Números 8

MARC vs NVI

Sair da comparação
NVI Nova Versão Internacional
1 मग याहवेह मोशेला म्हणाले,
1 Disse também o Senhor a Moisés:
2 “अहरोनाशी बोल व त्याला सांग, जेव्हा तू दिवे लावशील, तेव्हा सातही दिव्यांचा प्रकाश दीपस्तंभाच्या पुढील बाजूस पडावा.”
2 "Diga o seguinte a Arão: Quando você preparar as sete lâmpadas, estas deverão iluminar a área da frente do candelabro".
3 याहवेहने मोशेला आज्ञापिले होते त्याप्रमाणेच अहरोनाने केले; त्याने दीपस्तंभाच्या समोरील बाजूस दिवे लावले.
3 Arão assim fez; dispôs as lâmpadas de modo que estivessem voltadas para a frente do candelabro, como o Senhor tinha ordenado a Moisés.
4 दीपस्तंभ अशाप्रकारे घडविला गेला होता: जसे याहवेहने मोशेला दाखविले होते त्या नमुन्याप्रमाणेच तो त्याच्या बैठकीपासून त्याच्या फुलांपर्यंत सोन्याने घडविला होता.
4 O candelabro foi feito da seguinte maneira: de ouro batido do pedestal às flores, conforme o modelo que o Senhor tinha mostrado a Moisés.
5 याहवेह मोशेला म्हणाले,
5 O Senhor disse a Moisés:
6 “लेव्यांना सर्व इस्राएली लोकांमधून घेऊन त्यांना विधीनुसार शुद्ध कर.
6 "Separe os levitas do meio dos israelitas e os purifique.
7 त्यांना शुद्ध करण्यासाठी तू असे कर: त्यांच्यावर शुद्धीकरणाचे पाणी शिंपडावे; मग त्यांनी आपल्या संपूर्ण अंगावरून वस्तरा फिरवावा व आपले कपडे धुवावे. अशाप्रकारे ते स्वतःला शुद्ध करतील.
7 A purificação deles será assim: você aspergirá a água da purificação sobre eles; fará com que rapem o corpo todo e lavem as roupas, para que se purifiquem.
8 मग त्यांनी एक गोर्‍हा घ्यावा व त्याबरोबरचे अन्नार्पण जे जैतुनाच्या तेलात मळलेले सपीठ आणावे; आणि पापार्पणासाठी आणखी एक गोर्‍हा आणावा.
8 Depois eles trarão um novilho com a oferta de cereal da melhor farinha amassada com óleo; e você trará um segundo novilho como oferta pelo pecado.
9 लेव्यांना सभामंडपाच्या समोर घेऊन यावे व सर्व इस्राएल समुदायाला एकत्र करावे.
9 Você levará os levitas para a frente da Tenda do Encontro e reunirá toda a comunidade de Israel.
10 लेव्यांना याहवेहपुढे सादर करावे व इस्राएली लोकांनी आपले हात त्यांच्यावर ठेवावेत.
10 Levará os levitas à presença do Senhor, e os israelitas imporão as mãos sobre eles.
11 अहरोनाने इस्राएली लोकांच्या वतीने हेलावणीचे अर्पण म्हणून लेव्यांना याहवेहसमोर सादर करावे, म्हणजे ते याहवेहची सेवा करण्याकरिता तयार होतील.”
11 Arão apresentará os levitas ao Senhor como oferta ritualmente movida da parte dos israelitas: eles serão dedicados ao trabalho do Senhor.
12 मग लेव्यांनी गोर्‍ह्यांच्या डोक्यावर आपले हात ठेवावेत, त्यातील एक गोर्‍हा याहवेहला पापार्पण म्हणून अर्पण करावा आणि दुसरा लेव्यांसाठी प्रायश्चित म्हणून होमार्पण करावा.
12 "Depois que os levitas impuserem as mãos sobre a cabeça dos novilhos, você oferecerá um novilho como oferta pelo pecado e o outro como holocausto ao Senhor, para fazer propiciação pelos levitas.
13 मग तू लेव्यांना अहरोन आणि त्याच्या पुत्रांसमोर उभे करावे आणि त्यांना हेलावणीचे अर्पण म्हणून याहवेहला सादर करावे.
13 Disponha os levitas em frente de Arão e dos filhos dele e apresente-os como oferta movida ao Senhor.
14 अशाप्रकारे तू लेवी लोकांना माझ्यासाठी इतर इस्राएली लोकांपासून वेगळे करावेस म्हणजे लेवी माझे होतील.
14 Dessa maneira você separará os levitas do meio dos israelitas, e os levitas serão meus.
15 तू लेवींना शुद्ध करून हेलावणीचे अर्पण म्हणून मला सादर केल्यानंतर, त्यांनी आपले काम करण्याकरिता सभामंडपात यावे.
