Provérbios 4

MARC

1 माझ्या मुलांनो, वडिलांचा बोध ऐका;

2 मी तुम्हाला उत्तम शिक्षण देतो,

3 कारण मी सुद्धा माझ्या वडिलांचा पुत्र होतो,

4 तेव्हा त्यांनी मला शिकविले आणि ते मला म्हणाले,

5 सुज्ञान मिळव, समंजसपणा प्राप्त कर;

6 सुज्ञानाचा त्याग करू नकोस आणि ती तुझे रक्षण करेल;

7 सुज्ञानाची सुरवात अशी आहे: सुज्ञान मिळव.

8 तू जर तिला उराशी जतन करशील तर ती तुला उंचावेल.

9 ती तुझ्या मस्तकांवर फुलांचा मुकुट देईल,

10 माझ्या मुला ऐक, मी काय म्हणतो ते स्वीकार,

11 मी तुला सुज्ञान मार्गाचे शिक्षण देतो,

12 जेव्हा तू चालशील तेव्हा तुझी पावले लटपटणार नाहीत;

13 बोधवचने अंमलात आण, ती सोडून देऊ नकोस;

14 दुष्ट लोकांच्या मार्गात पाऊल टाकू नकोस,

15 त्याकडे पाठ फिरव, त्यावर प्रवास करू नकोस,

16 कारण दुष्कर्म केल्याशिवाय ते स्वस्थ राहू शकत नाहीत;

17 दुष्टाईने मिळविलेली भाकर ते खातात,

18 नीतिमान मनुष्याचा मार्ग सकाळच्या सूर्याप्रमाणे आहे,

19 दुर्जनाचा मार्ग गडद अंधकाराप्रमाणे आहे;

20 माझ्या मुला, मी काय म्हणतो त्याकडे लक्ष दे;

21 त्यांना तुझ्या दृष्टीपासून दूर जाऊ देऊ नकोस;

22 कारण ज्यांना ते मिळतात, त्यांच्यासाठी ते जीवन आहेत.

23 सर्वापेक्षा अधिक तुझ्या हृदयाचे रक्षण कर,

24 सर्वप्रकारच्या विकृती तुझ्या मुखापासून दूर ठेव;

25 तुझ्या डोळ्यांनी तू समोरच पाहा;

26 तुझ्या पावलांसाठी असलेल्या मार्गाचा काळजीपूर्वक विचार कर,

27 उजवीकडे किंवा डावीकडे वळू नकोस;

Ler em outra tradução

Comparar lado a lado