1 आमोज याचा मुलगा यशया ह्याने यहूदा व यरूशलेम ह्याविषयी उज्जीया, योथाम, आहाज व हिज्कीया या यहूदी राजांच्या कालकिर्दीच्या काळात पुढे घडून येणाऱ्या गोष्टींविषयीचा दृष्टांत पाहिला.
2 हे आकाशा, ऐक आणि हे पृथ्वी लक्षपूर्वक कान दे; कारण परमेश्वर हे बोलला आहेः
3 बैल आपल्या धन्याला ओळखतो, आणि गाढव आपल्या मालकाचे खाण्याचे कुंड ओळखतो,
4 अहाहा! हे राष्ट्र, पापी, दुष्कृत्यांच्या भाराने खाली दबलेले लोक,
5 तुम्ही अजूनही का मार खाता? तुम्ही अधिकाधिक बंड का करता?
6 पायाच्या तळव्यापायापासून डोक्यापर्यंत ज्याला दुखापत झाली नाही असा भाग राहीला नाही;
7 तुमचा ओसाड झाला आहे; तुमची नगरे जळून गेली आहेत.
8 सियोनाची कन्या ही द्राक्षाच्या मळ्यातील खोपटीसारखी,
9 जर सेनाधीश परमेश्वराने आम्हासाठी थोडेही शिल्लक ठेवले नसते तर
10 सदोमाच्या अधिकाऱ्यांनो, परमेश्वराचा वचन ऐका;
11 परमेश्वर म्हणतो, “तुमचे असंख्य यज्ञबली माझ्या काय कामाचे?
12 जेव्हा तुम्ही मजसमोर सादर होण्यास येता,
13 पुन्हा निरर्थक अशी अर्पणे आणू नका; धुपाचा मला तिटकारा आहे.
14 तुमची चंद्रदर्शने व तुम्ही नेमलेले सण यांचा माझा जीव द्वेष करतो;
15 म्हणून जेव्हा तुम्ही प्रार्थनेत हात पसरता, तेव्हा मी आपले डोळे तुम्हापासून झाकीन;
16 स्वतःला धुवा, स्वच्छ करा;
17 चांगले करण्यास शिका;
18 परमेश्वर म्हणतो, “आता या, व एकमेकांशी संवाद करून हे जाणून घ्या;
19 जर तुमची इच्छा असेल व तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल,
20 परंतु जर तुम्ही नाकाराल व बंड कराल, तर तलवार तुमचा नाश करील,”
21 विश्वासू नगरी वेश्या कशी झाली! ती जी की पूर्णपणे न्यायी होती, धार्मिकतेने परिपूर्ण होती,
22 तुमची चांदी अशुद्ध झाली आहे, तुमच्या द्राक्षरसात पाणी मिसळले आहे.
23 तुमचे सरदार बंडखोर व चोरांचे साथीदार आहेत;
24 यांकरीताच प्रभू, सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा सामर्थ्यशाली देव हे म्हणतो कीः
25 मी तुजविरूद्ध आपला हात वळवून,
26 मी तुझे सर्व न्यायधीश पूर्वी जसे होते तसे करीन, तुझे सर्व सल्लागार सुरवातीस जसे होते तसे करीन,
27 सियोनेचा न्यायाने उद्धार होईल व तिच्यातील पश्चातापी लोकांचा धार्मिकतेने उद्धार होईल.
28 बंडखोर व पापी यांचा एकत्र चुराडा होईल व ज्यांनी परमेश्वराचा त्याग केला त्यांचाही तसाच चुराडा होईल.
29 “तुम्हास पवित्र वाटणाऱ्या एलाच्या झाडाची तुम्हास लाज वाटेल,
30 कारण तुम्ही पाने कोमजलेल्या एलाच्या झाडाप्रमाणे,
31 बलाढ्य मनुष्य वाळलेल्या झाडाच्या ढिलपीप्रमाणे दुर्बल होईल व त्याची कामे जाळाच्या लहानशा ठिणगीसारखी राहतील;