1 यावर बिल्दद शूहीने उत्तर दिले:
2 “ही अशी भाषणे तू कधी थांबविणार आहेस?
3 आम्हाला जनावरांप्रमाणे का समजतोस
4 रागाने जो तू स्वतःला फाडतोस,
5 “दुष्टांचा दिवा विझून जातो;
6 त्याच्या तंबूतील प्रकाश अंधकार होऊन होतो;
7 त्याच्या पावलांचा प्रभाव दुर्बल होतो;
8 त्याचेच पाऊल त्याला पाशात अडकवितात;
9 फास त्याची टाच पकडते;
10 त्याच्यासाठी गळफास जमिनीत लपविलेला आहे;
11 आतंक त्याला चहूकडून घेरून आहे
12 विपत्ती त्याच्यासाठी भुकेलेली आहे;
13 रोगाने त्याची त्वचा खाऊन टाकली आहे;
14 त्याच्या सुरक्षित डेर्यांतून त्याला फाडून
15 अग्नी त्याच्या डेर्यात वस्ती करते;
16 त्याची मुळे खाली सुकतात
17 पृथ्वीवरून त्याच्या अस्तित्वाची आठवण नाहीशी होते;
18 प्रकाशातून त्याला अंधाराच्या राज्यात घालविले आहे;
19 त्याच्या लोकात त्याला पुत्र किंवा कोणीही वारस नाहीत,
20 पश्चिमेचे लोक त्याची अवस्था बघून भयप्रद होतात;
21 पातक्यांचे जीवन खचितच असे असते;