1 लेवीचे पुत्र:
2 कोहाथाचे पुत्र:
3 अम्रामाची संतती:
4 एलअज़ारास फिनहास,
5 अबीशूवास बुक्की,
6 उज्जीस जरह्याह,
7 मरायोथास अमर्याह,
8 अहीतूबास सादोक,
9 अहीमाजास अजर्याह,
10 योहानान यास अजर्याह झाला.
11 अजर्याहास अमर्याह,
12 अहीतूबास सादोक,
13 शल्लूमास हिल्कियाह,
14 अजर्याहास सरायाह,
15 याहवेहने बाबेलचा राजा नबुखद्नेस्सराच्या हस्ते यहूदीया व यरुशलेमचा पाडाव केला, तेव्हा यहोसादाक बंदी झाला.
16 लेवीचे पुत्र:
17 ही गेर्षोनच्या पुत्रांची नावे:
18 कोहाथाचे पुत्र:
19 मरारीचे पुत्र:
20 गेर्षोमाच्या कुळातील:
21 जिम्माहाचा पुत्र योवाह,
22 कोहाथाचे वंशज:
23 अस्सीरचा पुत्र एलकानाह,
24 अस्सीरचा पुत्र तहथ, तहथाचा पुत्र उरीएल,
25 एलकानाहचे वंशज:
26 एलकानाहचा पुत्र सोफय, सोफयाचा पुत्र नहाथ,
27 एलियाबाचा पुत्र,
28 शमुवेलाचे पुत्र:
29 मरारीचे वंशज:
30 त्याचा पुत्र शिमा, त्याचा पुत्र हग्गीयाह
31 कोश स्थायिक झाल्यावर दावीदाने याहवेहच्या मंदिरात गायकवृंदात जे पुरुष नेमले ते:
32 यरुशलेममध्ये शलोमोन याहवेहचे मंदिर बांधेपर्यंत सभामंडपाच्या निवासमंडपासमोर त्यांनी संगीताची सेवा केली. ते आपल्या कामावर क्रमानुसार हजर राहत असत.
33 ज्या पुरुषांनी त्यांच्या पुत्रांसह मिळून सेवा केली त्यांची नावे:
34 जो एलकानाहचा पुत्र, जो यरोहामाचा पुत्र,
35 जो सूफाचा पुत्र, जो एलकानाहचा पुत्र,
36 जो एलकानाहचा पुत्र, जो योएलचा पुत्र,
37 जो तहथाचा पुत्र, जो अस्सीरचा पुत्र,
38 जो इसहारचा पुत्र, जो कोहाथचा पुत्र,
39 हेमानाचा भाऊ आसाफ त्याच्या उजवीकडे उभा राहात असे:
40 जो मिखाएलचा पुत्र, जो बासेयाहचा पुत्र,
41 जो एथनीचा पुत्र,
42 जो एथानचा पुत्र, जो जिम्माहचा पुत्र,
43 जो यहथाचा पुत्र,
44 आणि त्यांच्या डावीकडे, मरारी कुळातील सहायक:
45 जो हशब्याहाचा पुत्र,
46 जो अमसीचा पुत्र, जो बानीचा पुत्र,
47 जो महलीचा पुत्र,
48 त्यांच्या लेवी भाऊबंदांना परमेश्वराच्या भवनाच्या निवासमंडपातील सर्व सेवेसाठी समर्पित करण्यात आलेले होते.
49 अहरोन व त्याचे वंशज हे होमवेदीवर व धूपवेदीवर अर्पणे करीत असत. परमपवित्र स्थानासंबंधीची सर्व कामे ते करीत आणि इस्राएली लोकांसाठी प्रायश्चित करीत. परमेश्वराचा सेवक मोशेने दिलेल्या आज्ञेप्रमाणे ते करीत असत.
