1 याहवेहचे म्हणणे हे असे आहे,
2 त्यांना पाखडण्यात यावे व त्यांच्या भूमीचा विध्वंस व्हावा
3 तिच्या सैनिकांना त्यांचे धनुष्य ताणू देऊ नका.
4 बाबेलमध्ये ते मरून पडतील.
5 त्यांची भूमी इस्राएलच्या पवित्र परमेश्वरासमोर
6 “बाबेलमधून पलायन करा!
7 बाबिलोन याहवेहच्या हातातील सुवर्णपात्र होते;
8 बाबिलोनचे अचानक पतन होईल व ती मोडली जाईल.
9 “ ‘आम्ही बाबेलला बरे केले असते.
10 “ ‘याहवेहने आम्हाला निर्दोष घोषित केले आहे;
11 “बाणांना धार लावा,
12 बाबेलच्या तटबंदीविरुद्ध तुमचे झेंडे उंच करा!
13 तुम्ही, जे बऱ्याच जलाशयाकाठी वास करता,
14 सर्वसमर्थ याहवेह, स्वतःच्याच नावाची शपथ घेतातः
15 “त्यांनी त्यांच्या सामर्थ्याने पृथ्वीची निर्मिती केली;
16 जेव्हा ते गर्जना करतात, तेव्हा आकाशातील मेघ गर्जना करतात;
17 “प्रत्येक मनुष्य असमंजस व ज्ञानहीन आहे;
18 त्या व्यर्थ असून उपहासाचा विषय आहेत;
19 परंतु जो याकोबाचा वाटा आहे, तो यासारखा नाही.
20 “तू माझ्या युद्धाचा सोटा आहेस.
21 तुझ्याद्वारे मी घोडा आणि घोडेस्वाराचा संपूर्ण नाश करेन,
22 तुझ्याद्वारे मी पुरुष व स्त्रीचा संपूर्ण नाश करेन,
23 तुझ्याद्वारे मी मेंढपाळांचा आणि कळपांचा संपूर्ण नाश करेन,
24 “बाबिलोन व बाबिलोनचे लोक यांनी सीयोनाशी जे दुष्कृत्य केले, त्याबद्दल मी तुझ्या डोळ्यादेखत त्यांची परतफेड करेन.” असे याहवेह जाहीर करतात.
25 “हे संहारक पर्वता, तू जो संपूर्ण पृथ्वीचा विध्वंस करतो,
26 तुझ्यातील पाषाण कोनशिलेसाठी वापरण्यात येणार नाहीत.
27 “या भूमीवर आपले ध्वज फडकवा!
28 तिच्याशी युद्ध करण्यासाठी राष्ट्रांना सुसज्ज करा—
29 भूमी थरथरत व वेदनांनी तळमळत आहे,
30 बाबिलोनचे योद्धे युद्ध करण्याचे थांबले आहेत;
31 बाबेलच्या राजाला वर्तमान सांगण्यासाठी,
32 नदीवरील पूल जप्त करण्यात आले आहेत,
33 कारण सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात:
34 “बाबेलच्या नबुखद्नेस्सर राजाने आम्हाला गिळंकृत केले आहे,
35 सीयोनचे रहिवासी म्हणतात,
36 म्हणून याहवेह असे म्हणतात:
37 बाबिलोन भग्नावशेषाचा ढिगारा होईल,
38 तिचे सर्व लोक तरुण सिंहाप्रमाणे गर्जना करतील,
39 पण ते जेव्हा जागृत होतील,
40 मी त्यांना कोकरागत,
41 “शेशाक कसे हस्तगत केल्या जाईल,
42 बाबेलवर सागर उसळून येईल;
43 तिची शहरे ओसाड होतील,
44 मी बेलला बाबिलोन मध्येच शिक्षा देईन
45 “अहो माझ्या लोकांनो, तिच्यामधून बाहेर पडा!
46 जेव्हा तुम्हाला देशात अफवा ऐकिवात येतील
47 असा समय निश्चित येईल
48 मग स्वर्गात व पृथ्वीवर व त्यामध्ये असलेले सर्व
49 “जसे संपूर्ण पृथ्वीवर वध झालेले मृतदेह पडतात,
50 जे तुम्ही तलवारीपासून वाचला आहात,
51 “आमची अप्रतिष्ठा झाली आहे,
52 याहवेह जाहीर करतात, “पण असे दिवस येत आहेत,
53 बाबिलोन जरी गगनापर्यंत पोचली
54 “बाबेलमधून विलापाचा ध्वनी ऐकू येत आहे,
55 याहवेह बाबेलचा विनाश करणार आहेत;
56 बाबेलांच्या विरुद्ध विनाशक येईल;
57 मी तिचे राज्यपाल, सुज्ञ लोक, अधिपती, सेनापती
58 सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात:
59 सिद्कीयाहच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी जेव्हा यिर्मयाह संदेष्ट्याने यहूदीयाचा राजा सिद्कीयाहसह बाबेलला गेला, तेव्हा त्याने सेरायाहस, जो नेरीयाहचा पुत्र, जो महसेयाहचा नातू, तो सैन्यात दुय्यम दर्जाचा एक अधिकारी होता त्याला हा संदेश दिला.
60 बाबेलवर जी भयंकर अरिष्टे येणार होती, ती यिर्मयाहने एका गुंडाळीवर लिहिली—बाबेलवर येणाऱ्या सर्व अरिष्टांची नोंद करून ठेवण्यात आली होती.
61 यिर्मयाह सेरायाहाला म्हणाला, “तू बाबिलोन येथे गेल्यावर मी लिहिलेले सर्व मोठ्याने वाच.
62 मग म्हण, ‘हे याहवेह, तुम्ही म्हटले की तुम्ही बाबेलचा नाश कराल व तिथे कोणीही मनुष्य वा पशूप्राणी वसती करणार नाही; ती कायमची ओसाड होईल.’
63 मग तू ही गुंडाळी वाचून संपवलीस की तिला एक दगड बांधून ती फरात नदीत फेकून दे.
64 आणि म्हण, ‘बाबेलही अशीच बुडेल व पुन्हा कधीही वर येणार नाही, कारण मी तिच्यावर अरिष्ट आणणार आहे, आणि तिच्यामधील लोक पडतील.’ ”