1 ज्ञानाने आपले स्वतःचे घर बांधले;
2 तिने रात्रीच्या भोजनासाठी आपले पशू तयार केले आहेत;
3 तिने आपल्या दासीकरवी आमंत्रण पाठवले आहे आणि
4 “जो अज्ञानी आहे तो इकडे येवो!”
5 “या, माझे अन्न खा.
6 तुमचे अज्ञानाचे मार्ग मागे सोडा आणि जिवंत रहा;
7 जो निंदकाला सुबोध करतो तो अप्रतिष्ठेला आंमत्रण करतो,
8 निंदकाला बोल लावू नको नाहीतर तो तुझा द्वेष करेल;
9 ज्ञानी मनुष्यास शिक्षण दिले तर तो ज्ञानात अधिक वाढत जाईल;
10 परमेश्वराचे भय ज्ञानाचा उगम आहे,
11 कारण माझ्यामुळे तुझ्या आयुष्याचे दिवस बहुगुणित होतील,
12 जर तुम्ही ज्ञानी असलास, तर तू आपणासाठी ज्ञानी असशील,
13 मूर्ख स्त्री गोंगाट करणाऱ्यासारखी आहे,
14 ती तिच्या घराच्या दाराजवळ बसते,
15 जे लोक आपल्या वाटेने सरळ चालतात,
16 “जो कोणी अज्ञानी आहे तो इकडे येवो!”
17 “चोरलेले पाणी गोड लागते,
18 पण तेथे मरण पावलेले आहेत हे त्यांना समजत नाही,