Esdras 10

MARC

1 परमेश्वराच्या भवनासमोर जमिनीवर पडून एज्रा रडत प्रार्थना करीत व पापांगिकार करीत असताना, इस्राएली पुरुष, स्त्रिया व मुले यांचा एक फार मोठा समुदाय त्याच्याभोवती जमा झाला. तेही अत्यंत दुःखाने रडू लागले.

2 मग एलाम वंशातल्या यहीएलाचा पुत्र शखन्याह एज्राला म्हणाला, “आम्ही या गैरयहूदी स्त्रियांशी विवाह करून आमच्या परमेश्वराविरुद्ध विश्वासघात केला आहे. पण या स्थितीतही इस्राएलला आशा आहे.

3 आता जे आमच्या परमेश्वराचे भय धरतात व त्यांच्या आज्ञा पाळतात, ते आपण या स्त्रियांना सोडून देण्याचे वचन देऊ या. माझ्या स्वामीच्या सल्ल्यानुसार आम्ही त्यांना त्यांच्या मुलांबाळांसह परत पाठवून देऊ. सर्वकाही परमेश्वराच्या नियमानुसार झाले पाहिजे.

4 तर आता ऊठ; या सर्वगोष्टी तुझ्या हातात आहेत. आम्ही तुला पूर्णपणे सहकार्य करू, म्हणून धैर्य धर व योग्य ते कर.”

5 तेव्हा एज्रा उठून उभा राहिला आणि त्याने याजक, लेवी आणि सर्व इस्राएली लोकांच्या पुढार्‍यांनी शखन्याह म्हणतो त्याप्रमाणे करण्याची शपथ घ्यावी अशी मागणी केली आणि त्या सर्वांनी शपथ घेतली.

6 मग एज्रा परमेश्वराच्या भवनापासून उठला व एल्याशीबाचा पुत्र यहोहानानच्या खोलीवर गेला, त्याने अन्नपाणी घेण्याचे नाकारले, कारण बंदिवासातून परत आलेल्या इस्राएलांच्या विश्वासघातासाठी तो शोक करीत राहिला.

7 मग संबध यहूदीयात व यरुशलेमात असे जाहीर करण्यात आले की बंदिवासातून परतलेल्या प्रत्येक इस्राएलीने यरुशलेमला यावे.

8 इस्राएलांच्या पुढार्‍यांनी आणि वडीलजनांनी असे ठरविले की जो कोणी तीन दिवसाच्या आत यरुशलेमला येण्याचे नाकारील तो आपले वतन गमावेल आणि त्याला बंदिवासातून परतलेल्या इस्राएलाच्या सभेतून बहिष्कृत करण्यात येईल.

9 तीन दिवसांच्या आत, नवव्या महिन्याच्या विसाव्या दिवशी, यहूदाहचे व बिन्यामीनचे सर्व लोक यरुशलेमात येऊन पोहोचले व परमेश्वराच्या मंदिरासमोर चौकात बसले. या प्रकरणाच्या गांभीर्यामुळे व जोरदार पावसामुळे ते अत्यंत क्लेशजनक स्थितीत होते.

10 मग एज्रा याजक उभा राहिला आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही विश्वासघात केला आहे, कारण तुम्ही गैरयहूदी स्त्रियांशी विवाह केले आहेत आणि आपण इस्राएलचे पातक आणखीच वाढविले आहे.

11 आता याहवेह आपल्या पूर्वजांच्या परमेश्वराचा गौरव करा येथून पुढे त्यांच्याच इच्छेप्रमाणे करा. स्वतःला सभोवतालच्या लोकांपासून आणि या गैरयहूदी स्त्रियांपासून वेगळे करा.”

12 तेव्हा सर्वजण मोठ्याने उत्तर देत म्हणाले: “तुम्ही सांगता ते योग्य आहे! त्याप्रमाणे आम्ही करू.

13 पण इथे अनेकजण आहेत आणि आता इतका जोरदार पाऊस पडतो आहे की आम्ही येथे बाहेर आपल्या शक्तीने थांबूही शकत नाही. तसेच आम्ही इतके घोर पातक केले आहे की हे सर्व सुरळीत होण्यास एक दोन दिवस पुरेसे होणार नाहीत.

14 आमच्या पुढार्‍यांना न्यायदानाची व्यवस्था करू द्या. ज्याला गैरयहूदी पत्नी आहे असा प्रत्येकजण ठरलेल्या वेळी आपल्या नगराचे वडीलजन व न्यायाधीश यांच्यासह येईल. मग परिस्थिती निवळेल आणि आपल्या परमेश्वराचा भयंकर कोप आम्हांपासून दूर होईल.”

15 फक्त असाहेलचा पुत्र योनाथान, तिकवाहचा पुत्र यहज्याह, ज्यांना मशुल्लाम व शब्बथई लेवी यांनी पाठिंबा दिला होता त्यांनी या योजनेला विरोध दर्शविला.

16 तेव्हा बंदिवासातून परतलेल्यांना जी सूचना करण्यात आली होती त्यानुसार केले. एज्रा याजकाने प्रत्येकाच्या नावाचा उल्लेख करून सर्व पितृकुळांच्या पुढार्‍यातून एकास निवडले. दहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी ते या बाबींची चौकशी करण्यास बसले.

17 आणि गैरयहूदी स्त्रियांशी विवाह केलेल्या पुरुषांचा निवाडा करण्याचे काम पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी संपविले.

18 ज्यांनी गैरयहूदी स्त्रियांशी विवाह केले होते, त्या याजकांची यादी पुढीलप्रमाणे आहे:

19 (त्यांनी आपल्या पत्नींना घटस्फोट देऊन सोडून देण्याची शपथ घेतली आणि मेंढ्याची अर्पणे करून आपली पापे कबूल केली.)

20 इम्मेराचे वंशज:

21 हारीमाचे वंशज:

22 पशहूराचे वंशज:

23 लेवी मधून:

24 गायकांपैकी:

25 इतर इस्राएली लोकांपैकी:

26 एलामाच्या कुळातील:

27 जत्तूच्या कुळातील:

28 बेबाईच्या कुळातील:

29 बानीच्या कुळातील:

30 पहथ-मोआबाच्या कुळातील:

31 हारीमाच्या कुळातील:

32 बिन्यामीन, मल्लूख व शमरियाह.

33 हाशूमाच्या कुळातील:

34 बानीच्या कुळातील:

35 बेनाइयाह, बेदयाह, कलूही,

36 वन्या, मरेमोथ, एल्याशीब,

37 मत्तन्याह, मत्तनई, यासय.

38 बानी, बिन्नुई कुळातील:

39 शेलेम्याह, नाथान, अदायाह,

40 मखनदबइ, शेशय, शारइ,

41 अजरएल, शेलेम्याह, शमरियाह,

42 शल्लूम, अमर्‍याह व योसेफ.

43 नबोच्या कुळातील:

44 या पुरुषांनी गैरयहूदी स्त्रियांशी विवाह केला होता व त्यांच्यापैकी काहींना त्यांच्यापासून लेकरे झाली होती.

Ler em outra tradução

Comparar lado a lado