Números 7
MAR vs NTLH
1 ज्या दिवशी मोशेने निवासमंडपाचे काम संपविले, त्याने तो अभिषेक करून व परमेश्वराच्या उपयोगासाठी त्यातील सर्व एकत्रित साहित्यासह पवित्र केला. त्याने वेदी व त्यातील सर्व पात्रे अभिषेक करून पवित्र केली. त्याने त्यास अभिषेक केला व त्यास पवित्र केले.
1 No dia em que Moisés acabou de armar a Tenda Sagrada , ele a ungiu e a dedicou ao serviço de Deus, junto com todos os objetos da Tenda e do altar.
2 त्यादिवशी, जे इस्राएलांचे अधिपती, त्यांच्या पूर्वजांच्या घराण्यांचे प्रमुख होते त्यांनी अर्पणे अर्पिली; हीच माणसे जमातीचे नेतृत्व करणारे होते. याच लोकांनी शिरगणतीचे काम पाहिले होते.
2 Então os chefes dos grupos de famílias, que eram líderes das tribos do povo de Israel, os mesmos homens que estavam cuidando da contagem do povo,
3 त्यांनी परमेश्वरापुढे अर्पणे आणली. त्यांनी झाकलेल्या सहा गाड्या व बारा बैल आणले. त्यांनी प्रत्येक दोन अधिपतीसाठी एक गाडी व प्रत्येक अधिपतीसाठी एक बैल दिला. त्यांनी या वस्तू निवासमंडपासमोर सादर केल्या.
3 trouxeram as suas ofertas a Deus, o Senhor , isto é, seis carroças cobertas e doze bois. Cada dois chefes ofereceram uma carroça, e cada um deles, um boi; e puseram tudo na frente da Tenda.
4 मग परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला
4 O Senhor disse a Moisés:
5 “त्यांच्यापासून अर्पणे स्विकार आणि दर्शनमंडपाच्या कामासाठी अर्पणांचा उपयोग कर. प्रत्येक लेवीला ज्याच्या त्याच्या कामाच्या आवश्यकतेनुसार अर्पण दे.”
5 — Receba as carroças e os bois a fim de serem usados para o serviço da Tenda; e dê essas ofertas aos levitas , a cada um de acordo com o serviço que faz.
6 मोशेने गाड्या व बैल घेतले आणि ते लेवींना दिले.
6 Então Moisés deu aos levitas as carroças e os bois.
7 त्याने दोन गाड्या व चार बैल गेर्षोनी वंशाना दिले कारण त्यांच्या कामासाठी त्यांना त्यांची गरज होती.
7 Aos descendentes de Gérson ele deu duas carroças e quatro bois, de acordo com o serviço que faziam.
8 त्याने चार गाड्या व आठ बैल मरारी वंशाना दिले, ते अहरोन याजकाचा मुलगा इथामार ह्याच्या देखरेखीखाली होते. त्याने हे अशासाठी केले की त्यांना त्याची गरज होती.
8 Aos descendentes de Merari, também de acordo com o serviço deles, Moisés deu quatro carroças e oito bois. Esse serviço era dirigido por Itamar, filho do sacerdote Arão.
9 परंतु त्याने कहाथी वंशाना त्यातील काहीच दिले नाही, कारण निवासमंडपातील राखीव वस्तू आणि साहित्य याच्या संबंधीत त्यांचे काम असून, त्या वस्तू आपल्या स्वतःच्या खांद्यावर वाहून नेण्याचे होते.
9 Porém Moisés não deu aos descendentes de Coate nem carroças nem bois, pois os objetos sagrados de que eles cuidavam tinham de ser carregados nos ombros.
10 मोशेने वेदीला अभिषेक केला त्या दिवशी अधिपतींनी वेदीला आपला माल समर्पित करण्यासाठी आणला. अधिपतींनी आपली अर्पणे वेदीसमोर अर्पिली.
10 Os chefes também trouxeram as ofertas para comemorar a dedicação do altar ao serviço de Deus. Quando eles já estavam prontos para apresentar as suas ofertas no altar,
11 परमेश्वर मोशेला म्हणाला, “प्रत्येक अधिपतीनी आपल्या स्वतःच्या दिवशी, वेदीच्या समर्पणासाठी आपले अर्पण आणावे.”
