1 हे याहवेह, आम्हाला काय झाले आहे यांचे स्मरण करा;
2 आमचे वतन अपरिचितांना देण्यात आले आहे,
3 आम्ही पितृहीन झालो आहोत,
4 पिण्याचे पाणीदेखील आम्हाला विकत घ्यावे लागते;
5 पाठलाग करणारे आमच्या अगदी जवळ येऊन पोचले आहेत.
6 पुरेशी भाकरी मिळण्याकरिता
7 आमच्या पूर्वजांनी पाप केले व ते आता हयात नाहीत.
8 गुलाम आता आमचे धनी झाले आहेत,
9 भाकरी मिळविण्यासाठी आम्हाला आमचा जीव धोक्यात घालावा लागतो,
10 आमची त्वचा भट्टीप्रमाणे तप्त झाली आहे,
11 स्त्रियांना सीयोनात भ्रष्ट करण्यात आले आहे,
12 आमच्या अधिपतींना त्यांच्या हातांवर लटकविण्यात आले आहे;
13 तरुण गिरणीवर काबाडकष्ट करतात;
14 वडीलजनांनी वेशीतील बैठकी सोडून दिल्या आहेत;
15 आमच्या हृदयातील आनंद निघून गेला आहे;
16 आमच्या मस्तकावरील मुकुट धुळीत पडला आहे.
17 याकारणास्तव आमची अंतःकरणे खचली आहेत,
18 सीयोन पर्वत आता ओसाड झाला आहे,
19 हे याहवेह, तुमचे शासन सदासर्वकाळचे आहे;
20 मग तुम्ही आम्हाला नेहमी का विसरता?
21 याहवेह, तुम्ही आमचा स्वतःशी पुनः संबंध स्थापित करा,
22 जर तुम्ही आमच्यावर मर्यादेपलिकडे क्रोधित झाला नसाल