Jeremias 50

MAR

1 बाबेल देश व खास्द्यांच्या लोकांविषयी हे वचन परमेश्वराने यिर्मया संदेष्ट्याच्या हाती सांगितले.

2 राष्ट्रांत घोषणा कर व ऐकू येईल असे सांगा! निशाण उंच करा आणि ऐकू येईल असे सांगा. गुप्त ठेवू नका.

3 उत्तरेकडचे एक राष्ट्र तिच्याविरूद्ध उठले आहे, ते तिचा देश ओसाड करील.

4 परमेश्वर असे म्हणतो, त्या दिवसात आणि त्यावेळी इस्राएलाचे व यहूदाचे लोक

5 ते सियोनेची वाट विचारतील व ते त्या दिशेने चालायला सुरवात करतील.

6 माझे लोक हरवलेला कळप असे झाले आहेत.

7 प्रत्येकजण जो कोणी त्यांच्याकडे बाहेर गेला त्यांनी त्यास खाऊन टाकले. त्यांचे शत्रू म्हणाले, आम्ही दोषी नाही,

8 “बाबेलच्या मध्यापासून भटका आणि खास्द्यांच्या देशातून निघून जा;

9 कारण पाहा, मी उत्तरेकडून मोठ्या राष्ट्रांचा समूह उठवून बाबेलाविरूद्ध आणीन आणि ते सज्ज होऊन येतील.

10 खास्द्यांची लूट होईल. जे कोणी त्यांना लुटेल तो तृप्त होईल.” असे परमेश्वर म्हणतो.

11 माझे वतन लुटणाऱ्यांनो, तुम्ही आनंद व उत्सव करता; जसे तुम्ही वासरू त्याच्या कुरणात सभोवती पाय आपटत उड्या मारते,

12 तरी तुमची आई अत्यंत लज्जित होईल. जी कोणी तुला जन्म देणारी तिला लाज वाटेल.

13 परमेश्वराच्या क्रोधामुळे बाबेलात वस्ती होणार नाही, परंतु संपूर्ण उध्वस्त होईल.

14 तुम्ही सर्व बाबेलाविरूद्ध सभोवती मांडणी करून सज्ज व्हा. प्रत्येकजण जो कोणी धनुष्य वाकवतो त्याने तिच्यावर मारा करावा.

15 तिच्याविरूद्ध तिच्या सर्व सभोवताली विजयाची आरोळी मारा; तिने आपले सामर्थ्य समर्पण केले आहे. तिचे बुरुज पडले आहेत.

16 बाबेलामधील पेरणारा आणि कापणीच्यावेळी विळा चालवणारा या दोघांचा नाश करा.

17 “इस्राएल विखुरलेले मेंढरू आहे आणि सिंहाने दूर पळवून लावले आहे. प्रथम अश्शूराच्या राजाने त्यास खाल्ले;

18 म्हणून सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, पाहा, जसे मी अश्शूराच्या राजाला शिक्षा केली तसे मी बाबेलाच्या राजाला व देशाला शिक्षा करणार आहे.

19 “मी इस्राएलाला त्याच्या मातृभूमीत स्थापित करीन. तो कर्मेल व बाशानावर चरेल.

20 परमेश्वर म्हणतो, “त्या दिवसात आणि त्यावेळी, इस्राएलाचा अपराध शोधण्यात येईल,

21 परमेश्वर असे म्हणतो, मराथाईम देशाविरूद्ध उठ, त्याच्याविरुध्द आणि पकोडच्या रहिवाश्यांवर चढाई कर.

22 युध्दाचा मोठा आवाज आणि देशात प्रचंड नाश होत आहे.

23 सर्व देशांचा हातोडा कसा मोडून तोडून टाकिला आहे आणि नाश झाला आहे.

24 हे बाबेला, मी तुझ्यासाठी सापळा रचला आहे, तू पकडला गेला आहे आणि तुला समजले नाही.

25 परमेश्वराने आपले शस्रागार उघडले आहे आणि आपली हत्यारे त्याने बाहेर आणली आहेत कारण त्यास आपला क्रोध अंमलात आणायचा आहे.

26 दूरवरुन तिच्यावर हल्ला करा. तिची धान्याची कोठारे उघडा आणि धान्याच्या राशीप्रमाणे त्याचे ढीग करा.

27 तिचे सर्व बैल मारून टाका. त्यांना खाली कत्तलीच्या जागी पाठवा.

28 बाबेल देशामधून जे कोणी वाचलेले आहेत ते पळून जात आहेत त्यांचा आवाज तेथे आहे. तो आवाज ते

29 “बाबेलाविरूद्ध जो कोणी त्यांचे सर्व धनुष्य वाकवणारे धनुर्धारी यांना हुकूम द्या. त्यांच्याविरुद्ध तळ द्या आणि

30 म्हणून तिचे तरुण पुरुष नगरातल्या चौकात पडतील, आणि तिचे सर्व लढणारे त्या दिवशी नाश होतील.” असे परमेश्वर म्हणतो.

31 “हे गर्विष्ठा, पाहा, मी तुझ्याविरूद्ध आहे” असे प्रभू, सेनाधीश परमेश्वर म्हणतो.

32 म्हणून गर्विष्ठ अडखळून पडेल. तिला कोणीही उठवणार नाही.

33 सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “इस्राएली लोक, यहूदी लोक याजवर बरोबर एकत्र जुलूम होत आहेत.

34 त्यांचा उद्धारकर्ता समर्थ आहे; ‘सेनाधीश परमेश्वर हे त्याचे नाव आहे’ तो खचित त्यांचा वाद चालवील,

35 परमेश्वर असे म्हणतो, खास्द्यांविरूद्ध, बाबेलाच्या राहणाऱ्याविरूद्ध, तिचे नेते

36 जे कोणी भविष्यासाठी वचन सांगतात त्यांच्याविरुद्ध तलवार आली आहे, याकरिता की, ते आपल्यास मूर्खाप्रमाणे प्रकट करतील.

37 त्यांच्या घोड्याविरूद्ध, त्यांच्या रथावर आणि बाबेलाच्यामध्ये जे कोणी लोक राहतात त्या सर्वांवर तलवार आली आहे.

38 तलवार तिच्या पाण्याविरूद्ध येईल, मग ते कोरडे होईल.

39 यास्तव रानटी पशू कोल्ह्यासहीत तेथे वस्ती करतील आणि तरुण शहामृग तेथे राहतील;

40 परमेश्वर असे म्हणतो, देवाने जसा सदोम, गमोरा आणि त्यांचे शेजारी यांचा नाश केला. त्याचप्रमाणे,

41 “पाहा! उत्तरेकडून लोक येत आहेत. कारण एक महान शक्तीशाली राष्ट्र आणि

42 ते धनुष्य व भाले धारण करतात. ते क्रूर आहेत आणि त्यांच्याजवळ दया नाही.

43 बाबेलाच्या राजाने त्यांचे वर्तमान ऐकले आहे आणि त्याचे हात विपत्तीने गळाले आहेत.

44 “पाहा, जसा सिंह यार्देनेच्या दाट झुडुपांतून बाहेर येतो, तसा तो मजबूत वस्तीवर येईल.

45 तर बाबेलाविरूद्ध परमेश्वराने जी योजना ठरवली आहे ती,

46 बाबेल जिंकून घेण्याच्या आवाजाने पृथ्वी हादरेल आणि त्यांच्या दुःखाची आरोळी राष्ट्रांमध्ये ऐकायला येईल.

Ler em outra tradução

Comparar lado a lado