Números 18
MARC vs ARIB
1 याहवेह अहरोनाला म्हणाले, “पवित्रस्थानासंबंधी झालेल्या अन्यायास तू, तुझे पुत्र आणि तुझे घराणे जबाबदार असणार व याजकपणासंबंधीच्या अपराधासही तू व तुझे पुत्र जबाबदार असणार.
1 Depois disse o Senhor a Arão: Tu e teus filhos, e a casa de teu pai contigo, levareis a iniqüidade do santuário; e tu e teus filhos contigo levareis a iniqüidade do vosso sacerdócio.
2 तू व तुझे पुत्र कराराच्या नियमाच्या कोशापुढे जेव्हा सेवा करतात तेव्हा तुझ्याशी जडून व तुला मदत करण्यासाठी लेवी वंशातील, तुझ्या पूर्वजांच्या गोत्रातील तुझ्या बांधवांना आपल्यासोबत आण.
2 Faze, pois, chegar contigo também teus irmãos, a tribo de Levi, a tribo de teu pai, para que se ajuntem a ti, e te sirvam; mas tu e teus filhos contigo estareis perante a tenda do testemunho.
3 ते तुला जबाबदार असणार व त्यांनी मंडपातील सर्व कर्तव्ये पार पाडावीत, परंतु त्यांनी पवित्रस्थानाच्या पात्रांजवळ किंवा वेदीजवळ जाऊ नये. नाहीतर ते व तुम्हीही मृत व्हाल.
3 Eles cumprirão as tuas ordens, e assumirão o encargo de toda a tenda; mas não se chegarão aos utensílios do santuário, nem ao altar, para que não morram, assim eles, como vós.
4 त्यांनी तुझ्याशी जडून सभामंडपाच्या सेवेसंबंधी—म्हणजेच मंडपातील सर्व कामासंबंधी जबाबदार असावे—आणि जिथे तू असणार तिथे इतर कोणीही जवळ येऊ नये.
4 Mas se ajuntarão a ti, e assumirão o encargo da tenda da revelação, para todo o serviço da tenda; e o estranho não se chegará a vós.
5 “पवित्रस्थान व वेदीच्या सेवेसंबंधी तू जबाबदार असावे, यासाठी की इस्राएली लोकांवर माझा क्रोध पुन्हा भडकू नये.
5 Vós, pois, assumireis o encargo do santuário e o encargo do altar, para que não haja outra vez furor sobre os filhos de Israel.
6 इस्राएली लोकांतून सभामंडपातील सेवाकार्य करण्यासाठी, याहवेहसाठी समर्पित म्हणून लेवी वंशातील तुझे सोबती तुझ्यासाठी भेट म्हणून निवडले आहेत.
6 Eis que eu tenho tomado vossos irmãos, os levitas, do meio dos filhos de Israel; eles vos são uma dádiva, feita ao Senhor, para fazerem o serviço da tenda da revelação.
7 परंतु वेदी व आतील पडद्यासंबंधी केवळ तू व तुझ्या पुत्रांनीच याजक म्हणून पवित्रस्थानातील पडद्यामागील आणि वेदीवरील पवित्र सेवा करावी. याजकपणाची सेवा मी तुला भेट म्हणून देत आहे. इतर कोणीही जे पवित्रस्थानाच्या जवळ येतील त्यांना जिवे मारावे.”
7 Mas tu e teus filhos contigo cumprireis o vosso sacerdócio no tocante a tudo o que é do altar, e a tudo o que está dentro do véu; nisso servireis. Eu vos dou o sacerdócio como dádiva ministerial, e o estranho que se chegar será morto.
8 याहवेह अहरोनाला म्हणाले, मला सादर केलेल्या अर्पणांवर मी स्वतः तुला प्रभारी नेमले आहे; सर्व पवित्र अर्पणे जी इस्राएली लोक मला देतात ती मी तुला व तुझ्या पुत्रांना तुमचा वाटा, तुमचा शाश्वत भाग म्हणून देत आहे.
8 Disse mais o Senhor a Arão: Eis que eu te tenho dado as minhas ofertas alçadas, com todas as coisas santificadas dos filhos de Israel; a ti as tenho dado como porção, e a teus filhos como direito perpétuo.
9 जो अग्नीपासून राखला जातो तो अर्पणातील परमपवित्र भाग तुझा व्हावा. परमपवित्र अर्पणे म्हणून ते माझ्यासाठी जे आणतात त्या सर्वांतून, ती अन्नार्पणे किंवा पापार्पणे किंवा दोषार्पणे असो, तो वाटा तुझा व तुझ्या पुत्रांचा आहे.
9 Das coisas santíssimas reservadas do fogo serão tuas todas as suas ofertas, a saber, todas as ofertas de cereais, todas as ofertas pelo pecado e todas as ofertas pela culpa, que me entregarem; estas coisas serão santíssimas para ti e para teus filhos.
10 जसे परमपवित्र वस्तूतील, तसे ते खावे; प्रत्येक पुरुषाने ते खावे, ते तुम्ही पवित्र मानावे.
