Jeremias 13

MARC

1 याहवेहने मला म्हटले, “जा आणि तागाचा एक कमरबंद विकत घे. तो कमरेस गुंडाळ, पण त्याला पाणी लागू देऊ नकोस.”

2 तेव्हा याहवेहच्या सांगण्याप्रमाणे मी एक कमरबंद विकत घेतला आणि तो कमरेस गुंडाळला.

3 नंतर मला दुसऱ्यांदा याहवेहचा संदेश मिळाला:

4 “जो कमरबंद तू विकत घेतला आणि तो कमरेस गुंडाळला, तो कमरबंद घेऊन फरात नदीवर जा आणि तिथे तो खडकांमधील एका कपारीत लपवून ठेव.”

5 मी याहवेहने सांगितल्याप्रमाणे फरात येथे गेलो व तो लपवून ठेवला.

6 बर्‍याच दिवसानंतर याहवेह मला म्हणाले, “आता पुन्हा फरात नदीवर जा आणि तिथे मी लपवून ठेवण्यास सांगितलेला तो कमरबंद काढ.”

7 मग मी फरात नदीवर गेलो व तो लपवून ठेवलेला कमरबंद तिथून बाहेर काढला. परंतु आता तो कुजला असून अगदी निरुपयोगी झाला होता.

8 तेव्हा याहवेहचे वचन माझ्याकडे आले:

9 “याहवेह असे म्हणतात: अशाच प्रकारे मी यहूदीयाचा गर्व व यरुशलेमचा महागर्व नष्ट करणार आहे.

10 हे दुष्ट लोक, माझी वचने ऐकण्याचे नाकारतात, आणि स्वतःच्या अंतःकरणाच्या हट्टीपणाच्या मागे जातात आणि इतर दैवतांची सेवा व आराधना करतात, ते या कमरबंदाप्रमाणे होतील—पूर्णपणे निरुपयोगी!

11 याहवेह म्हणतात, ‘मनुष्याचा कमरबंद त्याच्या कमरेला वेढा घातलेला असतो, त्याचप्रमाणे यहूदीयाच्या सर्व लोकांना व इस्राएलच्या सर्व लोकांना मी वेढा घातला आहे, जेणेकरून त्यांनी माझ्या गौरवाचे व प्रशंसेचे व मानाचे लोक व्हावे. पण त्यांनी ऐकले नाही.’

12 “त्यांना सांग: ‘इस्राएलचे परमेश्वर याहवेह असे म्हणतात: सर्व बुधल्या द्राक्षारसाने भरलेल्या असाव्या.’ यावर ते जर तुला म्हणतील, ‘सर्व बुधल्या द्राक्षारसाने भरलेल्या असाव्या हे आम्हाला माहीत नाही काय?’

13 मग त्यांना सांग, ‘याहवेह असे म्हणतात: या देशातील सर्व रहिवाशांना, अगदी दावीदाच्या राजासनावर बसणारा राजा, याजक व संदेष्टे यांच्यापासून ते सर्व यरुशलेमनिवासी यांना मी मदिरेने झिंगून टाकणार आहे.

14 ते सर्व एकमेकांना विरोध करतील, आईपिता व मुलेदेखील एकमेकांना चिरडतील असे मी करेन, त्यांचा सर्वनाश होईल. मी त्यांची मुळीच गय करणार नाही व त्यांना दयामाया दाखविणार नाही, असे याहवेह जाहीर करतात.’ ”

15 ऐका व लक्ष द्या,

16 तुमच्या याहवेह परमेश्वराला गौरव द्या

17 जर तुम्ही माझे ऐकले नाही,

18 राजाला व राजमातेला सांगा,

19 यहूदीयाच्या दक्षिणेकडील नेगेवप्रांतातील नगरवेशी बंद होतील,

20 नेत्र उंच करा व पाहा

21 ज्यांचे संगोपन करून त्यांना आपले विशेष मित्र बनविले

22 “हे सर्व माझ्यावर का ओढवले?”

23 कूशी मनुष्याला आपल्या त्वचेचा रंग बदलता येईल का

24 “वार्‍यांनी भूस उडून जावे तसे मी तुला उडवून लावेन

25 हाच तुझा वाटा आहे,

26 म्हणून मी तुझी वस्त्रे वर ओढून तुझ्या चेहऱ्यावर टाकेन

27 तुझा व्याभिचार व तुझे ते कामातुरपणे खिंकाळणे,

Ler em outra tradução

Comparar lado a lado