1 मग सोफर नामाथीने उत्तर देऊन म्हटले:
2 “माझे त्रस्त विचार मला उत्तर देण्यास प्रेरित करीत आहेत
3 मला अपमानित करणार्या धमक्या मला ऐकायला येतात,
4 “पुरातन काळापासूनची वस्तुस्थिती आणि मानवाची पृथ्वीवर उत्पत्ती झाली,
5 की दुष्टाचा उल्हास हा अल्पकालीन आहे,
6 जरी देवहीन मनुष्याचा गर्व आकाशापर्यंत पोहोचला
7 तरी तो आपल्या स्वतःच्या विष्ठेप्रमाणे नष्ट होणार;
8 तो स्वप्नासारखा विरून जाईल आणि पुन्हा सापडणार नाही.
9 ज्यांनी त्याला पाहिले होते, ते त्याला पुन्हा पाहणार नाहीत;
10 त्याची मुलेबाळे गरिबांची नुकसान भरपाई करतील;
11 तारुण्याचा जो जोम त्याच्या हाडात भरलेला आहे
12 “जरी दुष्टपणा त्याच्या जिभेला गोडवा देते
13 ती चव नाहीशी होऊ नये असे त्याला वाटते
14 तरीही त्याने खाल्लेले अन्न त्याच्या पोटात आंबट होऊन त्याला पचत नाही;
15 गिळून घेतलेली सर्व संपत्ती त्याला थुंकावी लागणार;
16 तो सापाचे विष चोखून घेईल;
17 मधाने भरलेल्या नद्या आणि झरे जे लोण्याच्या प्रवाहाने वाहतात,
18 ज्यासाठी त्याने परिश्रम केले, त्याची चव त्याला मिळणार नाही;
19 कारण त्याने गोरगरिबांवर जुलूम करून त्यांना निराधार सोडले;
20 “त्याच्या हावेपासून त्याला कधीही सुटका मिळणार नाही;
21 गिळून टाकावे असे आता काही उरले नाही;
22 त्याच्या भरभराटीत विपत्ती त्याला गाठेल;
23 जेव्हा त्याने पोटभरून खाल्ले असणार,
24 लोखंडी शस्त्रांपासून त्याने जरी पळ काढला,
25 बाण त्याच्या पाठीतून तो ओढून काढेल,
26 निबिड अंधकार त्याच्या संपत्तीची वाट पाहत आहे,
27 आकाश त्याचे दोष प्रकट करेल;
28 त्याचे घर पुराने वाहून जाईल,
29 दुष्ट मनुष्याचा परमेश्वराने हाच वाटा नेमलेला आहे,