Números 8

MAR vs NVT

Sair da comparação
NVT Nova Versão Transformadora
1 परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
1 O S enhor disse a Moisés:
2 “अहरोनाशी बोल. त्यास सांग, जेव्हा तू दिवे लावतोस तेव्हा त्या सात दिव्यांचा प्रकाश दीपस्तंभाच्यासमोर पडावा.”
2 “Dê as seguintes instruções a Arão. Quando você colocar as sete lâmpadas, posicione-as de modo que iluminem o espaço à frente do candelabro”.
3 अहरोनाने तसे केले. परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे त्याने दीपस्तंभावरील दिव्यांचा उजेड समोर पडावा म्हणून दिवे लावले.
3 Arão seguiu essa instrução. Posicionou as sete lâmpadas de modo que iluminassem o espaço à frente do candelabro, conforme o S enhor havia ordenado a Moisés.
4 दीपस्तंभ याप्रमाणे बनवलेला होताः परमेश्वराने मोशेला दीपस्तंभाच्या तळापासून त्याच्या कळ्यापर्यंत दाखविल्याप्रमाणे त्याने तो घडीव सोन्याचा घडविला.
4 O candelabro todo, desde a base até as flores, era de ouro batido. Foi feito exatamente de acordo com o modelo que o S enhor havia mostrado a Moisés.
5 पुन्हा, परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
5 O S enhor disse a Moisés:
6 लेवींना इस्राएल लोकांमधून घे व त्यांना शुद्ध कर.
6 “Agora, separe os levitas do restante dos israelitas e torne-os cerimonialmente puros.
7 त्यांना शुद्ध करण्यासाठी हे करः पापक्षालनाचे पाणी घेऊन त्यांच्यावर शिंपड. त्या प्रत्येकाने आपल्या पूर्ण शरीरावर वस्तरा फिरवावा आणि आपले कपडे धुवावे आणि त्यामुळे स्वतःला शुद्ध करावे.
7 Para isso, você aspergirá sobre eles a água da purificação e os fará raspar todo o corpo e lavar as roupas. Assim, estarão cerimonialmente puros.
8 मग त्यांनी एक गोऱ्हा घ्यावा आणि तेलात मळलेल्या सपिठाचे अन्नार्पण घ्यावे. त्यांनी पापार्पणासाठी दुसरा एक गोऱ्हा घ्यावा.
8 Instrua-os a trazerem um novilho e uma oferta de cereal de farinha da melhor qualidade umedecida com azeite, junto com outro novilho como oferta pelo pecado.
9 लेवींना दर्शनमंडपासमोर सादर कर व इस्राएल लोकांच्या सर्व मंडळीला एकत्र जमव.
9 Reúna toda a comunidade de Israel e apresente os levitas à entrada da tenda do encontro.
10 लेवींना परमेश्वरासमोर सादर कर. तेव्हा इस्राएल लोकांनी लेवींच्या डोक्यावर आपले हात ठेवावे.
10 Quando você trouxer os levitas diante do S enhor , os israelitas colocarão as mãos sobre eles.
11 अहरोनाने लेव्यांना इस्राएल लोकांच्यावतीने माझी सेवा करण्यास सादर करावे. लेव्यांनी माझी सेवा करावी यासाठी त्याने हे करावे.
11 Com as mãos levantadas, Arão apresentará os levitas ao S enhor como oferta especial dos israelitas e, desse modo, os consagrará ao serviço do S enhor .
12 लेवींनी आपले हात बैलाच्या डोक्यावर ठेवावे. लेव्यांच्या प्रायश्चितासाठी एक बैल पापार्पण व दुसरा बैल माझ्या होमार्पणासाठी अर्पावा.
12 “Em seguida, os levitas colocarão as mãos sobre a cabeça dos novilhos. Você sacrificará um novilho ao S enhor como oferta pelo pecado, e o outro, como holocausto, a fim de fazer expiação pelos levitas.
13 लेवींना अहरोन व त्याचे पुत्र ह्यांच्या समोर सादर कर आणि माझ्यासाठी त्यांना अर्पणाप्रमाणे उंच करावे.
13 Coloque os levitas em pé diante de Arão e de seus filhos e, com as mãos levantadas, apresente-os como oferta especial para o S enhor .
14 याप्रकारे तुम्ही लेव्यांपासून इस्राएल लोकांना वेगळे करा. लेवी माझेच होतील.
14 Assim, você separará os levitas do restante dos israelitas, e os levitas serão meus.
15 तू त्यांना शुद्ध कर. तू त्यांना अर्पणाप्रमाणे माझ्यापर्यंत त्यांना उंच कर. यानंतर त्यांनी दर्शनमंडपामध्ये जाऊन सेवा करावी.
15 Depois disso, eles entrarão na tenda do encontro para realizar o trabalho deles, pois você os purificou e os apresentou como oferta especial.
