Números 32
MARC vs ARA
1 रऊबेन गोत्राचे लोक व गाद गोत्राच्या लोकांकडे मोठी खिल्लारे व कळपे होती. त्यांनी पाहिले की याजेर आणि गिलआद हे प्रांत कळपासाठी उत्तम आहेत.
1 Os filhos de Rúben e os filhos de Gade tinham gado em muitíssima quantidade; e viram a terra de Jazer e a terra de Gileade, e eis que o lugar era lugar de gado.
2 म्हणून गाद गोत्राचे व रऊबेन गोत्राचे लोक मोशे, एलअज़ार याजक व समाजाच्या पुढाऱ्यांकडे आले आणि म्हणाले,
2 Vieram, pois, os filhos de Gade e os filhos de Rúben e falaram a Moisés, e ao sacerdote Eleazar, e aos príncipes da congregação, dizendo:
3 “अतारोथ, दिबोन, याजेर, निमराह, हेशबोन, एलिआलेह, सेबाम, नबो व बेओन;
3 Atarote, Dibom, Jazer, Ninra, Hesbom, Eleale, Sebã, Nebo e Beom,
4 हा प्रांत जो याहवेहने इस्राएली लोकांपुढे कब्जा केला आहे, तो गुरांसाठी उत्तम आहे आणि तुझ्या सेवकांजवळ गुरे आहेत.”
4 a terra que o Senhor feriu diante da congregação de Israel é terra de gado; e os teus servos têm gado.
5 ते म्हणाले, “जर आम्ही तुझ्या दृष्टीत कृपा पावलो असलो तर हा प्रदेश तुझ्या सेवकांना आमचे वतन असा दिला जावा. आम्हाला यार्देनच्या पलीकडे नेऊ नकोस.”
5 Disseram mais: Se achamos mercê aos teus olhos, dê-se esta terra em possessão aos teus servos; e não nos faças passar o Jordão.
6 मोशे गाद गोत्राच्या व रऊबेन गोत्राच्या लोकांना म्हणाला, “इस्राएलमधील तुमचे इतर भाऊ युद्धाला जातील तेव्हा तुम्ही इथे बसून राहावे काय?
6 Porém Moisés disse aos filhos de Gade e aos filhos de Rúben: Irão vossos irmãos à guerra, e ficareis vós aqui?
7 याहवेहने जो देश त्यांना देऊ केला आहे, त्यात जाण्यासाठी तुम्ही इस्राएली लोकांना का निराश करता?
7 Por que, pois, desanimais o coração dos filhos de Israel, para que não passem à terra que o Senhor lhes deu?
8 मी तुमच्या पूर्वजांना कादेश-बरनेआपासून देश हेरायला पाठवले तेव्हाही त्यांनी असेच केले होते.
8 Assim fizeram vossos pais, quando os enviei de Cades-Barneia a ver esta terra.
9 अष्कोलच्या खोर्यापर्यंत गेल्यानंतर त्यांनी देश पाहिला व जो देश याहवेहने त्यांना दिला होता त्यात जाण्यापासून त्यांनी इस्राएली लोकांना निराश केले.
9 Chegando eles até ao vale de Escol e vendo a terra, descorajaram o coração dos filhos de Israel, para que não viessem à terra que o Senhor lhes tinha dado.
10 त्या दिवशी याहवेहचा क्रोध भडकला आणि त्यांनी ही शपथ वाहिली:
10 Então, a ira do Senhor se acendeu naquele mesmo dia, e jurou, dizendo:
11 ‘कारण त्यांनी पूर्ण अंतःकरणाने मला अनुसरले नाही, म्हणून इजिप्तमधून बाहेर येताना ज्यांचे वय वीस वर्षे व त्याहून अधिक होते त्यातील एकही, जो देश मी अब्राहाम, इसहाक व याकोबाला शपथ घेऊन देऊ केला तो पाहणार नाही;
11 Certamente, os varões que subiram do Egito, de vinte anos para cima, não verão a terra que prometi com juramento a Abraão, a Isaque e a Jacó, porquanto não perseveraram em seguir-me,
12 कनिज्जी यफुन्नेहचा पुत्र कालेब आणि नूनाचा पुत्र यहोशुआ मात्र तो पाहतील, कारण त्यांनी याहवेहला पूर्ण हृदयाने अनुसरले.’
