1 याहवेह, तुमच्या सामर्थ्यांमुळे राजा केवढा हर्ष पावतो.
2 कारण त्याचे मनोरथ तुम्ही पूर्ण केले आहेत;
3 उत्कृष्ट आशीर्वादाने तुम्ही त्याचे स्वागत केले;
4 त्याने तुमच्याजवळ जीवनाची मागणी केली—
5 तुम्ही त्याला विजय आणि बहुमान दिला;
6 सर्वकाळचे सुख देऊन तुम्ही त्याला संपन्न केले
7 कारण राजाचा भरवसा याहवेहवर आहे;
8 तुमचा द्वेष करणारे तुमचे सर्व शत्रू तुमच्या हाती सापडतील.
9 तुम्ही युद्ध करण्यासाठी जेव्हा प्रगट व्हाल,
10 तुम्ही त्यांची संतती पृथ्वीवरून,
11 ही माणसे जरी तुमच्याविरुद्ध कट रचतात,
12 जेव्हा तुमचे धनुष्य ताणून तुम्ही सरळ त्यांच्यावर रोखाल
13 याहवेह, तुम्ही आपल्या शक्तीने उंचविले जावो;