16 हे करा, कारण इस्राएल लोकांमधून ते पूर्णपणे माझे आहेत. इस्राएल वंशातील गर्भाशयातून निघणारे प्रत्येक प्रथम पुरुष मूलाची ते जागा घेतील. मी लेवींना आपल्या स्वतःसाठी घेतले आहे.
16 “Dentre todos os israelitas, os levitas são reservados para mim. Tomei-os para mim em lugar de todos os filhos mais velhos dos israelitas; tomei os levitas como seus substitutos.
17 इस्राएल लोकांतले, मनुष्यापैकी आणि पशूपैकी या दोन्हीमधील सर्व प्रथम जन्मलेले माझे आहेत. मिसर देशातील सर्व प्रथम जन्मलेली मुले व पशू मी मारले त्यादिवशी मी त्यांना आपल्याकरता पवित्र केले.
17 Pois todos os filhos mais velhos e todos os machos das primeiras crias dos animais em Israel são meus. Eu os separei para mim no dia em que feri mortalmente todos os filhos mais velhos dos egípcios e os machos das primeiras crias de seus animais.
18 मी इस्राएल लोकातील सर्व प्रथम जन्मलेल्यांच्या ऐवजी लेवींना घेतले आहे.
18 Sim, tomei para mim os levitas em lugar de todos os filhos mais velhos de Israel.
19 अहरोन व त्याच्या मुलांना मी लेवींना दान म्हणून दिले आहेत. दर्शनमंडपामध्ये सर्व इस्राएल लोकांचे काम करण्यासाठी मी त्यांना घेतले आहे. जेव्हा लोक पवित्रस्थानाजवळ येतील तर त्यांनी मरीने नाश होऊ नये म्हणून इस्राएल लोकांसाठी प्रायाश्चिताची अर्पणे करावी.
19 E, dentre todos os israelitas, designei os levitas para Arão e seus filhos. Eles servirão na tenda do encontro em favor dos israelitas e oferecerão sacrifícios para fazer expiação pelo povo, de modo que nenhuma praga os atinja quando se aproximarem do santuário”.
20 तेव्हा मोशे, अहरोन आणि सर्व इस्राएल लोकांची मंडळी ह्यांनी ह्याप्रकारे लेव्यांना केले. परमेश्वराने लेव्यांविषयी मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी त्यांचे सर्व काही केले. इस्राएलाच्या लोकांनी त्याच्याबरोबर हे केले.
20 Assim, Moisés, Arão e toda a comunidade de Israel consagraram os levitas, seguindo todas as instruções que o S enhor deu a Moisés.
21 लेव्यांनी आपले कपडे धुऊन स्वतःला पापापासून शुद्ध केले. तेव्हा अहरोनाने त्यांना अर्पणाप्रमाणे परमेश्वरास सादर केले आणि त्यांना शुद्ध करण्यासाठी त्याने प्रायश्चित्त केले.
21 Os levitas se purificaram e lavaram as roupas, e Arão os apresentou ao S enhor como oferta especial. Em seguida, ofereceu um sacrifício e fez expiação por eles, a fim de purificá-los.
22 त्यानंतर, लेवी दर्शनमंडपामध्ये अहरोनापुढे व त्याच्या मुलांपुढे आपली नेमलेली सेवा करण्यास आत गेले. परमेश्वराने मोशेला लेव्याबद्दल आज्ञा केल्याप्रमाणे केले. त्यांनी सर्व लेव्यांना ह्याप्रकारे वागवले.
22 Depois disso, os levitas entraram na tenda do encontro para realizar suas tarefas como assistentes de Arão e seus filhos. Assim, fizeram tudo que S enhor havia ordenado a Moisés a respeito dos levitas.
23 पुन्हा, परमेश्वर मोशेशी बोलला, तो म्हणाला,
23 O S enhor também disse a Moisés:
24 जे लेवी पंचवीस वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे आहेत त्या सर्वासाठी हे आहे. त्यांनी दर्शनमंडपामध्ये सेवा करण्यास मंडळात भाग घ्यावा.
24 “Dê a seguinte instrução aos levitas. Começarão a servir na tenda do encontro aos 25 anos
25 त्यांनी वयाच्या पन्नासव्या वर्षांपासून सेवेत याप्रकारे थांबावे. नंतर त्यांनी थांबावे.
25 e deixarão o serviço aos 50 anos.
26 त्यांनी दर्शनमंडपामध्ये सेवा करणाऱ्या आपल्या बंधूंना त्यांच्या कामात मदत करावी, परंतु त्यांनी अधिक सेवा करु नये. तू लेव्यांना या सर्व गोष्टीत मार्गदर्शन करावे.
26 Depois que deixarem o serviço, ajudarão seus colegas levitas no trabalho de cuidar da tenda do encontro, mas não realizarão mais as cerimônias. Assim você designará as funções dos levitas”.

Ler em outra tradução

Comparar com outra