11 o Senhor Deus disse a Moisés: — Os chefes, cada um no seu próprio dia, deverão apresentar as suas ofertas para a dedicação do altar ao meu serviço. As ofertas que cada um trouxe eram iguais: uma bandeja de prata pesando um quilo e meio; uma bacia de prata pesando oitocentos gramas, segundo a tabela oficial (a bandeja e a bacia estavam cheias de farinha de trigo misturada com azeite, para a oferta de cereais); um prato de ouro pesando cento e quinze gramas, cheio de incenso; um touro novo, um carneiro e um carneirinho de um ano para serem completamente queimados; um bode como oferta para tirar pecados; e, como oferta de paz, dois bois, cinco carneiros, cinco bodes e cinco carneirinhos de um ano.
12 पहिल्या दिवशी, यहूदा वंशाचा अधिपती अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
12 — ausente —
13 त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी आणली. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
13 — ausente —
14 त्यानेही धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे, एक सोन्याचे पात्र आणले.
14 — ausente —
15 त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा आणि एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिली.
15 — ausente —
16 त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
16 — ausente —
17 त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यासाठी दिली. हे अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन याची भेट होती.
17 — ausente —
18 दुसऱ्या दिवशी, इस्साखार वंशाचा, अधिपती सूवाराचा मुलगा नथनेल, ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
18 — ausente —
19 त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी अर्पिली. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
19 — ausente —
20 त्यानेही धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र दिले.
20 — ausente —
21 त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा, एक वर्षाचे एक नर कोकरु ही होमार्पणासाठी दिली.
21 — ausente —
22 त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
22 — ausente —
23 त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिली. हे सूवाराचा मुलगा नथनेल याची भेट होती.
23 — ausente —
24 तिसऱ्या दिवशी, जबुलून वंशाचा अधिपती हेलोनाचा मुलगा अलीयाब ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
24 — ausente —
25 त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी दिली. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
25 — ausente —
26 त्यानेही धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र दिले.
26 — ausente —
27 त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा, एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिली.
27 — ausente —
28 त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
28 — ausente —
29 त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिली. हे हेलोनाचा मुलगा अलीयाब ह्याचे अर्पण होते.
29 — ausente —
30 चौथ्या दिवशी, रऊबेन वंशाचा अधिपती शदेयुराचा मुलगा अलीसूर ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
30 — ausente —
31 त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी होती. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
31 — ausente —
32 त्यानेही धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र अर्पिले.
32 — ausente —
33 त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा आणि एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिले.
33 — ausente —
34 त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
34 — ausente —
35 त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिली. हे शदेयुराचा मुलगा अलीसूर ह्याचे अर्पण होते.
35 — ausente —
36 पांचव्या दिवशी, शिमोन वंशाचा अधिपती सुरीशाद्दैचा मुलगा शलूमीयेल ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
36 — ausente —
37 त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी होते. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
37 — ausente —
38 त्यानेही धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र अर्पिले.
38 — ausente —
39 त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा, एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिली.
39 — ausente —
40 त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
40 — ausente —
41 त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिली. हे सुरीशाद्दैचा मुलगा शलूमीयेल यांचे अर्पण होते.
41 — ausente —
42 सहाव्या दिवशी, गाद वंशाचा अधिपती दगुवेलाचा मुलगा एल्यासाप ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
42 — ausente —
43 त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी होती. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या मैद्याच्या पिठाने भरलेल्या होत्या.
43 — ausente —
44 त्याने धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र दिले.
44 — ausente —
45 त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा, एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिली.
45 — ausente —
46 त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
46 — ausente —
47 त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे ही अर्पिण्यास दिली, हे दगुवेलाचा मुलगा एल्यासाप ह्याचे अर्पण होते.
47 — ausente —
48 सातव्या दिवशी, एफ्राईम वंशाचा अधिपती अम्मीहूदाचा मुलगा अलीशामा ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
48 — ausente —
49 त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी होती. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
49 — ausente —
50 त्याने धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र दिले.
50 — ausente —
51 त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा, एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिली.
51 — ausente —
52 त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
52 — ausente —
53 त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिली. अम्मीहूदाचा मुलगा अलीशामा यांचे अर्पण होते.
53 — ausente —
54 आठव्या दिवशी, मनश्शे वंशाचा अधिपती पदाहसुराचा मुलगा गमलीयेल ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
54 — ausente —
55 त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी होती. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
55 — ausente —
56 त्याने धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र दिले.
56 — ausente —
57 त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा, एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिली.
57 — ausente —
58 त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
58 — ausente —
59 त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिली. हे पदाहसुराचा मुलगा गमलीयेल याचे अर्पण होते.
59 — ausente —
60 नवव्या दिवशी, बन्यामीन वंशाचा अधिपती गीदोनीचा मुलगा अबीदान ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
60 — ausente —
61 त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी होती. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
61 — ausente —
62 त्याने धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र दिले.
