1 “माझ्या नेत्रांनी हे सर्व पाहिले आहे,
2 जे तुम्हाला माहीत आहे, ते मलाही माहीत आहे;
3 पण मी सर्वसमर्थाशी बोलावे
4 तुम्ही तर मला लबाड्यांनी कलंकित करता;
5 तुम्ही गप्प राहाल तर किती बरे होईल!
6 आता माझा वाद ऐकून घ्या;
7 परमेश्वराच्या वतीने तुम्ही दुष्टतेने बोलणार का?
8 तुम्ही त्यांना पक्षपात दाखविणार का?
9 त्यांनी जर तुमची परीक्षा केली तर चांगले होईल काय?
10 जर तुम्ही गुप्तपणे पक्षपात कराल
11 त्यांचे वैभव तुम्हाला भयभीत करीत नाही का?
12 तुमच्या नीतिवचनांना राखेएवढेच मोल आहे;
13 “आता गप्प राहा व मला बोलू द्या;
14 मी स्वतःला धोक्यात का टाकू
15 जरी परमेश्वराने मला मारून टाकले, तरीही मी त्यांच्यावर आशा ठेवेन;
16 खचितच ह्यातच माझी खरी मुक्ती आहे,
17 मी जे सांगतो, ते लक्ष देऊन ऐका;
18 मी माझा वाद तयार केला आहे,
19 माझ्याविरुद्ध कोणी आरोप करेल काय?
20 “हे परमेश्वरा, मला या दोन गोष्टी द्या,
21 माझ्यावरील आपला हात दूर करा,
22 मला आवाज द्या आणि मी उत्तर देईन,
23 मी किती चुका आणि पाप केलेत?
24 तुम्ही आपले मुख का लपविता
25 वार्याने उडून जाणार्या पानाला तुम्ही छळणार का?
26 कारण माझ्याविरुद्ध तुम्ही कटुत्वाच्या गोष्टी लिहिता,
27 तुम्ही माझ्या पायात बेड्या घालता;
28 “सडलेल्या वस्तूप्रमाणे,