50 अहरोनाचे वंशज:
51 त्याचा पुत्र बुक्की,
52 त्याचा पुत्र मरायोथ, त्याचा पुत्र अमर्याह,
53 त्याचा पुत्र सादोक
54 हा प्रदेश त्यांना वाटप म्हणून देण्यात आला होता. ही त्यांच्या वसाहतींची ठिकाणे बनली. (हा प्रदेश अहरोनाच्या वंशज कोहाथी कुळातील लोकांना देण्यात आला, कारण पहिली चिठ्ठी त्यांच्यासाठी होती):
55 यहूदीयाच्या प्रदेशातील हेब्रोन हे नगर त्याच्या शिवारांसहित दिले.
56 पण त्या नगराची शेते व गावे यफुन्नेहचा पुत्र कालेब याला दिली.
57 अहरोनाच्या वंशजास पुढील नगरे देण्यात आली: हेब्रोन (शरणपूर म्हणून), लिब्नाह व त्याचे शिवार, यत्तीर, एशतमोआ,
58 हीलेन, दबीर,
59 आशान, युताह, बेथ-शेमेश सर्व त्यांच्या शिवारासह.
60 बिन्यामीनच्या गोत्रास गिबोन, गेबा, आलेमेथ आणि अनाथोथ ही सर्व त्यांच्या शिवारासह.
61 अवशिष्ट राहिलेल्या कोहाथी वंशजास चिठ्ठ्या टाकून मनश्शेहच्या अर्ध्या वंशजाच्या प्रदेशातून दहा नगरे दिली.
62 गेर्षोम वंशजास त्यांच्या पितृकुळाप्रमाणे इस्साखार, आशेर, नफताली व बाशानात राहणाऱ्या मनश्शेह वंशाची तेरा नगरे दिली.
63 मरारी वंशजास चिठ्ठ्या टाकून त्यांच्या पितृकुळाप्रमाणे रऊबेन, गाद व जबुलून या गोत्रांच्या प्रदेशातून बारा नगरे दिली.
64 इस्राएली लोकांनी लेवी वंशजास ही नगरे त्यांच्या शिवारांसहित दिली.
65 त्यांनी यहूदाह, शिमओन व बिन्यामीन या वंशांमधून चिठ्ठ्या टाकून आधी उल्लेख केलेली नगरे दिली.
66 एफ्राईम वंशजाने कोहाथ पितृकुळाला जी नगरे त्यांच्या शिवारांसहित दिली ती ही:
67 एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील नगर शेखेम (शरणपूर) व त्याचे शिवार, तसेच गेजेर व त्याचे शिवार,
68 योकमेअम, बेथ-होरोन,
69 अय्यालोन, गथ-रिम्मोन हे सर्व त्यांच्या शिवारासह.
70 तसेच मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रातून आनेर आणि बिलाम, त्यांच्या शिवारासह. ही कोहाथी पितृकुळातील अवशिष्ट वंशजास दिली.
71 गेर्षोमाच्या वंशजास जी नगरे मिळाली ती ही:
72 इस्साखारच्या गोत्रातून केदेश व दाबरथ,
73 रामोथ व त्याचे शिवार आणि आनेम व त्याचे शिवार ही दिली;
74 आशेरच्या गोत्रातून माशाल व त्याचे शिवार, अब्दोन व त्याचे शिवार,
75 हुक्कोक व त्याचे शिवार आणि रहोब व त्याचे शिवार ही दिली;
76 नफताली गोत्रातून गालीलातील केदेश व त्याचे शिवार, हम्मोन व त्याचे शिवार आणि किर्याथाईम व त्याचे शिवार ही दिली.
77 लेवीच्या बाकी लोकांना म्हणजे मरारी वंशजास जी शहरे दिली ती ही:
78 यार्देनेपलीकडे यरीहोजवळ, यार्देनेच्या पूर्वथडीस रऊबेन गोत्रातून रानातले बेसेर व त्याचे शिवार, याहसाह व त्याचे शिवार,
79 केदेमोथ व त्याचे शिवार आणि मेफाथ व त्याचे शिवार ही दिली;
80 आणि गाद गोत्रातून गिलआदी रामोथ व त्याचे शिवार, महनाईम व त्याचे शिवार,
81 हेशबोन व त्याचे शिवार आणि याजेर व त्याचे शिवार ही दिली.