Josué 1

MAR vs ACF

Sair da comparação
ACF Almeida Corrigida Fiel
1 परमेश्वराचा सेवक मोशे ह्याच्या मरणानंतर असे झाले की, नूनाचा पुत्र यहोशवा, मोशेचा मुख्य मदतनीस याच्याशी परमेश्वर बोलला,
1 E sucedeu depois da morte de Moisés, servo do SENHOR, que o SENHOR falou a Josué, filho de Num, servo de Moisés, dizendo:
2 “माझा सेवक मोशे मरण पावला आहे, तर आता ऊठ, तू आणि हे सर्व लोक असे तुम्ही यार्देन, ओलांडून जो देश मी इस्राएल लोकांस, देत आहे त्यामध्ये जा.
2 Moisés, meu servo, é morto; levanta-te, pois, agora, passa este Jordão, tu e todo este povo, à terra que eu dou aos filhos de Israel.
3 मी मोशेला सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल, ते प्रत्येक ठिकाण मी तुम्हाला दिले आहे.
3 Todo o lugar que pisar a planta do vosso pé, vo-lo tenho dado, como eu disse a Moisés.
4 रान व हा लबानोन यापासून महानद, फरात नदीपर्यंतचा हित्ती यांचा सर्व देश, व मावळतीकडे भूमध्य सागराचा प्रदेश तुमचा होईल.
4 Desde o deserto e do Líbano, até ao grande rio, o rio Eufrates, toda a terra dos heteus, e até o grande mar para o poente do sol, será o vosso termo.
5 तुझ्या आयुष्यात तुझ्यापुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही, जसा मोशेबरोबर मी होतो तसाच तुझ्याबरोबरही मी असेन, मी तुला सोडून जाणार नाही. व तुला टाकणार नाही.
5 Ninguém te poderá resistir, todos os dias da tua vida; como fui com Moisés, assim serei contigo; não te deixarei nem te desampararei.
6 बलवान हो, धैर्य धर, कारण जो देश ह्या लोकांच्या पूर्वजांना देण्याची शपथ मी त्यांच्याजवळ वाहिली आहे तो तू यांना वतन म्हणून मिळवून देशील.
6 Esforça-te, e tem bom ânimo; porque tu farás a este povo herdar a terra que jurei a seus pais lhes daria.
7 मात्र तू बलवान हो व धैर्य धर, आणि माझा सेवक मोशे याने तुला दिलेले नियमशास्त्र सगळे काळजीपूर्वक पाळ, ते सोडून उजवीडावीकडे वळू नको, म्हणजे तू जाशील तिकडे यशस्वी होशील.
7 Tão-somente esforça-te e tem mui bom ânimo, para teres o cuidado de fazer conforme a toda a lei que meu servo Moisés te ordenou; dela não te desvies, nem para a direita nem para a esquerda, para que prudentemente te conduzas por onde quer que andares.
8 नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखातून निघून जाऊ नये म्हणून रात्रंदिवस त्याचे मनन कर, त्या जे काही लिहिले आहे ते सर्व तू पाळ. मग तुझी भरभराट होईल आणि तू यशस्वी होशील.
8 Não se aparte da tua boca o livro desta lei; antes medita nele dia e noite, para que tenhas cuidado de fazer conforme a tudo quanto nele está escrito; porque então farás prosperar o teu caminho, e serás bem sucedido.
9 मी तुला आज्ञा केली नाही का? बलवान हो, धीट हो, घाबरू नकोस, धैर्यहीन होऊ नकोस, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर असेल.”
9 Não to mandei eu? Esforça-te, e tem bom ânimo; não temas, nem te espantes; porque o Senhor teu Deus é contigo, por onde quer que andares.
10 मग यहोशवाने लोकांच्या पुढाऱ्यांना अशी आज्ञा केली की,
