1 मी याहवेहच्या महान करुणामय प्रीतीचे सदासर्वदा गुणगान करेन;
2 मी जाहीर करेन की, तुमची प्रीती आणि तुमची दया सर्वकाळ टिकणारी आहेत;
3 तुम्ही म्हणालात, “माझा निवडलेला सेवक, दावीद, याच्याशी मी एक करार केला आहे;
4 ‘दावीदाच्या सिंहासनावर त्याचे वंशज अनंतकाळ राज्य करतील
5 याहवेह, सारे गगनमंडळ तुमच्या अद्भुत चमत्कारांची स्तुती करीत आहे.
6 कारण याहवेहशी तुलना करता येईल असा स्वर्गात कोण आहे?
7 सात्विकांच्या सभेत एकत्र पवित्र परमेश्वराचे भय दिसून येते.
8 हे याहवेह, सेनाधीश परमेश्वरा, तुमच्यासारखे समर्थ परमेश्वर दुसरे कोणी आहे का?
9 भयानक उसळणार्या महासागरांवर तुम्हीच नियंत्रण ठेवता;
10 तुम्ही रहाबास असे जमीनदोस्त केले जसे एखादे शव;
11 स्वर्गाचे तुम्ही स्वामी आहात व पृथ्वीही तुमचीच आहे;
12 उत्तर आणि दक्षिण दिशा तुम्हीच निर्माण केल्या;
13 तुमचे बाहू प्रबळ आहेत;
14 तुमच्या राजासनाचा पाया नीती व न्याय आहे;
15 याहवेह, तुमचा गौरव करण्याचे जे शिकले,
16 तुमच्या नामाची प्रशंसा ते दिवसभर आनंदाने करतात;
17 तुम्हीच त्यांचे गौरव व सामर्थ्य आहात;
18 खरोखर याहवेहच आमची संरक्षक ढाल आहेत,
19 एकदा एका दृष्टान्ताद्वारे तुम्ही
20 तो माझा सेवक दावीद, मला मिळाला आहे;
21 माझे बाहू त्याला स्थिर करतील;
22 त्याचे शत्रू त्याला पराजित करू शकणार नाहीत;
23 मी त्याच्या शत्रूंना त्याच्यासमोर चिरडेन
24 माझी सत्यता व करुणा त्याजबरोबर राहील;
25 मी त्याला समुद्रावर अधिकार देईन,
26 तो माझा धावा करून म्हणेल, ‘तुम्ही माझे पिता आहात;
27 मी त्याची माझा ज्येष्ठपुत्र म्हणून नेमणूक करेन,
28 माझ्या करुणामय प्रीतीची छाया त्याजवर सदासर्वकाळ राहील;
29 मी त्याचे वंशज सर्वकाळ सुस्थापित करेन,
30 “जर त्याच्या मुलांनी माझ्या नियमांचा त्याग केला
31 माझ्या आज्ञेचे पालन केले नाही
32 मी त्यांच्या पापांचा छडीने समाचार घेईन,
33 पण मी माझी प्रेममयदया त्याच्यापासून कधीही काढून घेणार नाही
34 मी माझा करार मोडणार नाही;
35 सर्वकाळासाठी एकदाच दावीदाला माझ्या पवित्रतेची शपथ दिली—
36 दावीदाचा वंश सर्वकाळ टिकेल
37 आकाशातील विश्वसनीय साक्षीदार
38 मग माझा अव्हेर करून तुम्ही मला का दूर लोटले?
39 तुमच्या सेवकाशी केलेला करार तुम्ही झुगारून दिला आहे;
40 त्याचे रक्षण करणारे तट तुम्ही मोडून टाकले आहेत;
41 येणारा जाणारा प्रत्येकजण त्याला लुबाडतो;
42 तुम्ही त्याच्या शत्रूचा उजवा हात उच्च केला आहे;
43 तुम्ही त्याच्या तलवारीची धार बोथट केली आहे
44 तुम्ही त्याचे वैभव नष्ट केले आहे
45 त्याच्या तारुण्याचे दिवस खुंटविले आहेत;
46 हे याहवेह, असे कुठवर चालणार? तुम्ही स्वतःला सर्वकाळ लपवून ठेवणार काय?
47 माझ्या आयुष्याच्या क्षणभंगुरतेचे स्मरण करा.
48 कोण सर्वकाळ जगेल व ज्याला मरणाचा अनुभव येणार नाही,
49 हे परमेश्वरा, तुमच्या पूर्वीच्या महान प्रीतीची शपथ,
50 हे परमेश्वरा, तुमच्या सेवकाची कशी थट्टा झाली याची आठवण करा,
51 याहवेह, हे सर्व अपमान जे तुमच्या शत्रूंनी केले,
52 याहवेहचे सदासर्वकाळ स्तवन होवो!