1 “याकोबाच्या वंशजांनो, हे ऐका
2 पवित्र नगरीचे रहिवासी असल्याचा दावा करता
3 भावी काळात काय घडणार याबद्दल भविष्यवाणी मी फार पूर्वी केलेली आहे
4 तुम्ही किती हेकेखोर आहात हे मला माहीत होते;
5 याकारणास्तव या गोष्टी फार पूर्वीच सांगितल्या;
6 ही भविष्ये तुम्ही ऐकलेली आहेत; त्या सर्वांकडे बघा.
7 त्या आताच घडविण्यात आल्या आहेत, फार पूर्वी नव्हे;
8 तुम्ही त्या ऐकलेल्या नाहीत किंवा तुम्हाला उमगल्या नाहीत;
9 तरी माझ्या नावाकरिता मी माझ्या प्रकोपास विलंब करेन,
10 पाहा, मी तुम्हाला शुद्ध केले आहे, पण चांदीइतके नव्हे;
11 तरीही माझ्या प्रीत्यर्थ, होय, माझ्याच प्रीत्यर्थ मी हे करेन.
12 “याकोबा, मी ज्यांना बोलाविले,
13 मी माझ्या स्वतःच्या हाताने पृथ्वीचा पाया घातला,
14 “एकत्र या, तुम्ही सर्वजण आणि ऐका:
15 मी, जरी मी हे बोललो;
16 “माझ्याजवळ या व हे लक्षपूर्वक ऐका:
17 याहवेह हे असे म्हणतात—
18 केवळ तुम्ही माझ्या आज्ञांकडे लक्ष दिले असते,
19 तुमचे वंशज वाळूसारखे झाले असते.
20 बाबेलमधून निघा,
21 त्यांनी त्यांना वाळवंटातून नेले, तेव्हा ते तहानले नाहीत;
22 “दुष्टांना शांती नसते,” असे याहवेह म्हणतात.