1 “ईयोब, मी तुला विनंती करतो, माझे बोलने ऐक.
2 पाहा, मी आता बोलायला माझे मुख उघडले आहे,
3 माझे शब्दच माझ्या अंत:करणाचे प्रामाणिकपण सांगतील,
4 देवाच्या आत्म्याने मला निर्माण केले आहे,
5 तुला शक्य झाले तर मला उत्तर दे,
6 पाहा, देवासमोर मी आणि तू सारखेच आहोत,
7 पाहा, माझी दरारा तुला घाबरवणार नाही,
8 तू जे बोललास ते मी निश्चित ऐकले,
9 ‘मी शुध्द आहे, मी निरपराध आहे, मी काहीही चूक केली नाही
10 पाहा, देव माझ्यावर हल्ला करण्याची संधी पाहतो
11 देवाने माझ्या पायला साखळदंड बांधले
12 पाहा, मी तुला उत्तर देईल तू या बाबतीत चुकतो आहेस,
13 तू त्याच्याशी का वाद घालत आहेस?
14 देव एकदा बोलतो,
15 देव लोकांशी रात्री ते गाढ झोपेत असताना स्वप्नात किंवा दृष्टांतात बोलत असेल,
16 नंतर देव मनुष्याची कानउघडणी करतो,
17 मनुष्यास त्यांना पापाच्या हेतूपासून मागे ओढण्यासाठी,
18 देव गर्तेतून मनुष्याचे जीवन वाचवितो,
19 मनुष्याला केलेल्या शिक्षेमुळे अंथरुणात पडून दु:ख भोगत असेल
20 नंतर तो मनुष्य खाऊ शकत नाही
21 त्याचे शरीर इतके क्षीण होते की तो जवळ जवळ दिसेनासा होतो.
22 खरोखर, तो मृत्यूलोकाजवळ येऊन ठेपतो
23 परंतू एखादा देवदूत जर त्याचा मध्यस्थ झाला,
24 आणि देवदूत त्याच्याशी दयेने वागेल, आणि देवाला सांगेल.
25 मग त्याचे शरीर पुन: बालकासारखे जोमदार बनेल.
26 तो देवाची प्रार्थना करेल आणि देव त्यास दया देईल.
27 नंतर तो लोकांस कबुली देईल. तो म्हणेल, ‘मी पापकर्म केले.
28 त्याने माझ्या आत्म्याला मृत्युलोकात जाण्यापासून वाचवेल.
29 पाहा, देव या गोष्टी मनुष्यासाठी करतो,
30 त्याच्या जीवाला मृत्युलोकात जाण्यापासून वाचवण्यासाठी असे करतो
31 ईयोबा, मी काय म्हणतो त्याकडे लक्ष दे.
32 पण ईयोबा, जर तुला माझे बोलणे पटत नसेल तर तू खुशाल बोल.
33 परंतु ईयोबा, तुइयाजवळ बोलण्यासारखे काही नसेल तर माझे ऐक.