Marcos 5

MAR vs ARIB

Sair da comparação
ARIB Almeida Revisada Imprensa Bíblica
1 मग येशू आणि त्याचे शिष्य सरोवराच्या पलीकडे, गरसेकरांच्या प्रदेशात आले.
1 Chegaram então ao outro lado do mar, à terra dos gerasenos.
2 तो तारवातून उतरताच अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य कबरांतून निघून त्यास भेटला.
2 E, logo que Jesus saíra do barco, lhe veio ao encontro, dos sepulcros, um homem com espírito imundo,
3 तो कबरांमध्ये राहत असे व त्यास साखळदंडाने आणखी बांधून ठेवणे आता कोणाला शक्य नव्हते.
3 o qual tinha a sua morada nos sepulcros; e nem ainda com cadeias podia alguém prendê-lo;
4 कारण त्यास पुष्कळ वेळा बेड्यांनी व साखळदंडांनी बांधले असताही, त्याने साखळदंड तोडून टाकले होते व बेड्यांचे तुकडे तुकडे केले होते आणि त्यास ताब्यात ठेवण्याचे सामर्थ्य कोणालाही नव्हते.
4 porque, tendo sido muitas vezes preso com grilhões e cadeias, as cadeias foram por ele feitas em pedaços, e os grilhões em migalhas; e ninguém o podia domar;
5 तो नेहमी रात्रंदिवस कबरांमध्ये व डोंगरांमध्ये राहून ओरडत असे व टोकदार दगडांनी आपले अंग ठेचून घेत असे.
5 e sempre, de dia e de noite, andava pelos sepulcros e pelos montes, gritando, e ferindo-se com pedras,
6 येशूला दुरून पाहताच, तो धावत आला व त्याच्या पाया पडला.
6 Vendo, pois, de longe a Jesus, correu e adorou-o;
7 आणि मोठ्याने ओरडून म्हणाला, “हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? मी तुला देवाची शपथ घालतो, मला छळू नकोस.”
7 e, clamando com grande voz, disse: Que tenho eu contigo, Jesus, Filho do Deus Altíssimo? conjuro-te por Deus que não me atormentes.
8 कारण येशू त्यास म्हणत होता, “अरे अशुद्ध आत्म्या, या मनुष्यातून निघ.”
8 Pois Jesus lhe dizia: Sai desse homem, espírito imundo.
9 त्याने त्यास विचारले, “तुझे नाव काय?” त्याने उत्तर दिले, “माझे नाव सैन्य, कारण आम्ही पुष्कळ आहोत.
9 E perguntou-lhe: Qual é o teu nome? Respondeu-lhe ele: Legião é o meu nome, porque somos muitos.
10 आणि आम्हास या देशातून घालवू नकोस” अशी तो त्यास आग्रहाने विनंती करत होता.
10 E rogava-lhe muito que não os enviasse para fora da região.
11 तेथे डोंगराच्या कडेला डुकरांचा एक मोठा कळप चरत होता.
11 Ora, andava ali pastando no monte uma grande manada de porcos.
12 तेव्हा अशुद्ध आत्म्यांनी त्यास विनंती केली की, “आम्ही त्या डुकरांत शिरावे, म्हणून त्यांच्याकडे आम्हास लावून दे.”
12 Rogaram-lhe, pois, os demônios, dizendo: Manda-nos para aqueles porcos, para que entremos neles.
13 मग त्याने त्यास परवानगी दिली. तेव्हा ते अशुद्ध आत्मे निघून डुकारात शिरले आणि तो सुमारे दोन हजार डुकरांचा कळप तडक धावत जाऊन कड्यावरून सरोवरात पडला व पाण्यात गुदमरून मरण पावला.
13 E ele lho permitiu. Saindo, então, os espíritos imundos, entraram nos porcos; e precipitou-se a manada, que era de uns dois mil, pelo despenhadeiro no mar, onde todos se afogaram.
14 डुकरे राखणारे पळाले व त्यांनी गावात व शेतमळ्यांत हे वर्तमान सांगितले, तेव्हा काय झाले हे पाहण्यास लोक आले.
14 Nisso fugiram aqueles que os apascentavam, e o anunciaram na cidade e nos campos; e muitos foram ver o que era aquilo que tinha acontecido.
15 ते येशूजवळ आल्यावर तो भूतग्रस्त, म्हणजे ज्यात सैन्य होते तो, कपडे घातलेला आणि शुद्धीवर आलेला त्यांच्या दृष्टीस पडला आणि त्यांना भीती वाटली.
