1 हे याहवेह, माझी विनंती ऐकून मला उत्तर द्या,
2 माझे रक्षण करा, कारण मी तुम्हास समर्पित आहे;
3 हे प्रभू, माझ्यावर कृपा करा,
4 हे प्रभू, माझ्या जीवाला आनंद द्या,
5 हे प्रभू, तुम्ही क्षमाशील आणि चांगले आहात,
6 याहवेह, माझी प्रार्थना ऐका;
7 मी आपल्या संकटसमयी तुमचा धावा करेन,
8 हे प्रभू, सर्व दैवतांमध्ये तुमच्यासारखा परमेश्वर कुठेही नाही;
9 हे प्रभू, तुम्ही निर्माण केलेली सर्व राष्ट्रे,
10 कारण तुम्ही महान आहात आणि अद्भुत चमत्कार करता;
11 हे याहवेह, तुमचे मार्ग मला शिकवा,
12 माझ्या प्रभू परमेश्वरा, मी माझ्या संपूर्ण हृदयाने तुमचे स्तवन करेन;
13 कारण माझ्यावर तुम्ही अत्यंत प्रीती करता;
14 हे परमेश्वरा, उन्मत्त शत्रू माझ्यावर हल्ला करतात;
15 परंतु हे प्रभू, तुम्ही कृपाळू व दयाळू परमेश्वर आहात,
16 माझ्याकडे वळून मजवर दया करा;
17 तुमची माझ्यावरील कृपा दाखविणारे चिन्ह मला द्या,