12 exceto Calebe, filho de Jefoné, o quenezeu, e Josué, filho de Num, porque perseveraram em seguir ao Senhor .
13 याहवेहचा क्रोध इस्राएलवर भडकला व ज्या पिढीने याहवेहच्या दृष्टीने दुष्टाई केली होती त्या सर्वांचा नाश होईपर्यंत याहवेहने इस्राएली लोकांना चाळीस वर्षे रानात भटकण्यास लावले.
13 Pelo que se acendeu a ira do Senhor contra Israel, e fê-los andar errantes pelo deserto quarenta anos, até que se consumiu toda a geração que procedera mal perante o Senhor .
14 “आणि पाहा, पातक्यांच्या पिल्लांनो, इस्राएलावर याहवेहचा राग आणखी वाढविण्यासाठी तुम्ही तुमच्या पित्याच्या जागी उभे राहिला आहात.
14 Eis que vós, raça de homens pecadores, vos levantastes em lugar de vossos pais, para aumentardes ainda o furor da ira do Senhor contra Israel.
15 जर तुम्ही याहवेहच्या मागे चालण्यापासून दूर फिराल, तर याहवेह या इस्राएली लोकांना पुन्हा रानात सोडून देतील व तुम्ही त्यांच्या नाशास कारणीभूत ठराल.”
15 Se não quiserdes segui-lo, também ele deixará todo o povo, novamente, no deserto, e sereis a sua ruína.
16 नंतर ते मोशेकडे येऊन त्याला म्हणाले, “येथे आम्ही आमच्या गुरामेंढरांसाठी मेंढवाडे व आमच्या स्त्रिया व लेकरांसाठी नगरे बांधू.
16 Então, se chegaram a ele e disseram: Edificaremos currais aqui para o nosso gado e cidades para as nossas crianças;
17 परंतु आम्ही स्वतःला युद्धासाठी सशस्त्र करू व इस्राएली लोकांना त्यांच्या ठिकाणी पोहचवेपर्यंत त्यांच्यापुढे जाऊ. तोपर्यंत आमच्या स्त्रिया व लेकरे देशातील रहिवाशांपासून तटबंदीच्या नगरात सुरक्षित राहतील.
17 porém nós nos armaremos, apressando-nos adiante dos filhos de Israel, até que os levemos ao seu lugar; e ficarão as nossas crianças nas cidades fortes, por causa dos moradores da terra.
18 प्रत्येक इस्राएली व्यक्तीला आपले वतन मिळेपर्यंत आम्ही आमच्या घरी परत जाणार नाही.
18 Não voltaremos para nossa casa até que os filhos de Israel estejam de posse, cada um, da sua herança.
19 यार्देन नदीच्या पलीकडे त्यांच्याबरोबर आम्ही कोणतेही वतन घेणार नाही, कारण आमचे वतन आम्हाला यार्देनेच्या पूर्वेस मिळाले आहे.”
19 Porque não herdaremos com eles do outro lado do Jordão, nem mais adiante, porquanto já temos a nossa herança deste lado do Jordão, ao oriente.