10 Então Josué deu ordem aos príncipes do povo, dizendo:
11 “छावणीतून फिरून लोकांस अशी आज्ञा द्या की, स्वतःसाठी अन्नसामग्री तयार करा. कारण तुमचा देव परमेश्वर जो देश तुम्हाला ताब्यात देणार आहे त्याचा ताबा घेण्यासाठी तीन दिवसाच्या आत तुम्हाला ही यार्देन ओलांडायची आहे.”
11 Passai pelo meio do arraial e ordenai ao povo, dizendo: Provede-vos de comida, porque dentro de três dias passareis este Jordão, para que entreis a possuir a terra que vos dá o Senhor vosso Deus, para a possuirdes.
12 मग यहोशवाने रऊबेनी, गादी व मनश्शेचा अर्धा वंश ह्यांना म्हटले,
12 E falou Josué aos rubenitas, e aos gaditas, e à meia tribo de Manassés, dizendo:
13 “परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने तुम्हाला जी आज्ञा दिली होती तिची आठवण करा, तो तुम्हाला म्हणाला होता की, तुम्हाला विसावा मिळावा म्हणून तुमचा देव परमेश्वर हा देश तुम्हाला देत आहे.
13 Lembrai-vos da palavra que vos mandou Moisés, o servo do Senhor, dizendo: O Senhor vosso Deus vos dá descanso, e vos dá esta terra.
14 या यार्देनेच्या पूर्वेकडील जो देश मोशेने तुम्हाला दिला आहे त्यामध्येच तुमच्या स्त्रिया, पुत्र-मुलेबाळे आणि गुरेढोरे ह्यांनी रहावे, पण तुम्ही सर्व योद्ध्यांनी सशस्त्र होऊन आपल्या बांधवांपुढे नदीपलीकडे जावे आणि त्यांना मदत करावी.
14 Vossas mulheres, vossos meninos e vosso gado fiquem na terra que Moisés vos deu deste lado do Jordão; porém vós passareis armados na frente de vossos irmãos, todos os valentes e valorosos, e ajudá-los-eis.
15 परमेश्वर तुमच्याप्रमाणेच तुमच्या बांधवांना विसावा देईल आणि तुमचा देव परमेश्वर ह्याने त्यांना दिलेल्या देशाचा ते ही ताबा घेतील, मग परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने यार्देनेच्या पूर्वेस, उगवतीकडे जो देश तुम्हाला दिला आहे, त्या तुमच्या वतनाच्या देशात परत येऊन त्याचा ताबा तुम्ही घ्यावा.”
15 Até que o Senhor dê descanso a vossos irmãos, como a vós, e eles também possuam a terra que o Senhor vosso Deus lhes dá; então tornareis à terra da vossa herança, e possuireis a que vos deu Moisés, o servo do Senhor, deste lado do Jordão, para o nascente do sol.
16 तेव्हा त्यांनी यहोशवाला उत्तर दिले, “जे काही करण्याची तू आम्हांला आज्ञा केली आहेस ते सर्व आम्ही करू आणि तू आम्हांला पाठवशील तिकडे आम्ही जाऊ.
16 Então responderam a Josué, dizendo: Tudo quanto nos ordenaste faremos, e onde quer que nos enviares iremos.
17 जसे आम्ही सर्व बाबतींत मोशेचे सांगणे ऐकत होतो तसेच आम्ही तुझेही ऐकू, मात्र तुझा देव परमेश्वर मोशेबरोबर होता तसाच तुझ्याबरोबर असो.
17 Como em tudo ouvimos a Moisés, assim te ouviremos a ti, tão-somente que o Senhor teu Deus seja contigo, como foi com Moisés.
18 जो कोणी तुझ्या आज्ञेविरूद्ध बंड करेल व तुझे शब्द पाळणार नाही त्यास देहान्त शिक्षा द्यावी. तू मात्र खंबीर हो व धैर्य धर.”
18 Todo o homem, que for rebelde às tuas ordens, e não ouvir as tuas palavras em tudo quanto lhe mandares, morrerá. Tão-somente esforça-te, e tem bom ânimo.

Ler em outra tradução

Comparar com outra