1 “परंतु आता जे माझ्याहून वयाने लहान आहेत,
2 त्यांच्या हातच्या सामर्थ्याचा मला काय लाभ,
3 भुकेने ते निस्तेज पडले आहेत,
4 ते औषधी वनस्पतीचा पाला गोळा करत होते,
5 त्यांना समाजातून घालवून दिले होते,
6 त्यांना कोरड्या पडलेल्या ओढ्याच्या पात्रामध्ये,
7 झुडपांमधून ते कर्कश आवाजात ओरडत
8 आधार नसलेल्या आणि अपरिचित पिलावळी सारखे
9 “आणि आता हेच तरुण लोक माझ्या निंदेची गाणी गातात;
10 ते माझा तिरस्कार करतात आणि माझ्यापासून दूर राहतात;
11 आता तर परमेश्वरानेच माझ्या कमानीची तार सैल सोडून मला पीडले आहे,
12 माझ्या उजव्या बाजूने घोळक्याने येऊन ते माझ्यावर हल्ला करतात;
13 ते माझा मार्ग अडवितात;
14 खिंडारातून हल्ला केल्यासारखे ते माझ्यावर धावून येतात;
15 भयाने मला ग्रासून टाकले आहे;
16 “आणि आता माझे जीवन संपुष्टात आले आहे;
17 रात्रीच्या समयी माझी हाडे टोचू लागतात;
18 परमेश्वराच्या बलवान हाताने माझी वस्त्रे आवळून धरली आहेत;
19 परमेश्वराने मला चिखलात फेकले आहे,
20 “हे परमेश्वरा, मी तुम्हाला हाक मारतो, पण तुम्ही मला उत्तर देत नाहीत;
21 तुम्ही माझ्याविषयी निष्ठुर झाला आहात;
22 तुम्ही मला ओढून वार्यावर उडवून टाकता,
23 मला माहीत आहे की तुम्ही मी मरेपर्यंत खाली खेचणार आहात,
24 “पीडित मनुष्य जेव्हा त्याच्या मदतीसाठी याचना करतो
25 संकटात असलेल्यांसाठी मी रडलो नाही काय?
26 तरीही मी जेव्हा चांगल्याची अपेक्षा केली, पण वाईटच मिळाले;
27 माझ्या आतील व्याकुळतेचे मंथन थांबत नाही;
28 मी काळवंडून जात आहे, पण तो उन्हाने नव्हे;
29 मी कोल्ह्यांचा भाऊ,
30 माझी त्वचा काळी पडून ती सोलून निघत आहे;
31 माझी वीणा रडण्याचे,