20 तेव्हा मोशे त्यांना म्हणाला, “जर तुम्ही हे कराल, म्हणजे जर तुम्ही याहवेहसमोर युद्धासाठी स्वतःला हत्यारबंद कराल
20 Então, Moisés lhes disse: Se isto fizerdes assim, se vos armardes para a guerra perante o Senhor ,
21 आणि याहवेह आपल्या शत्रूंना आपल्यासमोरून घालवून देईपर्यंत तुम्ही सर्व जे हत्यारबंद झालेले आहात, ते याहवेहच्या पुढे यार्देन पार कराल;
21 e cada um de vós, armado, passar o Jordão perante o Senhor , até que haja lançado fora os seus inimigos de diante dele,
22 तर जेव्हा याहवेहपुढे देश ताब्यात घेतला जाईल, तेव्हा तुम्ही परत जा व याहवेहच्या व इस्राएलच्या कर्तव्यातून तुम्ही मुक्त व्हाल आणि हा देश याहवेहसमोर तुमचे वतन होईल.
22 e a terra estiver subjugada perante o Senhor , então, voltareis e sereis desobrigados perante o Senhor e perante Israel; e a terra vos será por possessão perante o Senhor .
23 “परंतु तुम्ही असे करण्यास चुकला, तर तुम्ही याहवेहविरुद्ध पाप कराल; आणि खचितच तुमचे पाप तुम्हाला शोधणार.
23 Porém, se não fizerdes assim, eis que pecastes contra o Senhor ; e sabei que o vosso pecado vos há de achar.
24 तुमच्या स्त्रिया व लेकरांकरिता नगरे व तुमच्या गुरामेंढरांकरिता वाडे बांधा, परंतु तुम्ही वचन दिल्याप्रमाणे करा.”
24 Edificai vós cidades para as vossas crianças e currais para as vossas ovelhas; e cumpri o que haveis prometido.
25 गाद आणि रऊबेन गोत्राच्या लोकांनी मोशेला म्हटले, “आम्ही तुझे सेवक, आमच्या प्रभूच्या आज्ञेप्रमाणे करू.
25 Então, os filhos de Gade e os filhos de Rúben falaram a Moisés, dizendo: Como ordena meu senhor, assim farão teus servos.
26 आमची लेकरे, स्त्रिया, आमचे कळप आणि गुरे या ठिकाणी गिलआदाच्या शहरांमध्ये राहतील.
26 Nossas crianças, nossas mulheres, nossos rebanhos e todos os nossos animais estarão aí nas cidades de Gileade,
27 पण तुझे सेवक, म्हणजे युद्धासाठी हत्यारबंद झालेला प्रत्येक पुरुष, जसे आमचे प्रभू सांगतात त्याप्रमाणेच युद्धासाठी याहवेहपुढे पार जातील.”
27 mas os teus servos passarão, cada um armado para a guerra, perante o Senhor , como diz meu senhor.
28 नंतर मोशेने एलअज़ार याजकाला व नूनाचा पुत्र यहोशुआ आणि इस्राएली गोत्राच्या कुटुंबप्रमुखांना आज्ञा दिली.
28 Então, Moisés deu ordem a respeito deles a Eleazar, o sacerdote, e a Josué, filho de Num, e aos cabeças das casas dos pais das tribos dos filhos de Israel;
29 मोशे त्यांना म्हणाला, “जर गाद आणि रऊबेन गोत्राचे लोक, त्यांच्यातील प्रत्येक पुरुष जो युद्धासाठी हत्यारबंद झालेला, याहवेहसमोर तुमच्याबरोबर यार्देन पार करतील, जेव्हा तुमच्यापुढे देश ताब्यात घेतला जाईल, तेव्हा तुम्ही गिलआदाचा प्रांत त्यांना त्यांचे वतन म्हणून द्यावा.
29 e disse-lhes: Se os filhos de Gade e os filhos de Rúben passarem convosco o Jordão, armado cada um para a guerra, perante o Senhor , e a terra estiver subjugada diante de vós, então, lhes dareis em possessão a terra de Gileade;
30 पण ते जर तुमच्याबरोबर हत्यारबंद होऊन पार गेले नाहीत, तर त्यांनी कनान देशात तुमच्याबरोबर वतन स्वीकारावे.”
