Jó 32

MARC

1 मग त्या तिघांनी इय्योबाला उत्तर देण्याचे थांबविले, कारण आपल्या दृष्टीने तो स्वतः नीतिमान होता.

2 परंतु रामाच्या कुळातील, बारकाएल बूजीचा पुत्र एलीहू खूप रागावला, कारण इय्योब परमेश्वरापेक्षा स्वतःलाच न्यायी ठरवीत होता.

3 तीन मित्रांवर देखील तो संतापला कारण त्यांनी कोणत्याही प्रकारे इय्योबाचे खंडन केले नाही आणि तरीसुद्धा त्यांनी परमेश्वराला दोषी ठरविले होते.

4 एलीहू आता इय्योबाशी बोलायचा थांबला होता, कारण ते त्याच्याहून वयाने मोठे होते.

5 परंतु जेव्हा एलीहूने पाहिले की आणखी बोलण्यास त्यांच्याजवळ काहीही उरले नाही, त्याचा राग भडकला.

6 आणि बूजी बारकाएलचा पुत्र एलीहू बोलला:

7 मला वाटले की, ‘वयाने मोठे असलेल्यांनी बोलावे;

8 परंतु व्यक्तीमध्ये असलेला तो आत्मा,

9 जे वयाने मोठे तेच ज्ञानी आहेत असे नसते,

10 “म्हणून मी सांगतो ते लक्षपूर्वक ऐका;

11 तुम्ही बोलत असता, मी प्रतीक्षा करीत बसलो,

12 लक्षपूर्वक मी तुमचे ऐकले.

13 ‘आम्हाला ज्ञान सापडले आहे’ असे म्हणू नका;

14 परंतु इय्योबाने माझ्याविरुद्ध शब्द लढवले नाहीत,

15 “ते निराश झाले आहेत आणि त्यांच्याकडे बोलण्यासाठी आणखी काही उरले नाही;

16 आता ते तिथे गप्प उभे आहेत,

17 मी देखील माझे म्हणणे सादर करेन;

18 कारण माझ्याकडे भरपूर शब्द आहेत,

19 बाटलीमध्ये भरून ठेवलेल्या द्राक्षारसा समान,

20 मला आराम मिळावा म्हणून मी बोलणारच;

21 मी पक्षपात करणार नाही,

22 कारण मी जर कोणाची फाजील स्तुती करण्यात तरबेज असलो,

Ler em outra tradução

Comparar lado a lado