Números 11

MARC vs NAA

Sair da comparação
NAA Nova Almeida Atualizada 2017
1 मग असे झाले की लोक याहवेहसमोर असताना त्यांच्या कष्टांबद्दल तक्रार करू लागले. जेव्हा याहवेहने ते ऐकले तेव्हा त्यांचा राग भडकला आणि त्यांच्यामध्ये याहवेहचा अग्नी पेटला आणि छावणीच्या बाहेरील काही भाग भस्म झाला.
1 O povo se queixou de sua sorte aos ouvidos do Senhor . Quando o Senhor ouviu as reclamações, sua ira se acendeu, e fogo do Senhor ardeu entre eles e consumiu algumas extremidades do arraial.
2 जेव्हा लोकांनी मोशेकडे धावा केला व त्याने याहवेहकडे विनंती केली आणि अग्नी विझला.
2 Então o povo clamou a Moisés. Este orou ao Senhor , e o fogo se apagou.
3 म्हणून त्या जागेचे नाव तबेरा असे पडले, कारण याहवेहचा अग्नी त्यांच्यामध्ये पेटला होता.
3 Por isso aquele lugar foi chamado de Taberá, porque o fogo do Senhor se havia acendido entre eles.
4 नंतर त्यांच्याबरोबर असलेले निम्नस्तरातील मिश्र लोक अन्य भोजनाची लालसा धरू लागले आणि इस्राएली लोकही पुन्हा रडत म्हणू लागले, “आम्हाला खायला मांस असते तर किती बरे!
4 E o populacho que estava no meio deles veio a ter grande desejo das comidas dos egípcios. Também os filhos de Israel começaram a chorar outra vez, dizendo: — Quem nos dará carne para comer?
5 इजिप्त देशात आम्ही फुकट मासे खाल्ले; आणि काकड्या, खरबुजे, कंदभाजी, कांदे आणि लसूण यांची सुद्धा आम्हाला आठवण येते.
5 Lembramos dos peixes que comíamos de graça no Egito. Que saudade dos pepinos, dos melões, dos alhos silvestres, das cebolas e dos alhos!
6 परंतु आता आमची भूक नाहीशी झाली आहे; कारण या मान्न्याशिवाय आम्हाला दुसरे काहीच दिसत नाही!”
6 Mas agora a nossa alma está seca, e não vemos nada a não ser este maná.
7 मान्ना आकाराने धण्यासारखा असून रंगाने मोत्यासारखा होता.
7 O maná era como semente de coentro, e a sua aparência era semelhante à de bdélio.
8 लोक चोहीकडे जाऊन तो गोळा करीत असत आणि मग जात्यात दळीत किंवा उखळात कुटत असत. मग ते भांड्यात शिजवित किंवा त्याच्या भाकरी बनवित असत. त्याची चव जैतुनाच्या तेलात बनलेल्या भाकरीप्रमाणे असे.
8 O povo ia por toda parte e o colhia. Eles o moíam em moinhos ou o socavam em pilões. Depois o cozinhavam em panelas e dele faziam bolos. O sabor do maná era como o de bolos amassados com azeite.
9 रात्री जेव्हा छावणीवर दहिवर जमा होत असे तेव्हा मान्ना सुद्धा पडत असे.
9 Quando, de noite, descia o orvalho sobre o arraial, sobre este também caía o maná.
10 प्रत्येक घराण्यातील लोक आपआपल्या तंबूच्या दाराशी उभे राहून रडत होते आणि याहवेहचा त्यांच्यावर अतिशय क्रोध आला होता त्यामुळे मोशे अस्वस्थ झाला.
10 Então Moisés ouviu como o povo chorava por famílias, cada um à porta da sua tenda. O Senhor ficou muito irado, e Moisés também não gostou daquilo.
11 मोशेने याहवेहला विचारले, “तुमच्या सेवकावर हे कष्ट तुम्ही का आणले? तुम्ही असंतुष्ट व्हावे असे मी काय केले की तुम्ही या सर्व लोकांचे ओझे माझ्यावर लादावे?
11 Moisés disse ao Senhor : — Por que fizeste mal a teu servo, e por que não achei favor aos teus olhos, visto que puseste sobre mim a carga de todo este povo?
12 मी या सर्व लोकांचे गर्भधारण केले काय? त्यांना मी जन्म दिला काय? आई आपल्या तान्ह्या बाळाला घेते तसे मी यांना माझ्या उराशी घेऊन तुम्ही त्यांच्या पूर्वजांना शपथ घेऊन वचन दिलेल्या देशात मी घेऊन जावे असे तुम्ही मला का सांगता?
12 Será que fui eu quem concebeu todo este povo? Será que fui eu quem o deu à luz, para que me digas que o leve no colo, como a babá leva a criança que mama, até a terra que prometeste dar a seus pais?
13 या सर्व लोकांसाठी मी मांस कुठून आणावे? ते रडत माझ्याजवळ मागतात ‘आम्हाला खायला मांस दे!’