62 — ausente —
63 त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा, एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिली.
63 — ausente —
64 त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
64 — ausente —
65 त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिली. हे गिदोनीचा मुलगा अबीदान ह्याचे अर्पण होते.
65 — ausente —
66 दहाव्या दिवशी, दान वंशाचा अधिपती अम्मीशाद्दैचा मुलगा अहीएजर ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
66 — ausente —
67 त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी होती. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
67 — ausente —
68 त्याने धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र दिले.
68 — ausente —
69 त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा, एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिली.
69 — ausente —
70 त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
70 — ausente —
71 त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिले. हे अम्मीशाद्दै याचा मुलगा अहीएजर ह्याचे अर्पण होते.
71 — ausente —
72 अकराव्या दिवशी, आशेर वंशाचा अधिकारी आक्रानाचा मुलगा पगीयेल ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
72 — ausente —
73 त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी होती. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
73 — ausente —
74 त्याने धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र दिले.
74 — ausente —
75 त्याने होमार्पणासाठी एक गोऱ्हा, एक मेंढा व एक वर्षाचे नर कोकरू दिले.
75 — ausente —
76 त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
76 — ausente —
77 त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिली. हे आक्रानाचा मुलगा पगीयेल याचे अर्पण होते.
77 — ausente —
78 बाराव्या दिवशी, नफताली वंशाचा अधिपती एनानाचा मुलगा अहीरा ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
78 — ausente —
79 त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाचा चांदीचा एक कटोरा होता. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
79 — ausente —
80 त्याने धूपाने भरलेले, दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र दिले.
80 — ausente —
81 त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा, एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिली.
81 — ausente —
82 त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
82 — ausente —
83 त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिली. हे एनानाचा मुलगा अहीरा याचे अर्पण होते.
83 — ausente —
84 मोशेने वेदीला अभिषेक केला त्या दिवशी इस्राएलांच्या अधिपतींनी या सर्व वस्तू समर्पित केल्या. त्यांनी चांदीची बारा ताटे, चांदीच्या बारा वाट्या आणि सोन्याची बारा पात्रे समर्पित केली.
84 — ausente —
85 प्रत्येक चांदीच्या ताटाचे वजन एकशेतीस शेकेल व प्रत्येक चांदीच्या वाट्यांचे वजन सत्तर शेकेल होते. पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे चांदीची ताटे व चांदीच्या वाट्या मिळून त्यांचे एकूण वजन दोन हजार चारशे शेकेल होते.
85 — ausente —
86 धूपाने भरलेले सोन्याची बारा पात्रे, प्रत्येकी पवित्रस्थानाच्या शेकेलाप्रमाणे दहा शेकेल वजन होते.
86 doze pratos de ouro pesando um quilo trezentos e oitenta gramas (os pratos estavam cheios de incenso);
87 त्यांनी होमार्पणासाठी बारा गोऱ्हे, बारा मेंढे व एक वर्षाची बारा नर कोंकरे समर्पित केली. त्यांनी आपले अन्नार्पण दिले. त्यांनी पापार्पणासाठी बारा बकरे दिले.
87 como ofertas a serem completamente queimadas, doze touros novos, doze carneiros e doze carneirinhos de um ano, junto com as ofertas de cereais que acompanham essas ofertas; como ofertas para tirar pecados, doze bodes;
88 शांत्यर्पणाच्या अर्पणासाठी त्यांनी आपल्या सर्व गुराढोरातून चोवीस बैल, साठ मेंढे, साठ बकरे व एक वर्षाची साठ नर कोंकरे दिली. जेव्हा अभिषेक झाला होता, तेव्हा त्यांनी ही वेदीला अर्पणे केली.
88 e, como ofertas de paz, vinte e quatro bois, sessenta carneiros, sessenta bodes e sessenta carneirinhos de um ano.
89 जेव्हा मोशे परमेश्वराबरोबर बोलण्यासाठी दर्शनमंडपामध्ये गेला, त्यावेळी त्याने देवाची वाणी त्याच्याशी बोलताना ऐकली. देव साक्षीकोशावर जे दयासन होते त्यावरून म्हणजे दोन करुबांच्या मधून आपणाशी बोलणारी वाणी ऐकली. परमेश्वर त्याच्याशी बोलला.
89 Quando Moisés entrou na Tenda Sagrada para falar com o Senhor , ouviu a voz de Deus falando com ele de cima da tampa da arca da aliança , do meio dos dois querubins (Era assim que Deus falava com Moisés.).
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?