Jeremias 23

MARC

1 “धिक्कार असो त्या मेंढपाळांवर जे माझ्या कुरणातील मेंढरांचा नाश करतात व त्यांची पांगापांग करतात!” असे याहवेह जाहीर करतात.

2 म्हणून याहवेह, इस्राएलचे परमेश्वर मेंढपाळांना जे माझ्या लोकांची राखण करतात त्यांना असे म्हणतात: “कारण तुम्ही माझ्या कळपाची पांगापांग केली व त्यांना हुसकून लावले आणि त्यांची काळजी घेतली नाही, आता तुम्ही त्यांच्याशी केलेल्या दुष्टपणाबद्दल मी तुमच्यावर शिक्षांचा वर्षाव करेन.” असे याहवेह जाहीर करतात.

3 “जिथे माझ्या कळपाला मी पाठविले आहे, तिथून मी माझ्या कळपाच्या अवशेषाला त्या सर्व देशातून एकत्र करून पुन्हा त्यांच्या मेंढवाड्यात आणेन आणि मग ती मेंढरे फलद्रूप होतील व त्यांची संख्यावाढ होईल.

4 त्यांची काळजी घेण्यासाठी मी असे मेंढपाळ नेमीन, जे त्यांचे संगोपन करतील, व त्यांना पुन्हा भीती आणि दहशत वाटण्याचे कारण राहणार नाही, तसेच त्यातील कोणी हरविणारही नाही,” असे याहवेह जाहीर करतात.

5 याहवेह म्हणतात, “असे दिवस येत आहेत की,

6 तेव्हा यहूदीयाचे रक्षण होईल

7 “असे दिवस येत आहेत की,” याहवेह म्हणतात, “शपथ घेताना इस्राएलचे लोक, ‘ज्या जिवंत याहवेहने इस्राएली लोकांना इजिप्त देशातून बाहेर आणले, त्यांच्या जीविताची शपथ’ असे न म्हणता,

8 ‘ज्या जिवंत याहवेहने इस्राएली लोकांच्या वंशजांना उत्तरेकडील भूमीतून आणि ज्या वेगवेगळ्या देशात पांगविले होते, त्या देशातून परत आणले आहे. त्या जिवंत परमेश्वराची शपथ’ असे म्हणतील. मग ते स्वतःच्या भूमीवर वस्ती करतील.”

9 संदेष्ट्याविषयी:

10 सर्व देश व्यभिचाऱ्यांनी व्यापून टाकला आहे;

11 “याजक व संदेष्टे हे दोघेही देवहीन आहेत;

12 “म्हणूनच त्यांचे मार्ग निसरडे होतील;

13 “शोमरोनच्या संदेष्ट्यांमध्ये

14 आणि यरुशलेममधील संदेष्ट्यात

15 म्हणून सर्वसमर्थ याहवेह संदेष्ट्यांबद्धल असे म्हणतात:

16 सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात:

17 माझा तिरस्कार करणार्‍या बंडखोरांना ते म्हणतात,

18 परंतु त्यांचे वचन काय म्हणते हे बघण्यासाठी वा ऐकण्यासाठी,

19 पाहा, याहवेहचे भयावह वादळ पाहा.

20 याहवेहच्या अंतःकरणाचा उद्देश

21 या संदेष्ट्यांना मी पाठविलेले नाही,

22 जर ते माझ्या समक्षतेत उभे राहिले असते,

23 “मी केवळ जवळ असणाराच परमेश्वर आहे काय,

24 “माझ्यापासून कोणाला गुप्तस्थळी लपून राहता येईल काय?

25 “माझ्या नावाने खोटे संदेश देणारे संदेष्टे काय म्हणतात ते मी ऐकले आहे. ते म्हणतात, ‘मला स्वप्न पडले! मला स्वप्न पडले!’

26 हा प्रकार या खोट्या संदेष्ट्यांच्या अंतःकरणात किती काळ चालणार, जे त्यांच्या मनाच्या भ्रांतीने भविष्यवाणी करतात?