15 Chegando-se a Jesus, viram o endemoninhado, o que tivera a legião, sentado, vestido, e em perfeito juízo; e temeram.
16 ज्यांनी ते पाहिले होते त्यांनी भूतग्रस्ताला काय झाले ते व डुकरांविषयीची हकीकत इतरांना सांगितली.
16 E os que tinham visto aquilo contaram-lhes como havia acontecido ao endemoninhado, e acerca dos porcos.
17 तेव्हा आपण आमच्या प्रांतातून निघून जावे असे ते त्यास विनवू लागले.
17 Então começaram a rogar-lhe que se retirasse dos seus termos.
18 मग तो तारवात जात असता, पूर्वी भूतग्रस्त असलेला मनुष्य त्यास विनंती करू लागला की, मलाही तुमच्या सोबत घ्या.
18 E, entrando ele no barco, rogava-lhe o que fora endemoninhado que o deixasse estar com ele.
19 परंतु त्याने त्यास आपल्या सोबत येऊ दिले नाही, तर त्यास म्हटले, “तू आपल्या घरी स्वकीयांकडे जा आणि प्रभूने तुझ्यासाठी केवढी मोठी कामे केली व तुझ्यावर कशी दया केली हे त्यांना सांग.”
19 Jesus, porém, não lho permitiu, mas disse-lhe: Vai para tua casa, para os teus, e anuncia-lhes o quanto o Senhor te fez, e como teve misericórdia de ti.
20 तेव्हा तो निघाला आणि येशूने जी मोठी कामे त्याच्यासाठी केली होती ती दकापलीस येथे जाहीर करू लागला. तेव्हा सर्वांस आश्चर्य वाटले.
20 Ele se retirou, pois, e começou a publicar em Decápolis tudo quanto lhe fizera Jesus; e todos se admiravam.
21 मग येशू तारवात बसून पलीकडे परत गेल्यावर त्याच्याजवळ लोकांचा मोठा समुदाय जमला आणि तो सरोवराजवळ होता.
21 Tendo Jesus passado de novo no barco para o outro lado, ajuntou-se a ele uma grande multidão; e ele estava à beira do mar.
22 तेव्हा याईर नावाचा सभास्थानाचा एक अधिकारी येथे आला व त्यास पाहून त्याच्या पाया पडला.
22 Chegou um dos chefes da sinagoga, chamado Jairo e, logo que viu a Jesus, lançou-se-lhe aos pés.
23 त्याने आग्रहाने त्यास विनवणी केली की, “माझी लहान मुलगी मरायला टेकली आहे. तिने बरे होऊन जगावे म्हणून आपण येऊन तिच्यावर हात ठेवा.”
23 e lhe rogava com instância, dizendo: Minha filhinha está nas últimas; rogo-te que venhas e lhe imponhas as mãos para que sare e viva.
24 मग तो त्याच्याबरोबर निघाला तेव्हा पुष्कळ लोक त्याच्यामागून चालत होते आणि त्याच्याभोवती गर्दी करीत होते.
24 Jesus foi com ele, e seguia-o uma grande multidão, que o apertava.
25 आणि तेथे रक्तस्रावाने बारा वर्षे पीडलेली एक स्त्री होती.
25 Ora, certa mulher, que havia doze anos padecia de uma hemorragia,
26 तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्याजवळ जे काही होते ते सर्व खर्च केले होते तरी तिला काही गुण न येता तिचे दुखणे अधिकच झाले होते.
26 e que tinha sofrido bastante às mãos de muitos médicos, e despendido tudo quanto possuía sem nada aproveitar, antes indo a pior,
27 येशूविषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्यामागे येऊन त्याच्या वस्त्राला स्पर्श केला.
27 tendo ouvido falar a respeito de Jesus, veio por detrás, entre a multidão, e tocou-lhe o manto;
28 कारण ती म्हणत होती, “केवळ याच्या वस्त्रांना स्पर्श जरी केला तरी मी बरी होईन.”
28 porque dizia: Se tão-somente tocar-lhe as vestes, ficaria curada.
29 तेव्हा लगेचच तिचा रक्तस्राव थांबला आणि आपण त्या पीडेपासून बरे झालो आहोत असा तिला शरीरात अनुभव आला.
