Esdras 1

MARC

1 यिर्मयाहने सांगितलेला याहवेहचा संकल्प पूर्ण व्हावा म्हणून पर्शियाचा राजा कोरेशच्या कारकिर्दीच्या पहिल्याच वर्षी पुढील जाहीरनामा लिहून आपल्या संपूर्ण साम्राज्यात पाठवावा अशी इच्छा याहवेहने राजाच्या मनात निर्माण केली.

2 “पर्शियाचा राजा कोरेश, असे जाहीर करतो की:

3 तुमच्यातील जे याहवेहचे लोक आहेत त्यांनी वर यहूदीयातील यरुशलेमास जाऊन याहवेह इस्राएलचे परमेश्वर, परमेश्वर जे यरुशलेमात आहेत त्यांचे मंदिर बांधावे आणि त्यांचे परमेश्वर त्यांच्याबरोबर असोत.

4 आणि उरलेले जे यहूदी लोक जिथे कुठे असतील त्यांनी यरुशलेमला जाणार्‍या यहूदी लोकांना सोने, चांदी, अन्य वस्तू आणि पशू, तसेच यरुशलेमातील परमेश्वराच्या मंदिरासाठी स्वैच्छिक अर्पणेही पुरवावी.’ ”

5 नंतर परमेश्वराने यहूदाह व बिन्यामीन वंशांचे पुढारी आणि लेवी व याजक यांच्या मनामध्ये याहवेहचे मंदिर पुन्हा बांधण्यासाठी यरुशलेमला ताबडतोब जाण्याची उत्कट इच्छा निर्माण केली.

6 सर्व शेजाऱ्यांनी दिलेल्या स्वेच्छेने दिलेल्या देणग्यांबरोबरच सोने, चांदी, गुरे याशिवाय इतर मोलवान भेटवस्तूही देऊन त्यांची मदत केली.

7 त्या शिवाय बाबेलच्या नबुखद्नेस्सर राजाने यरुशलेम येथील याहवेहच्या मंदिरातून नेलेल्या ज्या वस्तू आपल्या दैवतांच्या मंदिरात ठेवल्या होत्या, त्या कोरेश राजाने बाहेर काढल्या.

8 कोरेश राजाने पर्शियाचा खजिनदार मिथ्रदाथला सूचना दिली की त्याने यहूदीयात परतणारा यहूद्यांचा पुढारी शेशबस्सरला सर्व वस्तू मोजून द्याव्या.

9 यामध्ये पुढील वस्तूंचा समावेश होता:

10 सोन्याचे कटोरे 30,

11 अशा एकूण 5,400 सोने व चांदीच्या वस्तू होत्या.

Ler em outra tradução

Comparar lado a lado