15 "Depois que você purificar os levitas e os apresentar como oferta movida, eles entrarão na Tenda do Encontro para ministrar.
16 इस्राएली लोकांमधून ते सर्वस्वी मला समर्पित आहेत. प्रत्येक इस्राएली स्त्रीच्या प्रथम जन्मलेल्या पुरुषाऐवजी, मी त्यांना आपलेसे करून घेतले आहे.
16 Eles são os israelitas que deverão ser inteiramente dedicados a mim. Eu os separei para serem meus em lugar dos primogênitos, do primeiro filho homem de cada mulher israelita.
17 इस्राएली लोकांतील प्रथम जन्मलेला प्रत्येक नर, तो मनुष्याचा असो किंवा पशूंचा, तो माझा आहे. जेव्हा मी इजिप्तचे सर्व प्रथम जन्मलेले मारून टाकले, तेव्हा मी त्यांना माझ्यासाठी पवित्र केले आहे.
17 Todo primogênito em Israel, entre os homens ou entre os rebanhos, é meu. Eu os separei para mim quando feri todos os primogênitos no Egito
18 आणि मी इस्राएली लोकांतील प्रथम जन्मलेल्यांच्या ऐवजी लेवींना घेतले आहे.
18 e escolhi os levitas em lugar de todos os primogênitos em Israel.
19 मी लेव्यांना सर्व इस्राएली लोकांमधून अहरोन व त्याच्या पुत्रांना भेट म्हणून दिले आहे, यासाठी की इस्राएली लोकांच्या वतीने त्यांनी सभामंडपात सेवा करावी व त्यांच्यासाठी प्रायश्चित करावे, म्हणजे इस्राएली लोक पवित्रस्थानाकडे जातील, तेव्हा कोणतीही पीडा त्यांचा नाश करणार नाही.
19 Dentre todos os israelitas, dediquei os levitas como dádivas a Arão e aos seus filhos; eles ministrarão na Tenda do Encontro em nome dos israelitas e farão propiciação por eles, para que nenhuma praga atinja os israelitas quando se aproximarem do santuário".
20 मोशे, अहरोन आणि सर्व इस्राएली समुदायांनी याहवेहने मोशेला आज्ञापिले होते त्याच प्रकारे लेव्यांना केले.
20 Moisés, Arão e toda a comunidade de Israel fizeram com os levitas como o Senhor tinha ordenado a Moisés.
21 लेवी लोकांनी स्वतःला शुद्ध केले आणि आपली वस्त्रे धुतली. मग अहरोनाने त्यांना हेलावणीचे अर्पण म्हणून याहवेहसमोर सादर केले व त्यांच्या शुद्धीकरणासाठी प्रायश्चित्त केले.
21 Os levitas se purificaram e lavaram suas roupas; e Arão os apresentou como oferta ritualmente movida perante o Senhor e fez propiciação por eles para purificá-los.
22 नंतर लेवी लोक अहरोन व त्याच्या पुत्रांच्या देखरेखीखाली सेवा करण्यासाठी सभामंडपात आले. लेव्यांच्या संबंधी याहवेहने मोशेला आज्ञापिले होते त्याचप्रमाणे त्यांनी केले.
22 Depois disso os levitas passaram a ministrar na Tenda do Encontro sob a supervisão de Arão e dos seus filhos. Fizeram com os levitas como o Senhor tinha ordenado a Moisés.
23 याहवेह मोशेला म्हणाले,
23 O Senhor disse ainda a Moisés:
24 “लेव्यांच्या संबंधी हा नियम लागू असावा: पंचवीस वर्षे व त्याहून अधिक वय असलेल्या पुरुषांनी सभामंडपामध्ये कार्यरत होण्यासाठी यावे.
24 "Isto diz respeito aos levitas: os homens de vinte e cinco anos para cima, aptos para servir, tomarão parte no trabalho que se faz na Tenda do Encontro,
25 पन्नासाव्या वर्षी त्यांनी त्यांच्या रोजच्या सेवेतून निवृत्त व्हावे व त्यानंतर काम करू नये.
25 mas aos cinqüenta anos deverão afastar-se do serviço regular e nele não mais trabalharão.
26 त्यांनी सभामंडपात आपल्या बांधवांना त्यांच्या कार्यात मदत करावी; परंतु त्यांनी स्वतः काम करू नये. याप्रकारे तू लेवी लोकांची कामे नेमून द्यावी.”
26 Poderão ajudar seus companheiros de ofício na responsabilidade de cuidar da Tenda do Encontro, mas eles mesmos não deverão fazer o trabalho. Assim você designará as responsabilidades dos levitas".

Ler em outra tradução

Comparar com outra