1 ज्याला शिक्षण प्रिय त्यास ज्ञान प्रिय,
2 परमेश्वर चांगल्या मनुष्यास कृपा देतो,
3 दुष्टतेने मनुष्य स्थिर होत नाही,
4 सद्गुणी पत्नी आपल्या पतीचा मुकुट आहे,
5 नीतिमानाच्या योजना यथान्याय असतात,
6 दुष्टांचे शब्द रक्तपात घडून आणण्यासाठी दबा धरून थांबतात,
7 दुर्जन उलथून टाकले जातात आणि नाहीसे होतात,
8 मनुष्याची प्रशंसा त्याच्या सुज्ञतेप्रमाणे होते,
9 जो आपणास प्रतिष्ठित दाखवतो पण त्याच्याकडे अन्न नसते;
10 नीतिमान आपल्या प्राण्यांविषयीच्या गरजांची काळजी घेतो,
11 जो कोणी आपल्या शेतात कष्ट करतो त्याच्याकडे विपुल अन्न असते,
12 दुसऱ्यापासून चोरल्याची इच्छा दुर्जन करतो,
13 दुष्ट मनुष्य आपल्या पापी बोलल्याने पाशात पडतो,
14 मनुष्य आपल्या मुखाच्या फळाकडून चांगल्या गोष्टींच्या योगे तृप्त होतो,
15 मूर्खाचा मार्ग त्याच्या दृष्टीने नीट असतो,
16 मूर्ख त्याचा राग लागलाच दाखवतो,
17 जो कोणी खरे बोलतो तो जे काय योग्य आहे ते सांगतो,
18 कोणी असा असतो की, तलवार भोसकावी तसे अविचाराचे भाषण करतो,
19 सत्याची वाणी सर्वकाळ टिकेल,
20 वाईट योजणाऱ्यांच्या अंतःकरणात कपट असते,
21 नीतिमानावर संकटे येत नाहीत,
22 खोटे बोलणाऱ्या वाणीचा परमेश्वरास वीट आहे,
23 शहाणा मनुष्य आपले ज्ञान गुप्त ठेवतो,
24 उद्योग्याचे हात अधिकार चालवतील,
25 मनुष्याचे हृदय काळजीच्या भाराने त्यास खाली दाबून टाकते,
26 नीतिमान आपल्या मित्राला मार्ग दाखवतो,
27 आळशी आपण धरलेली शिकार भाजित नाही,
28 न्यायीपणाच्या मार्गात जीवन सापडते,