1 (त्या स्त्रीचा प्रियकर तिच्याशी बोलत आहे) अहा! प्रिये, तू सुंदर आहेस! तू खूप सुंदर आहेस.
2 लोकर कातरून धुतलेल्या मेंढ्या वर आल्या आहेत, ज्यातल्या प्रत्येकीस जुळे आहे.
3 तुझे ओठ किरमिजी रंगाच्या धाग्याप्रमाणे आहेत.
4 तुझी मान दाविदाने शस्रगारासाठी बांधलेल्या मनोऱ्याप्रमाणे आहे.
5 हरीणीची जी जुळी,
6 दिवस शेवटच्या घटका मोजत आहेत आणि सावल्या दूर पळत आहेत.
7 प्रिये, तू सगळीच फार सुंदर आहेस.
8 लबोनान मधून माझ्या वधू, तू माझ्याबरोबर ये.
9 अगे माझ्या बहिणी, माझ्या वधू,
10 माझ्या प्रिये, माझ्या वधू, तुझे प्रेम फार सुंदर आहे.
11 माझ्या वधू, तुझ्या ओठातून मध गळतो.
12 माझ्या प्रिये, माझ्या वधू, तू तर बंद केलेल्या बागेसारखी आहेस.
13 तुझी रोपे मोलवान फुले असलेला डाळिंबाचा मळा अशी आहेत.
14 मेंदी, जटामांसी, केशर,
15 तू बागेतल्या कारंज्यासारखी,
16 (तरुणी आपल्या प्रियकराबरोबर बोलते) उत्तरेकडच्या वाऱ्या, ऊठ! दक्षिणवाऱ्या ये,