1 याहवेहप्रीत्यर्थ एक नवे गीत गा;
2 याहवेहसाठी स्तुतिस्तोत्रे गा; त्यांच्या नावाचा महिमा करा;
3 सर्व राष्ट्रांमध्ये त्यांचे गौरव,
4 कारण याहवेह थोर आणि स्तुतीस पात्र आहेत;
5 इतर देशांची दैवते केवळ मूर्ती आहेत.
6 राजवैभव आणि ऐश्वर्य त्यांच्या पुढे चालतात.
7 अहो राष्ट्रातील सर्व कुळांनो याहवेहला गौरव द्या,
8 याहवेहच्या नावाला योग्य ते गौरव द्या;
9 त्यांच्या पवित्रतेच्या ऐश्वर्याने याहवेहची उपासना करा;
10 राष्ट्रांमध्ये म्हणा, “याहवेह राज्य करतात.”
11 आकाशे हर्ष करो, पृथ्वी उल्लास करो;
12 शेते व त्यातील सर्वकाही अति आनंदाने नाचू लागोत;
13 सर्व सृष्टी याहवेहच्या सानिध्यात उल्हासित होवो, कारण ते येत आहेत,