13 Onde eu poderia conseguir carne para dar a todo este povo? Pois chora diante de mim, dizendo: “Dê-nos carne para comer.”
14 मला एकट्याला या राष्ट्राला घेऊन जाता येत नाही! हे ओझे मला खूप जड आहे.
14 Eu sozinho não posso levar todo este povo, pois é pesado demais para mim.
15 तुम्ही मला असेच वागविणार असाल आणि तुमच्या दृष्टीत मी जर कृपा पावलो असलो तर मला मारून टाका. मी माझाच नाश पाहावा असे होऊ देऊ नये.”
15 Se me tratas assim, mata-me de uma vez. Se achei favor aos teus olhos, peço que não me deixes ver a minha miséria.
16 याहवेह मोशेला म्हणाले: “इस्राएली लोकांमधील सत्तर वडील ज्यांना तू पुढारी आणि अधिकारी म्हणून ओळखतो, त्यांना माझ्यासमोर आण. त्यांनी सभामंडपात यावे व तुझ्याबरोबर उभे राहावे.
16 O Senhor disse a Moisés: — Reúna para mim setenta homens dos anciãos de Israel, que você sabe que são anciãos e superintendentes do povo, e traga-os diante da tenda do encontro, para que estejam ali com você.
17 मी खाली येऊन तिथे तुझ्याशी बोलेन आणि जो आत्मा तुझ्यावर आहे, त्याचे काही सामर्थ्य मी घेऊन त्यांच्यावर ठेवेन. ते तुझ्याबरोबर लोकांचा भार वाहतील म्हणजे तुला एकट्याला तो वाहावा लागणार नाही.
17 Então descerei e ali falarei com você. Tirarei do Espírito que está sobre você e o porei sobre eles; e eles ajudarão você a levar a carga do povo, para que você não tenha de levá-la sozinho.
18 “लोकांना सांग: ‘उद्याच्या तयारीकरिता स्वतःला पवित्र करा, कारण उद्या त्यांना मांस खायला मिळेल. “आम्हाला मांस खायला मिळाले तर किती बरे! आम्ही इजिप्तमध्ये चांगले होतो!” हे तुमचे रडणे याहवेहने ऐकले आहे, आता याहवेह तुम्हाला मांस देणार आहेत आणि ते तुम्ही खाल.
18 Diga ao povo: “Santifiquem-se para amanhã e vocês comerão carne, porque vocês choraram aos ouvidos do Senhor , dizendo: ‘Quem nos dará carne para comer? A vida era melhor no Egito.’” Por isso o Senhor lhes dará carne e vocês poderão comer.
19 तुम्ही ते केवळ एक दिवस किंवा दोन दिवस, किंवा पाच दिवस, दहा, किंवा वीस दिवस,
19 Não comerão um dia, nem dois dias, nem cinco, nem dez, nem ainda vinte,
20 परंतु संपूर्ण एक महिना; ते तुमच्या नाकपुड्यातून बाहेर येईपर्यंत आणि ते तुम्हाला नकोसे वाटेपर्यंत ते तुम्ही खाल; कारण तुम्ही याहवेह जे तुमच्यामध्ये राहतात त्यांना नाकारले आहे, त्यांच्यासमोर रडत म्हणाला, “आम्ही इजिप्त का सोडले?” ’ ”
20 mas um mês inteiro, até que saia pelo nariz, até que fiquem com nojo dela, porque vocês rejeitaram o Senhor , que está no meio de vocês, e choraram diante dele, dizendo: “Por que saímos do Egito?”
21 पण मोशे म्हणाला, “इथे ज्या लोकांमध्ये मी आहे ते सहा लाख पुरुष पायदळ आहेत आणि तुम्ही म्हणता, ‘मी त्यांना एक महिनाभर मांस खायला देणार!’
21 Moisés, porém, respondeu: — Este povo no meio do qual estou é de seiscentos mil homens em pé, e tu dizes: “Eu lhes darei carne, e eles a comerão durante um mês inteiro.”
22 गुरे व शेरडेमेंढरे कापली तरी ते त्यांच्यासाठी पुरेसे होईल काय? समुद्रातील सर्व मासे पकडले तरी ते त्यांना पुरतील काय?”
22 Quantos rebanhos de ovelhas e de gado teríamos de matar, para que tivessem o suficiente? Ou será que bastaria, se ajuntássemos para eles todos os peixes do mar?
23 याहवेहने मोशेला उत्तर दिले, “याहवेहचा हात इतका आखूड आहे काय? माझे शब्द घडून येतात की नाही हे तू आता पाहशील.”
23 Porém o Senhor respondeu a Moisés: — Será que a mão do
24 मग मोशे निवासमंडपातून बाहेर आला आणि याहवेह जे काही बोलले ते त्याने लोकांना सांगितले. आणि त्याने सत्तर वडिलांना एकत्र करून तंबूच्या सभोवती उभे केले.