29 E imediatamente cessou a sua hemorragia; e sentiu no corpo estar já curada do seu mal.
30 आपणामधून शक्ती निघाली आहे हे येशूने आपल्याठायी लगेच ओळखले आणि गर्दीमध्ये वाळून म्हटले, “माझ्या वस्त्रांना कोणी स्पर्श केला?”
30 E logo Jesus, percebendo em si mesmo que saíra dele poder, virou-se no meio da multidão e perguntou: Quem me tocou as vestes?
31 त्याचे शिष्य त्यास म्हणाले, “लोकसमुदाय आपणाभोवती गर्दी करत आहे हे आपण पाहत आहा, तरी आपण म्हणता, मला कोणी स्पर्श केला?”
31 Responderam-lhe os seus discípulos: Vês que a multidão te aperta, e perguntas: Quem me tocou?
32 मग जिने हे केले होते तिला पाहण्यास त्याने सगळीकडे बघितले.
32 Mas ele olhava em redor para ver a que isto fizera.
33 तेव्हा ती स्त्री आपल्या बाबतीत जे काही घडले, ते जाणून भीत भीत व कापत कापत त्याच्याकडे आली व त्याच्या पाया पडून तिने त्यास सर्वकाही सत्य सांगितले.
33 Então a mulher, atemorizada e trêmula, cônscia do que nela se havia operado, veio e prostrou-se diante dele, e declarou-lhe toda a verdade.
34 तो तिला म्हणाला, “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. शांतीने जा आणि तुझ्या पीडेपासून मुक्त हो.”
34 Disse-lhe ele: Filha, a tua fé te salvou; vai-te em paz, e fica livre desse teu mal.
35 येशू हे बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराकडून काही माणसे येऊन त्यास म्हणाली, “आपली मुलगी मरण पावली, आता गुरुजींना त्रास कशाला देता?”
35 Enquanto ele ainda falava, chegaram pessoas da casa do chefe da sinagoga, a quem disseram: A tua filha já morreu; por que ainda incomodas o Mestre?
36 परंतु येशू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष्य न देता, सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, “भिऊ नकोस. विश्वास मात्र धर.”
36 O que percebendo Jesus, disse ao chefe da sinagoga: Não temas, crê somente.
37 त्याने पेत्र, याकोब व याकोबाचा भाऊ योहान, यांच्याशिवाय कोणालाही आपल्याबरोबर येऊ दिले नाही.
37 E não permitiu que ninguém o acompanhasse, senão Pedro, Tiago, e João, irmão de Tiago.
38 मग ते सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराजवळ आले, तेव्हा रडत असलेल्या व फारच आकांत करीत असलेल्या लोकांची गडबड त्याने पाहिली.
38 Quando chegaram a casa do chefe da sinagoga, viu Jesus um alvoroço, e os que choravam e faziam grande pranto.
39 तो आत जाऊन त्यास म्हणाला, “तुम्ही कशाला रडता व गडबड करता? मूल मरण पावले नाही, झोपी गेले आहे.”
39 E, entrando, disse-lhes: Por que fazeis alvoroço e chorais? a menina não morreu, mas dorme.
40 तेव्हा ते त्यास हसू लागले. पण त्याने त्या सर्वांना बाहेर काढून दिले आणि मुलीचे आई-वडील व आपल्याबरोबरचे शिष्य यांना घेऊन मुलगी होती तेथे तो आत गेला.
40 E riam-se dele; porém ele, tendo feito sair a todos, tomou consigo o pai e a mãe da menina, e os que com ele vieram, e entrou onde a menina estava.
41 नंतर मुलीच्या हातास धरून तो म्हणाला, “तलीथा कूम,” याचा अर्थ, “मुली, मी तुला सांगतो, ऊठ.”
41 E, tomando a mão da menina, disse-lhe: Talita cumi, que, traduzido, é: Menina, a ti te digo, levanta-te.
42 आणि लगेच ती मुलगी उठून चालू लागली; (ती बारा वर्षाची होती.) ते अत्यंत आश्चर्यचकित झाले.
42 Imediatamente a menina se levantou, e pôs-se a andar, pois tinha doze anos. E logo foram tomados de grande espanto.
43 हे कोणाला कळता कामा नये, अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली आणि तिला खाण्यास द्या असे सांगितले.
43 Então ordenou-lhes expressamente que ninguém o soubesse; e mandou que lhe dessem de comer.

Ler em outra tradução

Comparar com outra