चिरडून टाकली;
15 तुम्हीच झरे उफाळून जलप्रवाह बाहेर आणले;
16 दिवस तुमचा आहे, रात्रही तुमचीच आहे;
17 पृथ्वीच्या सर्व सीमा तुम्हीच निर्धारित केल्या आहेत;
18 याहवेह, पाहा हे शत्रू तुमची कशी थट्टा करीत आहेत;
19 आपल्या कबुतराचे जीवन हिंसक श्वापदाच्या हाती देऊ नका;
20 तुमच्या कराराचे स्मरण करा,
21 पीडितांना अपमानात मागे फिरू देऊ नका;
22 परमेश्वरा, उठा आणि आपला दावा स्वतःच चालवा;
23 तुमच्या विरोधकांच्या आक्रोशाकडे दुर्लक्ष करू नका,