1 मी या सर्वांवर मनन केले आणि हा निष्कर्ष काढला की नीतिमान व सुज्ञ आणि ते जे काही करतात ते सर्व परमेश्वराच्या हाती आहे, परंतु त्याच्यासाठी पुढे प्रेम किंवा द्वेष यापैकी काय ठेवले आहे हे कोणा मनुष्याला माहीत नसते.
2 सर्वांची नियती एकच आहे—नीतिमान आणि दुष्ट, चांगला आणि वाईट, शुद्ध आणि अशुद्ध, जे यज्ञार्पण करतात व जे करीत नाहीत.
3 सूर्याखाली घडत असलेल्या प्रत्येक गोष्टीत हे वाईट आहे: एकसमान नियती सर्वांवर मात करते. शिवाय, लोकांची अंतःकरणे दुष्टाईने भरलेली आहेत आणि जिवंत असताना त्यांच्या अंतःकरणात वेडेपणा आहे आणि नंतर ते मृतांमध्ये सामील होतात.
4 जिवंत लोकांमध्ये असलेल्या प्रत्येकाला ही आशा आहे—जिवंत कुत्रा सुद्धा मृत सिंहांपेक्षा बरा!
5 जिवंतांना आपण मरणार हे माहीत असते,
6 त्यांचे प्रेम, त्यांचा द्वेष
7 जा, आनंदाने तुझे भोजन कर, आणि हर्षित हृदयाने आपला द्राक्षारस पी, कारण तू जे करतो ते परमेश्वराने आधी मान्य केले आहे.
8 तुमची वस्त्रे सर्वदा शुभ्र असावीत व तुमच्या डोक्याला नेहमी तेलाभिषेक असावा.
9 सूर्याखाली परमेश्वराने तुला देऊ केलेल्या अर्थहीन जीवनाच्या आपल्या सर्व दिवसांत आपली पत्नी, जिच्यावर तू प्रेम करतो, तिच्याबरोबर या निरर्थक जीवनाचा आनंद उपभोग. कारण सूर्याखाली तुझ्या जीवनाचा व श्रमाचा हाच वाटा आहे.
10 जे काम तुझ्या हाताला सापडते, ते तुझ्या सर्व शक्तीने कर, कारण मृतलोकामध्ये, जिथे तुला जायचे आहे, तिथे ना काम आहे, ना योजना, ना विद्या, ना सुज्ञान.
11 मी सूर्याखाली आणखी काहीतरी वेगळे पाहिले:
12 आपल्यावर कधी वेळ येणार हे कोणालाही ठाऊक नाही:
13 सुज्ञानाचे हे उदाहरण मी सूर्याखाली पाहून फार प्रभावित झालो:
14 एक छोटेसे शहर होते. त्यात थोडेच लोक राहत होते आणि एक अतिशय पराक्रमी राजा त्यांच्या विरोधात सैन्य घेऊन आला व त्या शहराला त्याने वेढा दिला आणि गराडा घातला.
15 त्या शहरात एक गरीब पण सुज्ञ मनुष्य होता, आणि आपल्या सुज्ञानाने त्याने शहर वाचविले. पण त्या गरीब माणसाची कोणी आठवण केली नाही.
16 म्हणून मी म्हणालो, “सुज्ञान बळापेक्षा बरे आहे.” परंतु गरीब मनुष्याचे ज्ञान तुच्छ लेखले गेले आणि त्याचा शब्द कोणी मानला नाही.
17 सुज्ञानी मनुष्याच्या शांत शब्दांकडे लक्ष देणे
18 युद्धाच्या शस्त्रांपेक्षा सुज्ञान बरे,