1 त्या दिवसांमध्ये हिज्कीयाह राजा आजारी पडला आणि मरणपंथाला लागला. आमोजाचा पुत्र यशायाह संदेष्टा त्याच्याकडे गेला आणि म्हणाला, “याहवेह असे म्हणतात: तुझे घर व्यवस्थित ठेव, कारण तू मरणार आहेस; तू बरा होणार नाहीस.”
2 हे ऐकताच हिज्कीयाहने आपले तोंड भिंतीकडे वळविले आणि याहवेहकडे प्रार्थना केली,
3 “हे याहवेह, मी तुमच्यापुढे कसा विश्वासूपणाने आणि पूर्ण मनोभावे समर्पित होऊन चाललो व नेहमी तुमच्या दृष्टीने योग्य तेच केले, याचे स्मरण करा.” आणि हिज्कीयाह अतिदुःखाने रडू लागला.
4 तेव्हा याहवेहचे वचन यशायाहकडे आले:
5 “जा आणि हिज्कीयाहला सांग, ‘तुझे पूर्वज दावीदाचे परमेश्वर, याहवेह असे म्हणतात: मी तुझी प्रार्थना ऐकली आणि तुझे अश्रू पाहिले आहेत; मी तुझ्या आयुष्यात पंधरा वर्षांची भर घालेन.
6 आणि मी तुला आणि या शहराला अश्शूरच्या राजाच्या हातातून सोडवेन. मी या शहराचे रक्षण करेन.
7 “ ‘याहवेहनी जे वचन दिले आहे, त्याप्रमाणे ते करतील यासाठी याहवेहनी तुम्हाला हे चिन्ह दिले आहे:
8 मी सूर्याच्या सावलीला आहाजच्या पायऱ्यांवरून दहा पावले मागे जाईल असे करेन.’ ” तेव्हा सूर्यप्रकाश जिथून तो गेला होता, त्याच्या दहा पावले मागे गेला.
9 यहूदीयाचा राजा हिज्कीयाहने त्याच्या आजारपणा नंतर आणि बरा झाल्यावर केलेले लिखाण:
10 मी म्हणाला, “माझ्या जीवनाच्या बहराच्या काळात
11 मी म्हणालो, “मी जिवंतांच्या देशात पुन्हा
12 मेंढपाळाच्या तंबूप्रमाणे माझे घर
13 मी धीर धरून पहाटेपर्यंत वाट पाहिली,
14 मी निळवी किंवा सारसाप्रमाणे चित्कारलो
15 परंतु मी काय बोलू शकतो?
16 हे प्रभू, अशा गोष्टी करून लोक जगतात;
17 अशा मनोवेदना मी सहन करणे
18 कारण अधोलोक तुमची स्तुती करू शकत नाही,
19 जिवंत, जे जिवंत आहेत—ते तुमची स्तुती करतात,
20 याहवेह मला वाचवतील,
21 यशायाहने म्हटले होते, “अंजिराचा लेप तयार करा आणि तो गळवावर लावा आणि तो बरा होईल.”
22 हिज्कीयाहने विचारले होते, “मी याहवेहच्या मंदिरात जाईन याचे चिन्ह काय असेल?”