10 Num lugar santo as comerás; delas todo varão comerá; santas te serão.
11 हे देखील तुझे असावे: इस्राएली लोकांच्या हेलावणीच्या अर्पणातील ज्या भेटी बाजूला काढून ठेवल्या जातात, त्या मी तुला व तुझ्या पुत्रांना व तुझ्या कन्यांना तुमचा शाश्वत वाटा म्हणून देतो. तुझ्या घरातील जे कोणी विधीनुसार शुद्ध असतील त्या प्रत्येकाने ते खावे.
11 Também isto será teu: a oferta alçada das suas dádivas, com todas as ofertas de movimento dos filhos de Israel; a ti, a teus filhos, e a tuas filhas contigo, as tenho dado como porção, para sempre. Todo o que na tua casa estiver limpo, comerá delas.
12 जैतुनाचे सर्वोत्तम तेल आणि सगळा उत्तम नवा द्राक्षारस आणि धान्याच्या हंगामाचे प्रथमफळ म्हणून याहवेहला लोक देतात ते मी तुला देत आहे.
12 Tudo o que do azeite há de melhor, e tudo o que do mosto e do grão há de melhor, as primícias destes que eles derem ao Senhor, a ti as tenho dado.
13 आपल्या भूमीचे सर्व प्रथमफळ लोक याहवेहकडे आणतात ते तुझे होईल. तुझ्या घरातील जे कोणी विधीनुसार शुद्ध आहेत त्या प्रत्येकाने ते खावे.
13 Os primeiros frutos de tudo o que houver na sua terra, que trouxerem ao Senhor, serão teus. Todo o que na tua casa estiver limpo comerá deles.
14 इस्राएलात याहवेहला समर्पित केलेली प्रत्येक वस्तू तुझी होईल.
14 Toda coisa consagrada em Israel será tua.
15 उदरातून जन्मलेले प्रत्येक प्रथम जन्मलेले संतान, जे याहवेहला अर्पिलेले आहेत, मग ते मनुष्याचे असो किंवा जनावरांचे, ते तुझे होतील. परंतु प्रत्येक प्रथम जन्मलेल्या पुत्राला व प्रत्येक अशुद्ध जनावराच्या नर वत्साला तू खंडणी भरून सोडवावे.
15 Todo primogênito de toda a carne, que oferecerem ao Senhor, tanto de homens como de animais, será teu; contudo os primogênitos dos homens certamente remirás; também os primogênitos dos animais imundos remirás.
16 ते एक महिन्याचे झाल्यावर, पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार ठरवलेली खंडणीची किंमत जी पाच चांदीचे शेकेल, म्हणजेच वीस गेरा भरून त्यांची खंडणी भरावी.
16 Os que deles se houverem de remir, desde a idade de um mês os remirás, segundo a tua avaliação, por cinco siclos de dinheiro, segundo o siclo do santuário, que é de vinte jeiras.
17 गाईचे, मेंढीचे व शेळीचे प्रथमवत्स यांची तू खंडणी भरू नये; ते पवित्र आहे. त्यांचे रक्त वेदीवर शिंपडावे आणि त्यांची चरबी अन्नार्पण म्हणून जाळावी. हा याहवेहला संतोषविणारा सुगंध आहे.
17 Mas o primogênito da vaca, o primogênito da ovelha, e o primogênito da cabra não remirás, porque eles são santos. Espargirás o seu sangue sobre o altar, e queimarás a sua gordura em oferta queimada, de cheiro suave ao Senhor.
18 जसे ओवाळणीचा छातीचा भाग व उजवी मांडी तुझे आहेत, त्याचप्रमाणे त्यांचे मांस सुद्धा तुझ्या वाट्याचे होईल.
18 E a carne deles será tua, bem como serão teus o peito da oferta de movimento e a coxa direita.
19 इस्राएली लोक याहवेहसाठी जी पवित्र अर्पणे आणतात, त्यातील जे काही बाजूला काढून ठेवले जाते, ते मी तुला आणि तुझ्या पुत्रांना व तुझ्या कन्यांना शाश्वत वाटा म्हणून देत आहे. हा याहवेहसमोर तुझ्यासाठी व तुझ्या संतानांसाठी सर्वकाळचा मिठाच्या करार आहे.
19 Todas as ofertas alçadas das coisas sagradas, que os filhos de Israel oferecerem ao Senhor, eu as tenho dado a ti, a teus filhos e a tuas filhas contigo, como porção, para sempre; é um pacto perpétuo de sal perante o Senhor, para ti e para a tua descendência contigo.
20 याहवेहने अहरोनाला म्हटले, “त्यांच्या देशात तुला वतन असणार नाही किंवा तुला त्यांच्यात कोणताही वाटा असणार नाही; इस्राएलमध्ये मी तुझा वाटा व तुझे वतन आहे.”
