1 परमेश्वर असे म्हणतो, पाहा, मी बाबेलावर आणि
2 मी बाबेलाकडे परदेशीय पाठवीन. ते तिला पाखडून काढतील आणि तिचा देश उध्वस्त करतील,
3 तिरंदाजाने आपले धनुष्य वाकवू नये; त्यांनी चिलखते घालू नये.
4 कारण जखमी लोक खास्द्यांच्या भूमीत पडतील. वधलेले तिच्या रस्त्यांवर पडतील.
5 कारण जरी इस्राएलाच्या पवित्र प्रभूविरूद्ध केलेल्या अपराधांनी त्यांचा देश भरून गेला आहे,
6 बाबेलामधून पळून जा. प्रत्येक मनुष्याने आपणास वाचवावे. तिच्या अन्यायात नष्ट होऊ नये.
7 बाबेल परमेश्वराच्या हातातील सोन्याचा पेला होता, तिने सर्व देशाला धुंद केले आहे.
8 बाबेल अकस्मात पडेल आणि नाश होईल. त्याची शकले पडतील.
9 बाबेल बरी होण्याची आमची इच्छा होती, पण ती बरी झाली नाही, चला आपण सर्व तिला सोडून व
10 परमेश्वराने आपली नितीमत्ता जाहीर केली आहे. या,
11 बाण धारदार करा! ढाली घ्या. परमेश्वराने माद्य राजाचा आत्म्यास चिथावणी दिली आहे
12 बाबेलाच्या तटासमोर झेंडा उभारा. पहारा बळकट करा.
13 तुम्ही लोक जे बहुत पाण्याच्या प्रवाहाजवळ राहतात, जे तुम्ही लोक खजिन्यांनी धनवान आहात,
14 सेनाधीश परमेश्वराने आपल्याच जीविताची शपथ वाहिली आहे की, “टोळाच्या पीडेप्रमाणे, मी तुला तुझ्या शत्रूंनी भरीन.”
15 त्याने पृथ्वी आपल्या सामर्थ्याने निर्माण केली, त्याने आपल्या ज्ञानाने कोरडी भूमी स्थापिली
16 जेव्हा तो गरजतो, तेव्हा आकाशात पाण्याचा गडगडाट होतो, कारण तो पृथ्वीच्या शेवटापासून धुके वर आणतो.
17 प्रत्येक मनुष्य पशूसारखा ज्ञानहीन झाला आहे; प्रत्येक धातु कारागीर आपल्या मूर्तीमुळे लज्जित झाला आहे.
18 त्या निरुपयोगी आहेत, त्या चेष्टेचे काम आहे. त्यांच्या शिक्षेच्या दिवशी त्या नष्ट होतील.
19 पण देव, याकोबाचा हिस्सा, त्यासारखा नाही, कारण तो सर्व गोष्टींचा निर्माणकर्ता आहे. इस्राएल त्याच्या वतनाचा वंश आहे;
20 तू माझा लढाईचा हातोडा आहेस, माझे लढाईचे हत्यार आहेस.
21 तुझ्याबरोबर मी घोडे आणि त्यांचे स्वार त्यांचे तुकडे तुकडे करीन, तुझ्याबरोबर मी त्यांचे रथ आणि सारथी ह्यांचे तुकडे तुकडे करीन.
22 तुझ्याबरोबर मी प्रत्येक पुरुष आणि स्त्रिया यांचे तुकडे तुकडे करीन; तुझ्याबरोबर मी वृद्ध आणि तरुण यांचे तुकडे तुकडे करीन.
23 तुझ्याबरोबर मी मेंढपाळ व त्याचे कळप यांचे तुकडे तुकडे करीन; तुझ्याबरोबर मी शेतकरी आणि त्यांच्या बैलांची जोडी यांचे तुकडे तुकडे करीन.
24 परमेश्वर असे म्हणतो, मी बाबेलाला व खास्द्यांच्या देशातल्या सर्व राहणाऱ्यांनी जे अनिष्ट त्यांनी तुमच्या समक्ष
25 परमेश्वर असे म्हणतो, “हे नाश करणाऱ्या पर्वता तू जो दुसऱ्यांचा नाश करतो, मी तुझ्याविरूद्ध आहे, सर्व पृथ्वीचा नाश करतो.
26 म्हणून ते तुझ्यामधून इमारतीच्या कोपऱ्यासाठी किंवा पायासाठी एकही दगड तोडून घेणार नाहीत;
27 पृथ्वीवर निशाण उंच करा. राष्ट्रांमध्ये कर्णा फुंका. तिच्यावर हल्ला करण्यासाठी राष्ट्रांना नेमा.
28 तिच्याविरूद्ध हल्ला करण्यासाठी राष्ट्रे माद्यांचे राजे,
29 भूमी हालेल व यातना होतील, कारण बाबेल देश उजाड, निर्जन करण्याचे
30 बाबेलात सैनिक लढाई करायचे थांबले आहेत. ते त्यांच्या बालेकिल्ल्यात राहत आहेत.
