Números 36
MARC vs NTLH
1 योसेफाच्या वंशाच्या कुळातील, मनश्शेहचा पुत्र माखीरचा पुत्र गिलआदच्या कुटुंबाचे कुलप्रमुख मोशे व पुढारी, म्हणजे इस्राएली कुटुंबाच्या पुढाऱ्यांपुढे येऊन बोलले.
1 Os chefes de família dos grupos de famílias de Gileade, descendentes diretos de Maquir, Manassés e José, foram falar com Moisés e com os outros chefes de famílias israelitas. Eles disseram a Moisés:
2 ते म्हणाले, “माझ्या प्रभूला याहवेहने आज्ञा दिली की इस्राएली लोकांना हा देश चिठ्ठ्या टाकून वतन म्हणून द्यावा, याहवेहने तुला आज्ञा दिली की आमचा भाऊ सलाफहादचे वतन त्याच्या मुलींना द्यावे.
2 — O Senhor Deus ordenou que o senhor distribuísse a terra ao povo por sorteio . Ele também ordenou que o senhor desse a propriedade do nosso parente Zelofeade às suas filhas.
3 परंतु त्यांनी जर इस्राएलातील इतर गोत्रातील पुरुषांशी लग्न केले, तर त्यांचे वतन आमच्या पूर्वजांच्या वतनातून काढून ज्या गोत्रात त्या लग्न करून जातील त्यांच्यात जोडले जाईल. म्हणजे आम्हाला मिळालेल्या वतनाचा भाग काढून घेतला जाईल.
3 Porém, se elas casarem com homens de outra tribo israelita, a terra que foi dada a elas deixará de pertencer à nossa tribo e passará a ser da tribo daqueles com quem elas casarem. Assim irá diminuindo a parte que nos foi dada por sorteio.
4 आणि जेव्हा इस्राएल लोकांचे योबेल वर्ष येईल, तेव्हा त्यांचे वतन ज्या गोत्रात ते लग्न करून जातील त्यांच्यात जोडले जाईल आणि त्यांचे वतन आमच्या पूर्वजांच्या गोत्रातून काढून घेतले जाईल.”
4 Porém, quando chegar o Ano da Libertação, a terra delas ficará definitivamente para a tribo daqueles com quem elas casaram e não será mais nossa.
5 नंतर याहवेहच्या आज्ञेनुसार मोशेने इस्राएली लोकांना हा हुकूम दिला: “योसेफाच्या गोत्राचे वंशज जे म्हणत आहेत ते बरोबर आहे.
5 Então Moisés, conforme a ordem do Senhor , respondeu aos israelitas o seguinte: — Os homens da tribo de José têm razão. A ordem do
6 सलाफहादच्या कन्यांसंबंधी याहवेह अशी आज्ञा देतात: त्यांना आवडेल त्या व्यक्तीशी त्यांनी विवाह करावा, परंतु आपल्याच पित्याच्या गोत्राच्या कुळात त्यांनी विवाह करावा.
6 Elas podem casar com quem quiserem, contanto que seja com um homem de uma das famílias da tribo do seu pai.
7 इस्राएलचे वतन एका गोत्रातून दुसर्या गोत्रात जाऊ नये, तर प्रत्येक इस्राएली व्यक्तीने आपल्या पूर्वजांच्या गोत्राच्या वतनाला जपावे.
7 Desse modo as terras dos israelitas não passarão de uma tribo para outra. Pois os israelitas devem ficar ligados cada um à terra da tribo dos seus pais.
8 इस्राएली लोकांतील कोणत्याही गोत्रातील ज्या प्रत्येक मुलीला वतन मिळाले असेल, तिने आपल्या पित्याच्या गोत्राच्या कुळातील एखाद्या व्यक्तीशी विवाह करावा, यासाठी की प्रत्येक इस्राएली व्यक्तीला आपल्या पूर्वजांचे वतन मिळेल.
8 Todas as moças que tiverem terras numa tribo israelita deverão casar com alguém da família da tribo do seu pai.
9 कोणतेही वतन एका गोत्रातून दुसर्या गोत्रात जाणार नाही, तर इस्राएली लोकांच्या प्रत्येक गोत्राने आपल्या वतनाला जपावे.”
9 Desse modo cada israelita herdará a terra dos seus antepassados, e ela não passará de uma tribo para outra. Cada tribo continuará ligada à sua própria terra.
10 याहवेहने मोशेला दिलेल्या आज्ञेनुसार सलाफहादच्या कन्यांनी केले.
10 — ausente —
11 सलाफहादच्या कन्या म्हणजे महलाह, तिरजाह, होगलाह, मिल्काह व नोआहने त्यांच्या पित्याच्या चुलत भावांशी विवाह केला.
11 — ausente —
12 त्यांनी योसेफाचा पुत्र मनश्शेहच्या गोत्राच्या कुळातच विवाह केला व त्यांचे वतन त्यांच्या पित्याच्या गोत्रात व कुळातच राहिले.
12 Elas casaram dentro dos grupos de famílias da tribo de Manassés, filho de José, e as suas terras ficaram na tribo do pai delas.
13 मोआबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देनकडे मोशेद्वारे याहवेहने इस्राएली लोकांसाठी ज्या आज्ञा व नियम लावून दिले ते हेच आहेत.
13 Foram essas as leis e os mandamentos que o Senhor deu ao povo de Israel por meio de Moisés nas planícies de Moabe, perto do rio Jordão, na altura de Jericó, que ficava no outro lado do rio.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?