20 Disse também o Senhor a Arão: Na sua terra herança nenhuma terás, e no meio deles nenhuma porção terás; eu sou a tua porção e a tua herança entre os filhos de Israel.
21 लेवी वंश सभामंडपाची सेवा करताना जी कामे करतात त्याचा मोबदला म्हणून इस्राएलातून येणारा सर्व दशांश मी त्यांना त्यांचे वतन असे देत आहे.
21 Eis que aos filhos de Levi tenho dado todos os dízimos em Israel por herança, pelo serviço que prestam, o serviço da tenda da revelação.
22 येथून पुढे इस्राएली लोकांनी सभामंडपाजवळ जाऊ नये, नाहीतर त्यांच्या पापाचा परिणाम त्यांना भोगावा लागेल व ते मरतील.
22 Ora, nunca mais os filhos de Israel se chegarão à tenda da revelação, para que não levem sobre si o pecado e morram.
23 लेवी लोक सभामंडपामध्ये सेवा करतील आणि त्याविरोधात केलेल्या अपराधाची जबाबदारी ते स्वतः वाहतील. येणार्या पिढ्यांपर्यंत हा सर्वकाळचा नियम असेल. इस्राएलमध्ये त्यांना वतन मिळणार नाही.
23 Mas os levitas farão o serviço da tenda da revelação, e eles levarão sobre si a sua iniqüidade; pelas vossas gerações estatuto perpétuo será; e no meio dos filhos de Israel nenhuma herança terão.
24 त्याऐवजी इस्राएली लोक जो दशांश अर्पण म्हणून याहवेहला सादर करतात तो मी लेवींना वतन म्हणून देत आहे. म्हणूनच त्यांच्याबद्दल मी म्हटले: “त्यांना इस्राएलमध्ये वतन नसणार.”
24 Porque os dízimos que os filhos de Israel oferecerem ao Senhor em oferta alçada, eu os tenho dado por herança aos levitas; porquanto eu lhes disse que nenhuma herança teriam entre os filhos de Israel.
25 याहवेह मोशेला म्हणाले,
25 Disse mais o Senhor a Moisés:
26 “लेवी लोकांशी बोल व त्यांना सांग: ‘इस्राएलातून जो दशांश मी तुम्हाला तुमचे वतन म्हणून देतो, जेव्हा तो तुम्हाला मिळतो, त्या दशमांशातील दहावा हिस्सा याहवेहचे अर्पण म्हणून सादर करावा.
26 Também falarás aos levitas, e lhes dirás: Quando dos filhos de Israel receberdes os dízimos, que deles vos tenho dado por herança, então desses dízimos fareis ao Senhor uma oferta alçada, o dízimo dos dízimos.
27 तुमचे अर्पण खळ्यातील धान्य किंवा द्राक्षकुंडातील रसाप्रमाणे तुमच्यासाठी गणले जाईल.
27 E computar-se-á a vossa oferta alçada, como o grão da eira, e como a plenitude do lagar.
28 याप्रकारे इस्राएलातून जो दशांश तुम्हाला मिळतो त्यातून तुम्ही सुद्धा आपले अर्पण याहवेहला सादर करावे. या दशमांशातील जो याहवेहचा वाटा तो तुम्ही अहरोन याजकाला द्यावा.
28 Assim fareis ao Senhor uma oferta alçada de todos os vossos dízimos, que receberdes dos filhos de Israel; e desses dízimos dareis a oferta alçada do Senhor a Arão, o sacerdote.
29 तुम्हाला दिलेल्या प्रत्येक वस्तूतील सर्वोत्तम आणि अतिपवित्र भाग याहवेहचा भाग म्हणून तुम्ही सादर करावा.’
29 De todas as dádivas que vos forem feitas, oferecereis, do melhor delas, toda a oferta alçada do Senhor, a sua santa parte.
30 “लेव्यांना सांग: ‘जेव्हा तुम्ही सर्वोत्तम भाग सादर करतात, ते तुमच्यासाठी खळ्यातील किंवा द्राक्षकुंडातील उत्पन्न गणले जाईल.
30 Portanto lhes dirás: Quando fizerdes oferta alçada do melhor dos dízimos, será ela computada aos levitas, como a novidade da eira e como a novidade do lagar.
31 बाकीच्या अर्पणातून तू व तुझ्या घराण्याने कोणत्याही ठिकाणी खावे, कारण सभामंडपातील तुमच्या सेवेसाठी असलेले ते तुमचे वेतन आहे.
31 E o comereis em qualquer lugar, vós e as vossas famílias; porque é a vossa recompensa pelo vosso serviço na tenda da revelação.
32 सर्वोत्तम भाग सादर केल्यामुळे तुम्ही याबाबतीत दोषी ठरणार नाही; मग तुम्ही इस्राएली लोकांची अर्पणे विटाळविणार नाही व तुम्ही मरणार नाही.’ ”
32 Pelo que não levareis sobre vós pecado, se tiverdes alçado o que deles há de melhor; e não profanareis as coisas sagradas dos filhos de Israel, para que não morrais.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?