1 अहो सर्व राष्ट्रांतील लोकहो, माझे शब्द ऐका;
2 उच्च व नीच अशा दोघांनी,
3 माझे मुख ज्ञानाचे शब्द बोलतात;
4 दृष्टांताकडे मी आपले कान लावेन;
5 संकटकाळी मला भिण्याचे कारण काय,
6 जे आपल्या संपत्तीवर भिस्त ठेवतात,
7 कोणत्याही व्यक्तीस इतर व्यक्तीचा उद्धार करण्यासाठी खंडणी भरता येत नाही;
8 कारण मनुष्याच्या जिवाच्या खंडणीचे मोल फार मोठे आहे,
9 जेणेकरून त्यांनी सर्वदा जिवंत राहावे
10 सुज्ञ माणसेही मरण पावतात, हे प्रत्येकाला दिसते;
11 त्यांनी आपल्या जमिनीला स्वतःची नावे दिलेली असली,
12 परंतु लोकांची संपत्ती कितीही असली,
13 ज्यांचा स्वतःवर भरवसा आहे,
14 ते आपल्या कबरांमध्ये मेंढरांप्रमाणे पडून राहतात;
15 परंतु परमेश्वर मला मृत्यूच्या सामर्थ्यापासून सोडवतील
16 जेव्हा इतर लोक श्रीमंत होतात,
17 कारण जेव्हा ते मरण पावतात, तेव्हा ते सोबत काहीही नेत नाहीत;
18 जेव्हा तो जिवंत होता, तेव्हा त्याने प्रशंसा प्राप्त केली—
19 तरी अखेरीस तो इतर प्रत्येकाप्रमाणे मरण पावतो
20 समज नसलेल्या मनुष्याजवळ संपत्ती असली,