1 Crônicas 4

MARC

1 यहूदाहचे वंशज:

2 शोबालचा पुत्र रेआयाहला यहथ, यहथाला अहूमय व लाहाद झाला, ही सोराथी कुळे होत.

3 एटामाचे पुत्र:

4 पेनुएल गदोरचा पिता होता, आणि एजेरला हूशा झाला.

5 तकोवाचा पिता अश्हूरला हेला व नाराह अशा दोन पत्नी होत्या.

6 नाराहच्या पोटी त्याला अहुज्जाम, हेफेर, तेमानी व अहष्टारी झाले. ही नाराहची संतती होती.

7 हेलाचे पुत्र:

8 व कोस, जो आनूब व हस्सोबेबाह यांचा पिता होता, तसेच त्याच्यापासून हारूमाचा पुत्र अहरहेल याची कुळे निपजली.

9 याबेस आपल्या भावांपेक्षा अधिक आदरणीय होता; “त्यास प्रसवताना मला फार क्लेश झाले” असे म्हणत त्याच्या आईने त्याचे नाव याबेस ठेवले.

10 याबेसाने इस्राएलाच्या परमेश्वराजवळ प्रार्थना केली, “तुम्ही मला आशीर्वादित करा, माझ्या क्षेत्राचा विस्तार करा! माझ्यावर कोणतेही अरिष्ट येऊन, मला क्लेश वाटू नये म्हणून तुमचा हात माझ्यावर राहो.” परमेश्वराने त्याची विनंती मान्य केली.

11 शूहाहचा भाऊ कलूबला महीर झाला; हा एष्टोनाचा पिता होता.

12 एष्टोनास बेथ-राफा, पासेआह आणि ईर-नाहाश चा पिता तहिन्ना झाले. हे रेकाह नगरवासी होते.

13 केनाजचे पुत्र:

14 मेयोनोथाय ओफराहचा पिता होता.

15 यफुन्नेहचा पुत्र कालेबाचे पुत्र:

16 यहल्लेलेलचे पुत्र:

17 एज्राहचे पुत्र:

18 मेरेदने इजिप्तचा राजा फारोहची राजकन्या बिथ्याशी विवाह केला होता.

19 नहमाची बहीण, होदीयाहची पत्नी झाली; तिला:

20 शिमओनाचे पुत्र:

21 यहूदाहचा पुत्र शेलाहचे पुत्र:

22 तसेच शेलापासून योकीम, कोजेबा येथील लोक, योआश, मोआबावर सत्ता चालविणारे साराफ व यशूबी-लेहेम हे निपजले. (हा वृतांत प्राचीन नोंदवहीतील आहे.)

23 हे कुंभार असून नताईम व गेदेराह येथे राहत असत; ते राजाचे कामकाज करून त्याच्याजवळ राहत असत.

24 शिमओनाचे वंशज:

25 शौलाचा पुत्र शल्लूम, शल्लूमाचा पुत्र मिबसाम आणि मिबसामचा पुत्र मिश्मा.

26 मिश्माचा वंशज:

27 शिमीस सोळा पुत्र व सहा कन्या झाल्या; पण त्याच्या भावास फारशी संतती झाली नाही आणि त्यांचा वंश यहूदाहच्या वंशाप्रमाणे वृद्धी पावला नाही.

28 त्यांनी वस्ती केलेली गावे ही: बेअर-शेबा, मोलादाह, हसर-शुआल,

29 बिल्हा असेम, तोलाद,

30 बेथुएल, होरमाह सिकलाग,

31 बेथ-मर्काबोथ, हसर-सुसीम, बेथ-बिरी व शाराईम. दावीदाच्या कारकिर्दीपर्यंत ही त्यांची शहरे होती.

32 त्यांचे वंशज एटाम, एईन, रिम्मोन, तोखेन आणि आशान या पाच नगरात आणि

33 या नगरांच्या सभोवतीच्या गावात बआलपर्यंत वस्ती करून होते.

34 मेशोबाब, यामलेख,

35 योएल.

36 एलिओएनाइ, याकोबाह, येशोहाइयाह,

37 जीजा हा शिफीचा पुत्र, जो अल्लोनचा पुत्र, जो यदायाहचा पुत्र, जो शिम्रीचा पुत्र व जो शमायाहचा पुत्र होता.

38 नावाने वर सूचीबद्ध केलेले हे सर्व पुरुष कुलप्रमुख होते.

39 ते आपल्या मेंढरांच्या कळपांसाठी कुरणाच्या शोधार्थ पूर्वेकडे गदोरच्या खोर्‍यापर्यंत गेले.

40 तिथे त्यांना कसदार व उत्तम चारा सापडला. तो देश विस्तीर्ण असून शांत व निवांत होता; तिथे पूर्वी हामाचे वंशज राहत असत.

41 ज्यांच्या नावाची वर नोंद केली आहे, त्यांनी यहूदीयाचा राजा हिज्कीयाहच्या कारकिर्दीत तिथे आक्रमण करून हामच्या वंशजांना आणि तसेच मऊनीमींना त्यांच्या डेर्‍यांसह नष्ट करून ते त्यांच्या ठिकाणी आजपर्यंत वसलेले आहेत; कारण त्या ठिकाणी त्यांच्या शेरडामेंढरांसाठी चारा होता.

42 त्यापैकी म्हणजे शिमओनाच्या गोत्रातील पाचशे पुरुषांनी इशीचे पुत्र पेलतियाह, निरय्याह, रफायाह व उज्जीएल यांनी त्यांचे नेतृत्व केले आणि ते सेईर डोंगरावर गेले.

43 तिथे जे पळून गेलेले अमालेकी उरले होते, त्यांचा संहार करून ते आजवर तिथे राहतात.

Ler em outra tradução

Comparar lado a lado