1 याहवेह असे म्हणतात: “यहूदीयांच्या राजाच्या राजवाड्यात जा आणि या संदेशाची तिथे घोषणा कर:
2 ‘दावीदाच्या राजासनावर बसलेल्या हे यहूदीयाच्या राजा, याहवेहचा हा संदेश तुझ्यासाठी आहे—तू, तुझे अधिकारी आणि लोक जे या व्दारातून आत येतात या सर्वांसाठी.
3 याहवेहचे असे म्हणणे आहे: तुमचा न्यायनिवाडा न्यायी व यथायोग्य असो. ज्यांना लुबाडण्यात आले आहे, त्यांना जुलमी लोकांपासून सोडवा. परकीय, अनाथ आणि विधवा यांना अन्याय किंवा हिंसा करू नका, आणि या स्थानावर निरपराध्यांचे रक्त सांडवू नका.
4 जर तुम्ही या आज्ञेचे काळजीपूर्वक पालन केले, नंतर दावीदाच्या राजासनावर बसलेले राजे या महालाच्या व्दारातून रथ आणि घोड्यांवर स्वार होऊन, त्यांचे अधिकारी आणि लोक यांच्यासह प्रवेश करतील.
5 परंतु जर तुम्ही या आज्ञेचे पालन नाही केले तर, याहवेह जाहीर करतात, मी माझी शपथ घेऊन इशारा देतो की, हा राजवाडा ओसाड होईल.’ ”
6 कारण या यहूदीयांच्या राजवाड्यासंबंधी, याहवेह असे म्हणाले:
7 मी तुझ्याविरुद्ध विध्वंसकांची टोळी पाठवेन,
8 “अनेक राष्ट्रातील लोक या शहराजवळून जातील आणि येथील विध्वंस पाहून ते एकमेकांना म्हणतील, ‘याहवेहने हे एवढे भव्य शहर का बरे नष्ट केले?’
9 आणि याचे उत्तर मिळेल: ‘कारण त्यांना याहवेह परमेश्वराच्या कराराचा त्याग केला होता आणि त्यांनी दुसऱ्या दैवतांची आराधना व सेवा केली.’ ”
10 मेलेल्यां राजासाठी रडू नका किंवा त्यांच्या हानीकरिता शोक करू नका;
11 यहूदीयाचा राजा योशीयाह याचा पुत्र शल्लूम याच्यानंतर गादीवर बसला, पण त्याला या ठिकाणाहून नेण्यात आले, त्याबद्दल याहवेह म्हणाले: “पुन्हा तो कधीच परत येणार नाही.
12 त्याला ज्या ठिकाणी त्यांनी बंदी करून नेले, तिथेच मरण पावेल; तो ही भूमी पुन्हा कधी पाहणार नाही.”
13 “धिक्कार असो, जो आपला महाल अधर्माने बांधतो,
14 तो म्हणतो, ‘मी माझ्यासाठी एक भव्य राजवाडा बांधेन,
15 “तू गंधसरूचा जास्तीत जास्त वापर केला तर
16 त्याने गोरगरीब, गरजवंताचे साह्य केले,
17 “परंतु तुझे डोळे आणि तुझे अंतःकरण
18 म्हणून यहूदीयाचा राजा योशीयाहचा पुत्र यहोयाकीम याबद्दल याहवेह असे म्हणतात:
19 त्याला मेलेल्या गाढवासारखी मूठमाती देण्यात येईल—
20 “लबानोनात जा व विलाप करा,
21 तुम्हाला सुरक्षित वाटत होते, तेव्हाच मी तुम्हाला सावधगिरीचा इशारा दिला होता,
22 आता वार्याच्या झोतासरशी तुझे मेंढपाळ उडून जातील,
23 तुम्ही जे लबानोनच्या गंधसरूच्या राजवाड्यात
24 “मी माझ्या जिवाची शपथ घेऊन सांगतो,” असे म्हणून याहवेह जाहीर करतात, यहूदीयाचा राजा यहोयाकीम याचा पुत्र कोन्याह, तू माझ्या उजव्या हातातील मुद्रिकेसारखा असलास, तरीही मी तुला ओढून काढेन,
25 आणि तुझा वध करू पाहणार्यांच्या हाती देईन, ज्यांची तुला भयंकर भीती वाटते—जसे खास्द्यांचा राजा नबुखद्नेस्सर आणि बाबेलची प्रजा.
26 तू व तुझी माता, यांना मी अशा देशाबाहेर भिरकावून टाकेन, जिथे तुमचा जन्म झाला नव्हता आणि त्या देशात तुम्हाला मरण येईल.
27 ज्या देशात परत येण्याची तू उत्कट इच्छा करशील, त्या देशात तू कधीच परतणार नाहीस.
28 हा मनुष्य, कोन्याह, फुटक्या भांड्यासारखा
29 अगे, हे भूमी, हे भूमी, हे भूमी
30 याहवेह असे म्हणतात: