Números 32
MAR vs NVI
1 रऊबेन आणि गाद या घराण्यांकडे गुरांढोरांची खूप खिल्लारे होते. त्यांनी याजेर व गिलाद येथील जमिनी पाहिल्या. ही जमीन आपल्या गुरांढोरांसाठी चांगली आहे असे त्यांना वाटले.
1 As tribos de Rúben e de Gade, donas de numerosos rebanhos, viram que as terras de Jazar e de Gileade eram próprias para a criação de gado.
2 म्हणून रऊबेन व गाद यांच्या घराण्यातील लोक मोशेकडे आले. ते मोशे, याजक एलाजार आणि लोकांचे पुढारी यांच्याशी बोलले.
2 Por isso foram a Moisés, ao sacerdote Eleazar e aos líderes da comunidade, e disseram:
3 अटारोथ, दीबोन, याजेर, निम्रा, हेशबोन, एलाले, सबाम, नबो व बौन.
3 "Atarote, Dibom, Jazar, Ninra, Hesbom, Eleale, Sebã, Nebo e Beom,
4 ह्यांचा जो प्रांत परमेश्वराने इस्राएलाच्या लोकांसाठी देवाने जी जमीन जिंकली ती गुरांढोरांसाठी खूप चांगली आहे आणि तुझ्या दासांजवळ गुरेढोरे आहेत.
4 terras que o Senhor subjugou perante a comunidade de Israel, são próprias para a criação de gado, e os seus servos possuem gado".
5 जर आम्हावर तुझी कृपादृष्टी असेल तर तो प्रदेश आम्हास वतन करून देण्यात यावा. आम्हास यार्देन नदीच्या पलिकडे नेऊ नको.
5 E acrescentaram: "Se podemos contar com o favor de vocês, deixem que essa terra seja dada a estes seus servos como nossa herança. Não nos façam atravessar o Jordão".
6 रऊबेन आणि गादच्या घराण्यातील लोकांस मोशे म्हणाला, तुमचे भाऊबंद लढाईस जातील तेव्हा तुम्ही येथेच बसून राहणार का?
6 Moisés respondeu aos homens de Gade e de Rúben: "E os seus compatriotas irão à guerra enquanto vocês ficam aqui?
7 जो देश परमेश्वराने इस्राएल लोकांस दिला आहे तेथे उतरून जाण्याकरता त्यांचे मन का निरूत्साहित करीत आहात?
7 Por que vocês desencorajam os israelitas de entrar na terra que o Senhor lhes deu?
8 तुमच्या वाडवडिलांनी हीच गोष्ट माझ्याबाबतीत केली होती. कादेश-बर्ण्याला मी काही हेरांना जमीन बघण्यासाठी पाठवले.
8 Foi isso que os pais de vocês fizeram quando os enviei de Cades-Barnéia para verem a terra.
9 ते लोक अष्कोल खोऱ्यापर्यंत गेले. त्यांनी जमीन बघितली आणि त्या लोकांनी इस्राएल लोकांस परमेश्वराने दिलेल्या प्रदेशात जाण्याच्या इच्छेपासून परावृत केले.
9 Depois de subirem ao vale de Escol e examinarem a terra, desencorajaram os israelitas de entrar na terra que o Senhor lhes tinha dado.
10 परमेश्वर त्या लोकांवर खूप रागावला. त्याने शपथ घेतली आणि म्हणाला,
10 A ira do Senhor se acendeu naquele dia, e ele fez este juramento:
11 मिसर देशातून आलेल्या वीस वर्षांवरील कोणत्याही मनुष्यास हा प्रदेश बघू दिला जाणार नाही. मी अब्राहाम, इसहाक व याकोब यांना वचन दिले होते. त्यांना मी ही जमीन द्यायचे कबूल केले होते. परंतु त्यांनी मला मनापासून अनुसरले नाही. म्हणून त्यांना हा प्रदेश मिळणार नाही.
11 ‘Como não me seguiram de coração íntegro, nenhum dos homens de vinte anos para cima que saíram do Egito verá a terra que prometi sob juramento a Abraão, a Isaque e a Jacó,
12 फक्त कनिज्जी यफुन्नेचा मुलगा कालेब आणि नूनाचा मुलगा यहोशवा हे मनापासून परमेश्वरास अनुसरले.
12 com exceção de Calebe, filho de Jefoné, o quenezeu, e Josué, filho de Num, seguiram ao Senhor com integridade de coração’.
13 परमेश्वर इस्राएल लोकांवर खूप रागावला होता. परमेशवराच्यादृष्टीने त्यांनी वाईट कृत्ये केली त्यांची सर्व पिढी नष्ट होईपर्यंत त्यांना चाळीस वर्षे रानात भटकावयास लावले.
13 A ira do Senhor acendeu-se contra Israel, e ele os fez andar errantes no deserto durante quarenta anos, até que passou toda a geração daqueles que lhe tinham desagradado com seu mau procedimento.
14 आणि आता तुमच्या वाडवडिलांनी जी गोष्ट केली तीच तुम्ही करीत आहात. पाप्यांनो परमेश्वराने त्याच्या इस्राएल लोकांवर आणखी रागवावे अशी तुमची इच्छा आहे का?
14 "E aí estão vocês, raça de pecadores, pondo-se no lugar dos seus antepassados e acendendo ainda mais a ira do Senhor contra Israel.
15 जर तुम्ही परमेश्वराची भक्ति करायचे सोडले तर परमेश्वर इस्राएल लोकांस अधिक काळ रानात ठेवील आणि नंतर तुम्ही त्या सर्व लोकांचा नाश कराल.
15 Se deixarem de segui-lo, de novo ele os abandonará no deserto, e vocês serão o motivo da destruição de todo este povo".
16 पण रऊबेनाच्या आणि गादच्या घराण्यातील लोक मोशेकडे गेले. ते म्हणाले, आम्ही या जागेवर आमच्या मुलांसाठी शहरे आणि आमच्या जनावरांसाठी गोठे उभारू.
16 Então se aproximaram dele e disseram: "Gostaríamos de construir aqui currais para o nosso gado e cidades para as nossas mulheres e filhos.
17 त्यामुळे आमची मुले याठिकाणी वस्ती करणाऱ्या इतर लोकांपासून सुरक्षित राहतील. पण आम्ही इस्राएलाच्या इतर लोकांस मदत करण्यासाठी आनंदाने येऊ. आम्ही त्यांना त्यांच्या प्रदेशात आणू.
17 Mas nós nos armaremos e estaremos prontos para ir à frente dos israelitas até que os tenhamos levado ao seu lugar. Enquanto isso, nossas mulheres e nossos filhos morarão em cidades fortificadas para se proteger dos habitantes da terra.
18 इस्राएलातील प्रत्येकाला त्याचे वतन मिळाल्याशिवाय आम्ही परतणार नाही.
18 Não retornaremos aos nossos lares enquanto todos os israelitas não receberem a sua herança.
19 यार्देनेच्या अलीकडे पूर्वेस आम्हास आमचे वतन प्राप्त झाले म्हणून आम्ही यार्देनेच्या पलीकडे व पुढे त्यांच्याबरोबर वतन घेणार नाही.
19 Não receberemos herança alguma com eles do outro lado do Jordão, uma vez que a nossa herança nos seja dada no lado leste do Jordão".
20 तेव्हा मोशे त्यांना म्हणाला, जर तुम्ही या सर्व गोष्टी केल्या तर हा प्रदेश तुमचा होईल. परंतु तुमच्या सैनिकांनी परमेश्वरासमोर लढाईत उतरले पाहिजे.
20 Disse-lhes Moisés: "Se fizerem isso, se perante o Senhor vocês se armarem para a guerra,
21 आणि तो आपणापुढून आपले शत्रू वतनातून घालवीन आणि देश परमेश्वरापुढे हस्तगत होईल तुमच्या सैन्याने यार्देन नदी पार करून शत्रू सैन्याला या प्रदेशातून हाकलले पाहीजे.
21 e se, armados, todos vocês atravessarem o Jordão perante o Senhor até que ele tenha expulsado os seus inimigos da frente dele,
22 आणि तर तो देश त्याच्या ताब्यात आल्यावर तुम्ही परत याल. नंतर परमेश्वराकडे आणि इस्राएलाकडे तुम्ही निरपराधी असाल. तर हा देश परमेश्वरापुढे तुमचे वतन असा होईल.
22 então, quando a terra estiver subjugada perante o Senhor, vocês poderão voltar e estarão livres da sua obrigação para com o Senhor e para com Israel. E esta terra será propriedade de vocês perante o Senhor.
23 पण जर तुम्ही या गोष्टी केल्या नाहीत तर तुम्ही परमेश्वराविरूद्ध पाप कराल आणि तुमच्या पापाबद्दल तुम्हास शासन होईल याची खात्री बाळगा.
23 "Mas, se vocês não fizerem isso, estarão pecando contra o Senhor; e estejam certos de que vocês não escaparão do pecado que cometeram.
24 तुमच्या मुलांसाठी शहरे वसवा आणि जनावरांसाठी गोठे बांधा. पण तुम्ही वचन दिल्याप्रमाणे सारे काही करा.
24 Construam cidades para as suas mulheres e crianças, e currais para os seus rebanhos, mas façam o que vocês prometeram".
25 नंतर रऊबेन आणि गादच्या कुटुंबातील लोक मोशेला म्हणाले, आम्ही तुझे नोकर आहोत. तू आमचा मालक आहेस म्हणून तू जे सांगतोस ते आम्ही करु.
25 Então os homens de Gade e de Rúben disseram a Moisés: "Nós, seus servos, faremos como o meu senhor ordena.
26 आमच्या स्त्रिया, मुले, शेरडेमेंढरे आणि सर्व गुरेढोरे गिलाद शहरात राहतील.
26 Nossos filhos e mulheres, todos os nossos rebanhos ficarão aqui nas cidades de Gileade.
27 पण आम्ही, तुझे नोकर यार्देन नदी पार करु. आम्ही परमेश्वरापुढे लढाईस जाऊ. जसे आमचा धनी सांगत आहे.
27 Mas os seus servos, todos os homens armados para a batalha, atravessarão para lutar perante o Senhor, assim como o meu senhor está dizendo".
28 याप्रमाणे त्यांनी वचन दिले. ते मोशे, याजक एलाजार, नूनाचा मुलगा यहोशवा आणि इस्राएलचे सर्व वंशाचे प्रमुख या सर्वांनी ते ऐकले.
28 Moisés deu as seguintes instruções acerca deles ao sacerdote Eleazar, a Josué, filho de Num, e aos chefes de família das tribos israelitas:
29 मोशे त्यांना म्हणाला, गाद आणि रऊबेनचे लोक यार्देन नदी पार करतील. ते लढाईत परमेश्वराच्यापुढे चालतील. ते तुम्हास प्रदेश जिंकायला मदत करतील आणि तुम्ही गिलादाचा प्रदेश त्यांच्या वाटेचा भाग म्हणून द्याल.
29 "Se os homens de Gade e de Rúben, todos eles armados para a batalha, atravessarem o Jordão com vocês perante o Senhor, então, quando a terra for subjugada perante vocês, entreguem-lhes como propriedade a terra de Gileade.
30 पण ते तुमच्या सैन्याबरोबर जाण्यात अपयशी ठरले तर कनानमध्ये तुमच्यामध्ये त्यांना वतन मिळेल.
30 Mas, se não atravessarem armados com vocês, terão que aceitar a propriedade deles com vocês em Canaã".
31 गाद आणि रऊबेनच्या लोकांनी उत्तर दिले व म्हणाले, “आम्ही परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सर्वकाही करण्याचे वचन देतो.”
31 Os homens de Gade e de Rúben responderam: "Os seus servos farão o que o Senhor disse.
32 आम्ही स्वतः सशस्र होऊन परमेश्वरापुढे पलीकडे कनान देशात जाऊ. पण आमचे वतन यार्देन नदीच्या पूर्वेला असावे.
32 Atravessaremos o Jordão perante o Senhor e entraremos armados em Canaã, mas a propriedade que vamos herdar estará deste lado do Jordão".
33 तेव्हा मोशेने गादाचे वंशज, रऊबेनाचे वंशज आणि योसेफाचा मुलगा मनश्शे याचा अर्धा वंश अमोऱ्याचा राजा सीहोन याच्या राज्याचा व बाशानाचा राजा ओग याच्या राज्याचा देश दिला. देश, नगरे व त्यामध्ये आजुबाजूच्या प्रदेशातील नगरे दिली.
33 Então Moisés deu às tribos de Gade e de Rúben e à metade da tribo de Manassés, filho de José, o reino de Seom, rei dos amorreus, e o reino de Ogue, rei de Basã, toda a terra com as suas cidades e o território ao redor delas.
34 गादच्या लोकांनी दीबोन, अटारोथ, अरोएर,
34 A tribo de Gade construiu Dibom, Atarote, Aroer,
35 अटारोथ-शोफान, याजेर यागबहा,
35 Atarote-Sofã, Jazar, Jogbeá,
36 बेथ-निम्रा आणि बेथ-हारान ही शहरे वसवली. त्यांनी शहराभोवती तटबंदी उभारली आणि त्यांच्या जनावरांसाठी गोठे बांधले.
36 Bete-Ninra e Bete-Harã como cidades fortificadas, e fez currais para os seus rebanhos.
37 रऊबेनच्या लोकांनी हेशबोन, एलाले, किर्याथाईम.
37 E a tribo de Rúben reconstruiu Hesbom, Eleale e Quiriataim,
38 नबो व बाल-मौन आणि सिब्मा ही शहरे वसवली. त्यांनी पुन्हा वसवलेल्या शहरांना जुनीच नावे दिली. पण नेबो आणि बाल-मोनचे नांव त्यांनी बदलले.
38 bem como Nebo e Baal-Meom ( esses nomes foram mudados ) e Sibma. E deu outros nomes a essas cidades.
39 माखीरच्या कुटुंबातील लोक गिलादाला गेले माखीर मनश्शेचा मुलगा होता. त्यांनी त्या शहराचा पराभव केला. तेथे राहणाऱ्या अमोरी लोकांस घालवले.
39 Os descendentes de Maquir, filho de Manassés, foram a Gileade, tomaram posse dela e expulsaram os amorreus que lá estavam.
40 मोशेने गिलाद मनश्शेच्या कुटुंबातील माखीराला दिले. म्हणून त्याचे कुटुंब तेथे राहिले.
40 Então Moisés deu Gileade aos maquiritas, descendentes de Manassés, e eles passaram a habitar ali.
41 मनश्शेच्या कुटुंबातील याईर याने छोट्या शहरांचा पराभव केला. नंतर त्याने त्यांना याईराची शहरे असे म्हटले.
41 Jair, descendente de Manassés, conquistou os povoados deles e os chamou Havote-Jair.
42 नोबाहाने कनाथ व त्याच्या आसपासच्या छोट्या शहरांचा पराभव केला. नंतर त्याने त्या जागेला आपले नाव दिले.
42 E Noba conquistou Quenate e os seus povoados e a chamou Noba, de acordo com o seu nome.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?