30 porém, se não passarem, armados, convosco, terão possessões entre vós na terra de Canaã.
31 गाद आणि रऊबेन गोत्राच्या लोकांनी उत्तर दिले, “तुझे सेवक तेच करतील जे याहवेहने सांगितले आहे.
31 Responderam os filhos de Gade e os filhos de Rúben, dizendo: O que o Senhor disse a teus servos, isso faremos.
32 आम्ही हत्यारबंद होऊन याहवेहपुढे कनान देशात पार जाऊ, परंतु आमचे वतन यार्देनेच्या अलीकडे असणार.”
32 Passaremos, armados, perante o Senhor à terra de Canaã e teremos a possessão de nossa herança deste lado do Jordão.
33 तेव्हा मोशेने गाद गोत्राचे लोक, रऊबेन गोत्राचे लोक आणि योसेफाचा पुत्र मनश्शेहचे अर्ध्या गोत्रांना अमोर्यांचा राजा सीहोनाचे राज्य आणि बाशानचा राजा ओगच्या राज्याचा सर्व प्रदेश, शहरे व चहूकडील नगरे दिली.
33 Deu Moisés aos filhos de Gade, e aos filhos de Rúben, e à meia tribo de Manassés, filho de José, o reino de Seom, rei dos amorreus, e o reino de Ogue, rei de Basã: a terra com as cidades e seus distritos, as cidades em toda a extensão do país.
34 गाद गोत्राच्या लोकांनी दिबोन, अतारोथ, अरोएर,
34 Os filhos de Gade edificaram Dibom, Atarote e Aroer;
35 अटरोथ-शोफान, याजेर, योगबेहाह,
35 Atarote-Sofã, Jazer e Jogbeá;
36 बेथ-निमराह व बेथ-हारान ही सर्व तटबंदीची नगरे बांधली व त्यांच्या कळपासाठी मेंढवाडे सुद्धा बांधले.
36 Bete-Ninra e Bete-Harã, cidades fortificadas, e currais de ovelhas.
37 रऊबेन गोत्राच्या लोकांनी हेशबोन, एलिआलेह, आणि किर्याथाईमची पुनर्बांधणी केली,
37 Os filhos de Rúben edificaram Hesbom, Eleale e Quiriataim;
38 याशिवाय नबो, बआल-मेओन (यांची नावे बदलली गेली) व सिबमाह हे देखील. ज्या नगरांची त्यांनी पुनर्बांधणी केली त्या नगरांना त्यांनीच नावे दिली.
38 Nebo e Baal-Meom, mudando-lhes o nome, e Sibma; e deram outros nomes às cidades que edificaram.
39 मनश्शेहचा पुत्र माखीरचे वंशज गिलआद प्रांताकडे गेले, त्यावर ताबा करून तिथे असलेल्या अमोरी लोकांना तिथून घालवून दिले.
39 Os filhos de Maquir, filho de Manassés, foram-se para Gileade, e a tomaram, e desapossaram os amorreus que estavam nela.
40 म्हणून मोशेने मनश्शेहचे वंशज माखीरी लोकांना गिलआद प्रांत देऊ केला आणि ते तिथे स्थायिक झाले.
40 Deu, pois, Moisés Gileade a Maquir, filho de Manassés, o qual habitou nela.
41 मनश्शेहचे वंशज याईरी लोकांनी एका नगराला ताब्यात घेतले व त्याचे नाव हव्वोथ-याईर असे ठेवले.
41 Foi Jair, filho de Manassés, e tomou as suas aldeias; e chamou-lhes Havote-Jair.
42 आणि नोबाहने केनाथ आणि त्याच्या परिसरातील वस्त्या ताब्यात घेतल्या व त्याला नोबाह असे आपलेच नाव दिले.
42 Foi Noba e tomou a Quenate com as suas aldeias; e chamou-lhe Noba, segundo o seu nome.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?