Gênesis 36

MARC

1 एसाव म्हणजे एदोम याची वंशावळ ही:

2 एसावाने कनान देशातील स्थानिक मुलींशी विवाह केले होते: एलोन हिथी याची कन्या आदाह, अनाहची कन्या व सिबोन हिव्वी याची नात ओहोलीबामाह

3 आणि इश्माएलाची कन्या व नबायोथाची बहीण बासमाथ.

4 एसावापासून आदाहला एलीफाज नावाचा पुत्र झाला, बासमाथला रऊएल नावाचा पुत्र झाला.

5 एसावापासून ओहोलीबामाहला यऊश, यालाम व कोरह या नावांचे पुत्र झाले. एसावाला हे सर्व पुत्र कनान देशात झाले.

6 मग एसाव आपल्या स्त्रिया, मुलेबाळे, आपल्या घरची सर्व नोकरमंडळी, आपली गुरे व इतर जनावरे आणि कनान देशात त्याने मिळविलेली धनसंपत्ती घेऊन याकोबापासून दूर निघून तिथे वस्ती करून राहिला.

7 कारण त्या दोघांकडे इतकी अधिक धनसंपत्ती होती की त्यांच्या गुरांना पुरतील इतकी कुरणे तिथे नव्हती.

8 म्हणून एसावाने सेईरच्या (जे एदोम आहे) डोंगराळ प्रदेशात वस्ती केली.

9 सेईरच्या डोंगराळ प्रदेशातील एदोमी लोकांचा मूळ पुरुष एसावच्या वंशजांची नावे अशी.

10 एसावाच्या पुत्रांची नावे:

11 एलीफाजचे पुत्र:

12 एसावाचा पुत्र एलीफाजला तिम्ना नावाची उपपत्नी होती जिच्यापासून त्याला अमालेक हा पुत्र झाला. ही एसावची पत्नी आदाह हिची नातवंडे होती.

13 रऊएलाचे पुत्र:

14 एसावाला ओहोलीबामाह नावाची आणखी एक पत्नी होती. ती अनाहची कन्या असून सिबोनाची नात होती. ओहोलीबामाहच्या पोटी एसावाला,

15 एसावाची नातवंडे त्यांच्या नावांनी ओळखल्या जाणार्‍या कुळांचे प्रमुख झाले:

16 कोरह, गाताम व अमालेक. हे सर्व एदोमातील एलीफाजचे प्रमुख वंशज होते; ते आदाहचे पौत्र होते.

17 एसावाचा पुत्र रऊएलचे वंशज:

18 एसावाला त्याची पत्नी ओहोलीबामाह हिच्याकडून:

19 हे एसावाचे (अर्थात् एदोमाचे) पुत्र, जे त्यांच्या कुळाचे पुढारी होते.

20 एदोम देशातील रहिवासी, सेईर होरी याच्या पुत्रांची नावे ही:

21 दिशोन, एसर व दीशान. हे एदोम देशातील सेईराचे पुत्र होरी वंशातील कुळांचे सरदार झाले.

22 लोटानाचे पुत्र:

23 शोबालाचे पुत्र:

24 सिबोनाचे पुत्र:

25 अनाहचा पुत्र:

26 दिशोनाचे पुत्र:

27 एसराचे पुत्र:

28 दिशोनाचे पुत्र:

29 होरी लोकांमधून प्रमुख झालेल्यांची नावे ही:

30 दिशोन, एसर व दीशान.

31 इस्राएली लोकांवर कोणत्याही राजाने राज्य करण्यापूर्वी एदोम देशावर ज्या राजांनी राज्य केले ते:

32 बौराचा पुत्र बेला एदोमचा राजा झाला. त्याच्या शहराला दिन्हाबाह हे नाव दिले होते.

33 बेला मृत्यू पावल्यावर बस्रा येथला जेरहाचा पुत्र योबाब हा त्याच्या जागी राजा झाला.

34 योबाब मरण पावल्यावर तेमानी देशातील हुशाम त्याच्या जागी राजा झाला.

35 हुशाम मेल्यावर बदादाचा पुत्र हदाद त्याच्या जागी राजा झाला. यानेच मोआब मैदानात मिद्यानांना पराभूत केले; त्या नगराचे नाव अवीत होते.

36 हदाद मेल्यावर मास्रेका येथील सामलाह त्याच्या जागी राजा झाला.

37 सामलाह मेल्यावर फरात नदीच्या तीरावरील रेहोबोथ नावाच्या शहरातील शौल त्याच्या जागी राजा झाला.

38 शौलाच्या मृत्यूनंतर अकबोराचा पुत्र बआल-हानान त्याच्या जागी राजा झाला.

39 अकबोराचा पुत्र बआल-हानान हा मेल्यावर हदाद त्याच्या जागी राजा झाला. त्याच्या नगराचे नाव पाऊ होते, आणि त्याच्या पत्नीचे नाव महेटाबेल असून ती मेजाहाबाची कन्या मात्रेद हिची कन्या होती.

40 एसाव हा एदोम वंशातील प्रमुखांचा मूळ पुरुष होता:

41 ओहोलीबामाह, एलाह, पीनोन,

42 केनाज, तेमान, मिब्सार,

43 मग्दीएल व ईराम.

Ler em outra tradução

Comparar lado a lado