1 नंतर या तीन मनुष्यांनी ईयोबाला उत्तर देण्याचे थांबविले, कारण तो त्याच्या स्वतःच्या नजरेमध्ये नितीमान होता.
2 नंतर राम घराण्यातील बरखेल बूजी याचा पुत्र अलीहू याचा राग भडकला, देवापेक्षा स्वतःला निर्दोष ठरविल्याबद्दल ईयोबावर त्याचा राग भडकला.
3 अलीहूचा राग आणखी त्याच्या तीनही मित्रावर भडकला कारण ईयोबासाठी त्यांना कोणतेही उत्तर सापडले नाही, आणि तरीही ते ईयोबाला दोष देत राहीले होते.
4 दुसरे लोक त्याच्यापेक्षा वयाने मोठे असल्या कारणाने अलीहूने ईयोबास बोलण्यास वाट पाहिली.
5 तथापि, जेव्हा अलीहूने बघीतले कि, त्या तीन पुरूषांकडे काहीही उत्तर नाही हे पाहून, त्याचा राग भडकला.
6 मग बरखेल बूजी याचा पुत्र अलीहू याने उत्तर दिले, तो म्हणाला,
7 मी म्हणालो, जास्त दिवस पाहिलेल्यांनी बोलले पाहीजे,
8 परंतु देवाचा आत्मा मनुष्यात असतो,
9 मनुष्य महान असला म्हणजेच तो ज्ञानी असतो असे नाही,
10 त्या कारणामुळे मी तुम्हास म्हणतो, माझ्याकडे तुम्ही लक्ष द्या,
11 पाहा, मी तुमच्या शब्दांची वाट पाहीली,
12 खरे पाहता, मी तुझ्याकडे लक्ष लावले,
13 संभाळा, आम्हास ज्ञान सापडले असे म्हणण्यास धजू नको!
14 ईयोबाने त्याचे शब्द माझ्या विरोधात वापरले नाहीत,
15 हे तीनही माणसे मुके झाले आहेत, आता ते ईयोबाला उत्तर देऊ शकत नाहीत.
16 ते बोलत नाहीत म्हणून मी वाट पाहावी काय?
17 नाही, मी माझ्या बाजूने उत्तर देईल,
18 माझ्याजवळ पुष्कळ शब्द आहेत,
19 पाहा, माझे मन बंद करून ठेवलेल्या द्राक्षरसाप्रमाणे झाले आहे,
20 मी बोललो तर मला बरे वाटेल,
21 मी कोणाची बाजू घेणार नाही,
22 खुशामत कशी करावी ते मला माहीती नाही,