1 परमेश्वरा, मला वाचवा;
2 दलदलीत मी खोल रुतत चाललो आहे;
3 अगदी थकून जाईपर्यंत मी मदतीसाठी आक्रोश केला आहे;
4 माझा विनाकारण द्वेष करणार्यांची संख्या
5 हे परमेश्वरा, माझा मूर्खपणा तुम्हाला माहीत आहे;
6 हे प्रभू, सर्वशक्तिमान याहवेह,
7 तुमच्याकरिता माझी विटंबना झाली आहे,
8 माझ्या कुटुंबासाठी मी परका आहे,
9 तुमच्या मंदिराविषयीच्या आवेशाने मला ग्रासून टाकले आहे,
10 जेव्हा मी शोक करून उपास केला,
11 जेव्हा मी गोणपाट पांघरले,
12 मी गावातील लोकांच्या कुत्सित चर्चेचा विषय झालो आहे
13 तरी याहवेह, तुमच्या प्रसन्नतेच्या वेळेसाठी
14 मला या दलदलीतून बाहेर काढा;
15 महापुरांच्या लोंढ्यात मला बुडू देऊ नका
16 याहवेह, तुमच्या प्रीतिपूर्ण दयेने माझ्या प्रार्थनेची उत्तरे द्या;
17 तुम्ही आपल्या सेवकापासून आपले मुख लपवू नका;
18 माझ्याजवळ या आणि माझा बचाव करा;
19 ते माझी कशी निंदा करतात, विटंबना आणि अप्रतिष्ठा करतात हे तुम्ही जाणता;
20 त्यांच्याकडून होणार्या तिरस्काराने माझे हृदय भग्न झाले आहे;
21 अन्न म्हणून त्यांनी मला विष दिले,
22 त्यांच्यासाठी तयार केलेला मेज सापळा असा होवो;
23 त्यांचे डोळे अंधकारमय होवोत म्हणजे त्यांना दिसणार नाही,
24 तुमचा सर्व क्रोध त्यांच्यावर ओता;
25 त्यांचे ठिकाण ओसाड पडो;
26 कारण ज्याला तुम्ही शासन केले, त्याचाच ते छळ करतात,
27 त्यांच्या दुष्कृत्यांच्या प्रमाणात तुम्ही त्यांना शासन करा
28 जीवनाच्या पुस्तकातून त्यांची नावे खोडली जावोत;
29 मी दुःखित आणि पीडित आहे—
30 मी परमेश्वराची स्तुती गीत गाऊन करेन
31 यामुळे याहवेहला, बैलाच्या किंवा शिंगे आणि खुरे असलेल्या
32 दीनजन हे पाहतील आणि ते हर्षभरित होतील—
33 याहवेह गरजूंचे ऐकतात
34 हे आकाशा, अगे पृथ्वी,
35 कारण परमेश्वर सीयोनचे रक्षण करतील
36 त्यांच्या सेवकांच्या मुलांनाही हा देश वतन म्हणून मिळेल,