31 बाबेलाच्या राजाला त्याचे नगर सर्वस्वी काबीज झाले आहे
32 नदीचे उतार जप्त झाले आहेत. शत्रू किल्ले जाळत आहेत
33 कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव असे म्हणतो, “मळण्याच्या वेळी खळे जसे असते त्यासारखी बाबेलाची कन्या आहे.
34 यरूशलेम म्हणते, बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सराने मला खाऊन टाकले आहे. त्याने मला निचरून कोरडे केले आहे
35 मजवर व माझ्या कुटूंबावर केलेला जुलूम बाबेलाविरूद्ध उलटो, असे सियोनामध्ये राहणारे म्हणतील.
36 म्हणून परमेश्वर असे म्हणतो, पाहा, मी तुझ्या दाव्याविषयी बाजू मांडीन आणि तुझ्यासाठी सूड घेईन.
37 बाबेल पडक्या इमारतीच्या दगडाविटांची रास, कोल्ह्यांचे राहण्याचे ठिकाण, दहशत,
38 “बाबेली जमून तरुण सिंहाप्रमाणे गर्जना करतील. ते सिंहाच्या छाव्याप्रमाणे गुरगुरतील.
39 जेव्हा ते अधाशीपणाने तप्त होतील, तेव्हा मी त्यांना मेजवानी देईन. मग त्यांनी उल्लास करून निरंतरची झोप घ्यावी
40 “मी त्यांना कोकरासारखे, मेंढे व बोकड यांच्यासारखे खाली कत्तल करण्यास घेऊन जाईन.
41 शेशख कसे काबीज झाले आहे! सर्व जगाचा प्रशंसा असा कसा धरला गेला आहे.
42 बाबेलावर समुद्र आला आहे! ती त्याच्या गरजणाऱ्या लाटांनी झाकली आहे.
43 तिची नगरे नाश झाली आहेत, कोरडी भूमी आणि ओसाड प्रदेश झाली आहे,
44 म्हणून बाबेलात मी बेलाला शिक्षा करीन; त्यांने जे गिळले आहे ते मी त्याच्या तोंडातून बाहेर आणील,
45 माझ्या लोकांनो, बाबेलाच्या शहरातून बाहेर या. माझ्या संतप्त क्रोधापासून तुम्ही प्रत्येकजण आपला जीव वाचवा.
46 देशातील जे वर्तमान ऐकण्यात येईल त्यांने भिऊ नका अथवा आपले हृदय खचू देऊ नका.
47 यास्तव, पाहा, दिवस येत आहेत की, जेव्हा मी बाबेलाच्या कोरीव मूर्तींना शिक्षा करील.
48 मग आकाश व पृथ्वी आणि त्यामध्ये जे काही आहे ते सर्व बाबेलावर आनंद करतील.
49 बाबेलाने जसे इस्राएलाचे वधलेले पडतील असे केले आहे,
50 जे तुम्ही तलवारीपासून वाचले आहात, दूर जा! थांबू नका.
51 “आम्ही अपमान ऐकला आहे, म्हणून आम्ही लज्जित झालो आहोत. लाजेने आमची तोंडे झाकली आहेत,
52 यास्तव परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की, मी तिच्या कोरीव मूर्तींना शिक्षा करीन,
53 कारण जरी बाबेल आकाशापर्यंत वर चढली किंवा जरी तिने आपले बळाचे उंचस्थान मजबूत केले,
54 “बाबेलातून दुःखाच्या आरोळीचा, खास्द्यांच्या देशातून मोठा कोसळण्याचा आवाज येतो.
55 कारण परमेश्वर बाबेलाचा नाश करत आहे. तिच्यातील मोठा आवाज तो नष्ट करत आहे.
56 कारण तिच्यावर, म्हणजे बाबेलाविरूद्ध नाश करणारा आला आहे, आणि तिचे योद्धे पकडले गेले आहेत.
57 कारण मी तिचे सरदार, तिचे ज्ञानी, तिचे अधिकारी आणि तिचे सैनिक मस्त होतील
58 सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “बाबेलाची जाड तटबंदी जमीनदोस्त केली जाईल,
59 महसेयाचा मुलगा नेरीया याचा मुलगा सारया
60 यिर्मयाने बाबेलावर जे सर्व अरिष्ट येणार होते ते म्हणजे बाबेलाविषयीची ही सर्व वचने एका गुंडाळीवर लिहिली होती.
61 यिर्मया सरायाला म्हणाला, “जेव्हा, तू बाबेलास जाशील तेव्हा ही सर्व वचने वाचण्याची खात्री करून घे.
62 आणि म्हण, ‘हे परमेश्वरा, तू स्वतः या स्थानाविषयी बोलला आहेस की, ते नष्ट होईल. मग तेथे कोणी रहिवासी किंवा लोक व पशू राहणार नाहीत. ती कायमची टाकाऊ होईल.’
63 मग जेव्हा ही गुंडाळी वाचून संपताच त्यास एक दगड बांध आणि फरात नदीमध्ये फेकून दे.
64 म्हण ‘बाबेल याप्रमाणे बुडेल. जे अरिष्ट मी तिच्याविरूद्ध पाठवणार आहे त्यामुळे ती कधीही वर येणार नाही आणि ते थकून जातील.” येथे यिर्मयाची वचने संपली.