24 Moisés saiu e contou ao povo as palavras do Senhor . Ele reuniu setenta homens dos anciãos do povo e os pôs ao redor da tenda.
25 मग याहवेह मेघातून खाली उतरले व मोशेशी बोलले आणि याहवेहने मोशेवर असलेल्या आत्म्याचे काही सामर्थ्य घेऊन त्या सत्तर वडिलांवर ठेवले. ज्यावेळी आत्मा त्यांच्यावर स्थिर झाला, त्यावेळी त्यांनी भविष्यवाणी केली—परंतु पुन्हा असे केले नाही.
25 Então o Senhor desceu na nuvem e falou com Moisés. E, tirando do Espírito que estava sobre Moisés, o pôs sobre aqueles setenta anciãos. Quando o Espírito repousou sobre eles, profetizaram; mas isto nunca mais se repetiu.
26 पण दोघे पुरुष ज्यांची नावे एलदाद व मेदाद छावणीतच राहिले होते. वडिलांच्या यादीत त्यांची नावे होती, परंतु ते बाहेर तंबूकडे गेले नाही. तरी त्यांच्यावरही आत्मा उतरला आणि त्यांनी छावणीतच भविष्यवाणी केली.
26 Porém dois homens ficaram no arraial. Um se chamava Eldade, e o outro, Medade. O Espírito repousou sobre eles, porque estavam entre os inscritos, mesmo que não tivessem ido até a tenda; e profetizavam no arraial.
27 एका तरुण पुरुषाने धावत जाऊन मोशेला सांगितले, “एलदाद व मेदाद छावणीत भविष्यवाणी करीत आहेत.”
27 Então um jovem correu e anunciou a Moisés: — Eldade e Medade estão profetizando no arraial.
28 नूनाचा पुत्र यहोशुआ, जो तारुण्यापासून मोशेचा मदतनीस होता, तो म्हणाला, “मोशे, माझ्या स्वामी, त्यांना थांबवा!”
28 Josué, filho de Num, auxiliar de Moisés, um dos seus escolhidos, respondeu e disse: — Moisés, meu senhor, ordene que parem com isso.
29 पण मोशे म्हणाला, “माझ्यासाठी तू त्यांचा हेवा करतोस काय? माझी तर इच्छा आहे की, याहवेहचे सर्व लोक संदेष्टे असावेत आणि याहवेहने सर्व लोकांवर आपला आत्मा ठेवावा!”
29 Porém Moisés lhe disse: — Você está com ciúmes por mim? Eu gostaria que todo o povo do
30 नंतर मोशे व इस्राएलांचे वडीलजन छावणीकडे परतले.
30 Depois, Moisés se recolheu ao arraial, ele e os anciãos de Israel.
31 मग याहवेहकडून वारा वाहिला आणि समुद्रावरून लावे पक्षी आणले. आणि छावणीच्या सभोवती, एकंदर एकएक दिवसाच्या वाटेपर्यंत सर्व दिशेने सुमारे दोन हात उंचीचा थर पसरला.
31 Então soprou um vento do Senhor , e trouxe codornizes do mar, e as espalhou pelo arraial em todas as direções, numa extensão de cerca de um dia de caminhada, a uma altura de quase um metro sobre a terra.
32 त्या दिवशी लोकांनी बाहेर जाऊन तो संपूर्ण दिवस आणि रात्र आणि संपूर्ण दुसरा दिवस लावे पक्षी गोळा केले. कोणीही दहा होमेर वजनापेक्षा कमी गोळा केले नाही, मग त्यांनी ते छावणीत सर्वत्र पसरून ठेवले.
32 Todo aquele dia e toda aquela noite, e também no dia seguinte, o povo se levantou e recolheu as codornizes; o que menos recolheu teve dez montões; e as estenderam para si ao redor do arraial.
33 परंतु ते मांस त्यांच्या मुखातच होते आणि ते खाण्याच्या आधी याहवेहचा क्रोध लोकांविरुद्ध भडकला आणि याहवेहने त्यांना भयंकर पीडेने मारले.
33 Enquanto a carne ainda estava entre os seus dentes, antes que fosse mastigada, a ira do Senhor se acendeu contra o povo, e o feriu com uma terrível praga.
34 म्हणून त्या ठिकाणाचे नाव किब्रोथ-हत्ताव्वा असे पडले, कारण ज्यांनी इतर भोजनाची लालसा धरली त्या लोकांना त्या ठिकाणी पुरले.
34 Por isso aquele lugar foi chamado de Quibrote-Hataavá, porque ali foi sepultado o povo que teve o desejo das comidas dos egípcios.
35 किब्रोथ-हत्ताव्वा येथून लोकांनी हसेरोथकडे प्रवास केला आणि तिथे राहिले.
35 De Quibrote-Hataavá o povo partiu para Hazerote e ali ficou.

Ler em outra tradução

Comparar com outra