1 इय्योब आपला वाद पुढे चालवून म्हणाला:
2 “माझे गेलेले महिने, ज्यामध्ये परमेश्वराची नजर माझ्यावर होती,
3 जेव्हा त्यांचा प्रकाशदीप माझ्या मस्तकावर पडत असे
4 माझ्या उत्कृष्ट दिवसात,
5 जेव्हा सर्वसमर्थाची साथ अजूनही माझ्याबरोबर होती
6 जेव्हा माझी वाट लोण्याने भिजली जात असे
7 “जेव्हा मी नगराच्या वेशीमध्ये जाई
8 तरुण मला पाहून बाजूला होत असत,
9 अधिपती बोलणे टाळत स्तब्ध उभे राहत
10 सर्वश्रेष्ठ अधिकारीही त्यांची जीभ टाळूला चिकटवून
11 ज्यांनी माझे बोलणे ऐकले ते सर्व माझ्याविषयी चांगले बोलत,
12 कारण जे गरीब मदतीसाठी याचना करीत आणि ज्या अनाथांच्या मदतीला कोणी नसे,
13 मरत असलेला व्यक्ती मला आशीर्वाद देत असे;
14 नीतिमत्वाला मी पांघरले होते;
15 मी अंधाचे नेत्र
16 मी गरजवंतांचा पिता होतो;
17 मी दुष्टांचे जबडे फाडून
18 “मी विचार केला की, ‘मी माझ्या घरातच मरण पावेन,
19 माझी मुळे खोल पाण्यापर्यंत पोहचतील,
20 माझे वैभव कधीही नष्ट होणार नाही;
21 “लोक माझे बोलणे उत्सुकतेने ऐकत,
22 माझे बोलणे संपल्यावर;
23 पावसाच्या वर्षावाची पाहावी, तशी ते माझी वाट पाहत
24 मी त्यांच्याकडे हसतमुखाने बघितल्यास ते विश्वास करीत नसत;
25 त्यांचा पुढारी म्हणून मी त्यांच्याबरोबर बसून त्यांना मार्गदर्शन केले;