27 त्यांचे पूर्वज बआल दैवताच्या उपासनेमुळे मला विसरले, तसे आपली खोटी स्वप्ने सांगितल्यास माझे लोक मला विसरून जातील असा ते विचार करतात.

28 ज्या खोट्या संदेष्ट्यांना स्वप्ने पडतात, त्यांना ती स्वप्ने सांगू दे, परंतु ज्याला माझे वचन प्राप्त झाले आहे, त्याने ते विश्वासूपणे सांगावे. कोंड्याचा गव्हाशी काय संबंध आहे?” असे याहवेह जाहीर करतात.

29 याहवेह जाहीर करतात, “माझे वचन अग्नीसारखे ज्वलंत नाही काय? खडक फोडून त्यांचे तुकडे तुकडे करणार्‍या हातोडीसारखे ते नाही काय?

30 “जे आपले संदेश एकमेकांपासून माझ्यापासून चोरतात, अशा संदेष्ट्यांच्या मी विरुद्ध उभा आहे,” याहवेह जाहीर करतात.

31 होय, याहवेह जाहीर करतात, हा संदेश याहवेहकडून आहे, असे जाहीर करून स्वतःच्या जिभा हेलकावितात, अशा संदेष्ट्यांच्या मी विरुद्ध उभा आहे.

32 जे खोटी स्वप्ने सांगून भविष्यवाणी करतात, अशा संदेष्ट्यांच्या मी निश्चितच विरुद्ध उभा आहे, असे याहवेह जाहीर करतात. ते त्यांना वाचाळपणाने लबाडपणे सांगतात आणि माझ्या लोकांना पापाकडे नेतात. याहवेह म्हणतात, “मी त्यांना पाठविले नाही किंवा त्यांना निवडले नाही. या लोकांच्या भल्यासाठी यांचा काहीही उपयोग नाही,” असे याहवेह जाहीर करतात.

33 “या लोकांपैकी, या संदेष्ट्यांपैकी, किंवा याजकांपैकी कोणी तुला विचारेल, ‘अरे यिर्मयाह, आज याहवेहकडून काय संदेश आहे?’ तेव्हा तू त्यांना असे उत्तर द्यावेस, ‘कसला संदेश? मी तुम्हाला दूर लोटून टाकणार आहे, असे याहवेह जाहीर करतात.’

34 आणि ‘हा याहवेहकडून आलेला संदेश आहे,’ असे हक्काने सांगणारे संदेष्टे आणि याजक वा इतर कोणीही लोक या सर्वांना आणि त्यांच्या कुटुंबांना मी शासन करेन.

35 तुम्ही व इतर इस्राएली एकमेकांना विचारीत असता, ‘याहवेहने काय उत्तर दिले? किंवा याहवेहने काय सांगितले?’

36 परंतु ‘परमेश्वराचा संदेश’ हा शब्दप्रयोग तुम्ही पुन्हा करू नये, कारण तुम्हा प्रत्येकाचे वचन तुमचा व्यक्तिगत संदेश होतो. म्हणून तुम्ही जिवंत परमेश्वर, सर्वसमर्थ याहवेह, आपले परमेश्वर यांच्या वचनाचा विपर्यास करता.

37 तुम्ही संदेष्ट्याला सतत विचारता, ‘याहवेहने तुला काय उत्तर दिले? किंवा याहवेहने काय सांगितले?’

38 ‘हा याहवेहकडून आलेला संदेश आहे,’ असे हक्काने तुम्ही सांगता, याहवेह असे म्हणतात: ‘हा याहवेहकडून आलेला संदेश आहे,’ मी तुम्हाला हे वापरू नये अशी ताकीद दिल्यानंतरही हे शब्द तुम्ही वापरता.

39 म्हणून मी निश्चितच तुम्हाला विसरेन आणि तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना दिलेल्या या शहराला माझ्या समक्षतेतून घालवून देईन.

40 मी तुमची कायमची अप्रतिष्ठा—तुम्हाला कायमचे लज्जास्पद करेन, जे कधीही विसरल्या जाणार नाही.”

Ler em outra tradução

Comparar lado a lado