1 “माझा आत्मा भंगला आहे आणि माझे दिवस संपले आहे,
2 खात्रीने निंदक माझ्याबरोबर आहेत,
3 मला आता शपथ दे, तुझ्यामध्ये तूच मला जामीन हो,
4 तू माझ्या मित्रांची मने समजण्यास बंद करून टाकलीस,
5 जो आपल्या मित्रांशी धोका करून त्यास लुटीप्रमाणे परक्यांच्या हाती देतो,
6 त्याने माझे नाव सर्व लोकांसाठी निंदा असे केले आहे.
7 दु:ख आणि यातना यांनी माझे डोळे अंधुक झाले आहेत,
8 यामुळे चांगले लोक फार व्यथित झाले आहेत.
9 पण चांगली माणसे मात्र न्यायाने जीवन जगत राहतात. ज्याचे हात निर्मळ तो अधिकाधिक सामर्थ्यवान होत जाईल.
10 पण तुम्ही सर्व एकत्र या आणि या सगळ्यात माझीच चूक आहे हे मला दाखवून द्या
11 माझे आयुष्य संपत चालले आहे. माझ्या योजना धुळीला मिळवल्या गेल्या
12 माझे मित्र गोंधळून गेले आहेत. त्यांना रात्र दिवसासारखी वाटते.
13 थडगेच माझे नवीन घर असेल अशी मी आशा करतो.
14 जर मी गर्तेस म्हणालो तू माझा बाप
15 तर आता माझी आशा कोठे आहे?
16 माझी आशा माझ्याबरोबरच मृत्युलोकात जाईल