1 माझ्या मुला, जर तू तुझ्या शेजार्याला जामीन राहिला आहेस,
2 तर तू जे काही बोललास, त्यामुळे तू जाळ्यात सापडला आहेस,
3 म्हणून माझ्या मुला, स्वतःला सोडवून घेण्यासाठी तू असे कर,
4 तुझ्या डोळ्यांना झोप येऊ देऊ नकोस,
5 शिकार्याच्या हातातून निसटलेल्या हरिणासारखे,
6 अरे आळशा, मुंगीकडे जा;
7 तिला कोणीही अधिकारी,
8 तरी ती तिचा अन्नसामुग्रींचा साठा उन्हाळ्यात करते
9 परंतु हे आळशी माणसा, तू तिथे किती वेळ झोपून राहशील?
10 आणखी थोडीशी झोप, आणखी थोडीशी डुलकी
11 आणि दारिद्र्य एका चोराप्रमाणे तुझ्यावर येईल
12 त्रास देणारा आणि दुष्कर्मी मनुष्य,
13 तो आपले डोळे मिचकावितो,
14 जो त्याच्या हृदयात फसवणुकीच्या दुष्ट योजना करतो—
15 म्हणून त्याच्यावर अचानक आपत्ती येईल;
16 याहवेह सहा गोष्टींचा द्वेष करतात,
17 गर्विष्ठ नजर,
18 हृदय, जे दुष्ट योजना करते
19 खोटा साक्षीदार, जो असत्याचा वर्षाव करतो,
20 माझ्या मुला, तू तुझ्या पित्याची आज्ञा पाळ,
21 त्यांचे उपदेश तू सतत आपल्या हृदयात बाळग;
22 तू चालशील, तेव्हा ते तुला मार्ग दाखवेल;
23 कारण ही आज्ञा एक दीपक आहे,
24 ते तुला तुझ्या शेजार्याच्या पत्नीपासून दूर ठेवतात,
25 तू मनात तिच्या सौंदर्याबद्दल वासना बाळगू नकोस,
26 कारण एका भाकरीचे मोल देऊन वेश्या मिळू शकते,
27 मनुष्याने आपल्या उराशी निखारे बाळगले,
28 मनुष्य जळत्या कोळशावरून चालल्यास
29 तो असा मनुष्य आहे जो दुसर्याच्या पत्नीबरोबर व्यभिचार करतो;
30 भुकेला असताना भूक भागविण्यासाठी जो चोरी करतो,
31 तरीही जर तो चोर सापडला जातो, तर त्याला सातपट भरपाई करावी लागते,
32 परंतु जो मनुष्य जारकर्म करतो त्याच्याकडे समज नसते;
33 त्याला घाव आणि अप्रतिष्ठा प्राप्त होतील,
34 कारण मत्सर नवर्यास संतप्त करतो
35 तो कोणतीही नुकसान भरपाई स्वीकारणार नाही;