1 माझ्या मुला, माझ्या सुज्ञानाकडे लक्ष दे,
2 म्हणजे विवेकबुद्धीने कसे वागावे हे तुला समजेल;
3 कारण वेश्येचे बोलणे मधासारखे गोड असते,
4 परंतु शेवटी ती दवण्यासारखी कडू होते,
5 तिचे पाय मृत्यूकडे जातात;
6 जीवनाच्या मार्गाचा ती विचारच करीत नाही;
7 मग माझ्या मुलांनो, आता माझे ऐका;
8 तू तुझा मार्ग अशा स्त्रीपासून दूर ठेव,
9 असे होऊ नये की, तू तुझा मान दुसर्यांना द्यावा
10 तुझ्या संपत्तीवर अपरिचित लोक मेजवानी करू नये
11 तुझ्या जीवन अंती, जेव्हा तुझे मांस आणि शरीर झिजून जाईल
12 तू म्हणशील, “अरेरे! मी शिस्तीचा किती तिरस्कार केला!
13 मी माझ्या शिक्षकांचे आज्ञापालन करत नसे
14 आणि म्हणून लवकरच मी परमेश्वराच्या लोकांच्या सभेपुढे
15 तुझ्या स्वतःच्याच टाकीतील पाणी पी.
16 तुझे पाण्याचे झरे भरून रस्त्यांवर वाहून जावेत काय,
17 ते फक्त तुझ्यासाठीच असावेत,
18 तुझे पौरुषत्व आशीर्वादित होवो;
19 प्रेमळ हरिणी सारखी, एक आकर्षक हरिणी अशी ती—
20 माझ्या मुला, तू दुसर्या मनुष्याच्या पत्नीबरोबर धुंद का व्हावेस?
21 कारण तुझे मार्ग याहवेहच्या दृष्टीसमोर आहेत,
22 दुष्ट मनुष्याचा नाश स्वतःच्याच पातकांनी होतो;
23 कारण शिस्त नसल्यामुळे त्यांना मरण येईल,